Mental Health : अभ्यास, करिअर किंवा लग्नाचा ताण आहे का? 'या' टिप्सने महिनाभरात आराम मिळवा, तज्ज्ञ सांगतात...
Mental Health : चिंता कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकते. तुम्हालाही ही समस्या असल्यास, तणाव कमी करण्यासाठी किंवा पूर्णपणे काढून टाकण्याचे मार्ग तज्ञांकडून जाणून घ्या.
Mental Health : आजच्या काळात तणाव आणि चिंता ही एक समस्या बनली आहे. मनुष्यांमधील ताणतणाव, करिअर, परीक्षा, अभ्यास किंवा लग्न इत्यादी कोणत्याही गोष्टीशी संबंधित असू शकतो. हे दीर्घकाळ असचं सुरू राहिल्यास ते एका गंभीर आजाराचे रूप घेते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा ही समस्या कधी कधी जीवघेणीही ठरते. याबाबत मानसोपचार तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घ्या...
तणावातून मुक्त होण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे...
एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीनुसार मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राहुल चंडोक यांनी याबाबत माहिती दिलीय. त्यांनी तणाव कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी काही टिप्स देखील दिल्या आहेत, ज्याचे पालन करून तुम्ही तुमच्या समस्या कमी करू शकता. तणावातून मुक्त होण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे सामाजिक संवाद टिकवणे. म्हणजे शाळा किंवा कार्यालयातील सहकाऱ्यांशी नेहमी संपर्क ठेवा, तसेच वेळोवेळी तुमच्या समस्या त्यांच्याशी शेअर करा. असे केल्याने तुमचे मन हलके राहील. तसेच, तुमच्या मनातील गोंधळ कमी होईल आणि तुम्ही लवकर तणावमुक्त होऊ शकता.
स्वतःला व्यस्त ठेवा
तणाव किंवा चिंतेची समस्या बऱ्याचदा रिकामेपणामुळे किंवा आळशी बसल्यामुळे उद्भवते. त्यामुळे स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला चित्रकला, लेखन, छायाचित्रण इत्यादी कोणत्याही प्रकारच्या कौशल्यात रस असेल, तर तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत ते करून पाहू शकता. म्हणजेच, जर तुम्ही खूप तणावग्रस्त असाल तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमची चित्रकला किंवा लेखन शैली सुधारू शकता.
मन शांत ठेवण्यावर भर द्या
तणावाच्या काळात मन अनेकदा अस्वस्थ राहतं. अशा परिस्थितीत मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्हाला हवे असल्यास तुम्ही योगा करू शकता किंवा शांत ठिकाणी बसू शकता. असे केल्याने तुमचे मन आणि मेंदू हलके आणि पूर्णपणे आरामशीर वाटेल. तसेच तणावापासून मुक्त होण्यास मदत होईल. योगाच्या रूपात, तुम्ही ध्यान किंवा दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम इत्यादींचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समावेश करू शकता. हे तंत्र तुम्हाला तुमचा अंतर्गत ताण सोडवण्यात मदत करेल.
7 ते 8 तासांची झोप
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कधीकधी कमी झोपेमुळे तणाव निर्माण होतो. तुम्ही जितके जास्त झोपाल तितके तुमचे मन शांत आणि आरामशीर वाटेल. तुमच्या मनात थोडासाही गोंधळ चालू असेल तर तुमची रात्रीची झोप उडते. पण, यावर नियंत्रण ठेवावे लागेल. यासाठी 7 ते 8 तासांची योग्य झोप घेणे आवश्यक आहे. हे तुम्हाला तणावमुक्त ठेवण्यास मदत करू शकते.
डॉक्टरांचा सल्ला
खूप प्रयत्न करूनही तुमची चिंता आणि तणाव दूर होत नसेल तर भविष्यात ते गंभीर समस्येत बदलू शकते. अशा परिस्थितीत, शक्य तितक्या लवकर आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य उपचार करा.
हेही वाचा>>>
Women Health: महिलांनो...मासिक पाळीला कमजोर समजू नका, हे तर ताकदीचे लक्षण! पीरियड पॉवरबद्दल जाणून आश्चर्यचकित व्हाल..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )