एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Navdurga 2024 : लोकांपर्यंत चांगल्या दर्जाचं, गुणवत्तेचं अन्न पोहोचविण्याचं कार्य करणाऱ्या फूड टेक्नॉलॉजी एक्स्पर्ट चिन्मयी देऊळगावकर यांचा प्रवास जाणून घ्या

Navdurga 2024 : फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणारी आजची आपली नवदुर्गा आहे.

Navdurga 2024 : सध्याच्या सुपरफास्ट युगात आपल्या जिद्दीच्या अन् कौशल्याच्या बळावर असामान्य उंची गाठणाऱ्या, कर्तृत्ववान महिलांशी, समस्त स्त्री-वर्गाचा परिचय... या नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने होत आहे. यामुळे अगदी नवनवीन क्षेत्रांची माहिती मिळतेय, त्यात करिअर करण्यासाठी प्रेरणा अन् प्रोत्साहन मिळतंय, हा खूपच सकारात्मक परिणाम आहे. आजचा रंग गुलाबी... जो आरोग्याशी संबंधित आहे म्हणून आजची आपली दुर्गा मनुष्यजातीचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी अन्नपदार्थांच्या तपासणीसाठी काम करणारी…. आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त, फूड टेक्नॉलॉजी एक्स्पर्ट, चिन्मयी देऊळगावकर! 

चिन्मयी, यांनी हॉर्टीकल्चर मधील बी. एस सी. पदवी मिळवल्यानंतर, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आपल्या याच विदवत्तेच्या बळावर, Agriculture, Food & Beverages च्या क्षेत्रातील एक आंतरराष्ट्रीय तज्ञ म्हणून, आजवर त्यांनी जगभरातील अनेक देशात काम केले आहे, ज्यात त्यांना तब्बल 24 वर्षांचा अनुभव आहे. आणि त्या सध्या FoodChain ID या अमेरिकन कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदावर काम करत आहेत. या कंपनीचा जगात जवळपास 60,000 कंपन्यांचा Client-base आहे. कुठलेही Food किवा Food Product 190 देशांमधील अन्नपदार्थाच्या Food Regulation प्रमाणे आहे की नाही, हे तपासण्यासाठी, त्याच्या गुणवत्तेची परीक्षा करणे, योग्य ते प्रमाणपत्र देणे, या संदर्भात Training देणे इत्यादी महत्त्वाच्या जबाबदा-या ही कंपनी पार पाडते. 

कुठल्याही शेतकऱ्याचे शेत... ते आपले किचन... या प्रवासादरम्यान अनेक असे टप्पे असतात, जिथे त्या अन्नामधील गुणवत्तेमध्ये फरक पडतो, बदल होतो… म्हणून या प्रोसेसदरम्यान अन्नाच्या गुणवत्तेमध्ये आणि पोषण मूल्यांमध्ये फार बदल न होता... ते शक्य तितक्या चांगल्या स्थितीत उपभोक्ता म्हणजेच End User पर्यंत पोहोचावे, यासाठी जगभरात चिन्मयी यांसारखे अनेक वैज्ञानिक आपल्या टीमसोबत, तास न तास अथक परीश्रम करीत असतात! 

चिन्मयी यांनी, आजवर जवळपास 825 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेसमध्ये एक तज्ञ या नात्याने, सहभाग घेतला असून 3000 पेक्षाही अधिक लेखापरीक्षणे, तसेच 1500 पेक्षाही जास्त Training Sessions मध्ये आपले योगदान दिले आहे. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेले तब्बल 1000 हून अधिक प्रशिक्षणार्थी आज आघाडीचे Food Safety Auditors  म्हणून जगभरात कार्यरत आहेत.  ह्यातील अनेक जण केंद्र आणि राज्य सरकारच्या FSSAI आणि FDA संस्थेत, तसेच परदेशातही Food Safety Eepert म्हणून आपली सेवा देत आहेत. आणि अतिशय अभिमानास्पद गोष्ट म्हणजे, सध्या  चिन्मयी देऊळगावकर या Food Scientist and Technologist of India, Mumbai chapter च्या Vice President आहेत. भारत सरकारच्या Food Safety and Standards Authority of India ने त्यांचा FOSTAC ambassador आणि FSSAI National Resource म्हणून सन्मान केला आहे. 

सामान्य व्यक्तीला फारशा माहिती नसलेल्या... Food Science & Technology च्या क्षेत्रात त्यांनी आजवर केलेला प्रवास खरंच स्वप्नवत असा आहे. मळलेल्या वाटेवर चालण्यापेक्षा, एका वेगळयाच क्षेत्रात, आत्मविश्वासाने पावले टाकत, पुढे एक मोठी गरूड भरारी घेणा-या या आधुनिक दुर्गेला आमचा मानाचा मुजरा!

हे ही वाचा : 

Navdurga 2024 : फक्त पदार्थांच्या चवीचाच विचार नको, ऋतू आणि भौगोलिक स्थितीही महत्त्वाची! पाककला तज्ञ सौ. स्मिता अभिनय देव यांची खास मुलाखत

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ahilyanagar Cold Wave | नगरकर गारठले, निचांकी तापमानाची नोंद; जागोजागी शेकोट्या पेटल्याABP Majha Headlines :  10 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Embed widget