एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना महिनाभरापूर्वी वाल्मिक कराडची धमकी; अश्विनी देशमुखांचा सीआयडीला महत्त्वाचा जबाब

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्याप्रकरणात बीडमध्ये घडामोडींना वेग, सरपंचांच्या पत्नीकडून पोलिसांना महत्त्वाची माहिती. वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा

बीड: संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्याप्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. सीआयडी आणि एसआयटीकडून या हत्याप्रकरणाचा तपास सुरु आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनीही नुकताच सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवला होता. या जबाबात अश्विनी देशमुख यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी महिनाभरापूर्वीच संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे संतोष देशमुख हे प्रचंड अस्वस्थ होते, असे अश्विनी देशमुख यांनी सीआयडीला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अश्विनी देशमुख यांच्या जबाबानुसार, नोव्हेंबर महिन्यात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली होती. तेव्हापासून संतोष देशमुख हे प्रचंड अस्वस्थ होते. अश्विनी देशमुख यांचा हा जबाब 3 जानेवारीला नोंदवण्यात आल्याचे समजते. सीआयडीने याप्रकरणात वाल्मिक कराड वगळता उर्वरित आरोपींवर मोक्का लावला होता. मात्र, वाल्मिक कराड यांच्यावरही मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. 

दरम्यान, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सीआयडीच्या तपासाबाबत प्रश्चचिन्ह उपस्थित करत मस्साजोग गावातील टॉवरवर चढून सोमवारी आंदोलन करणार असल्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर मस्साजोग गावातील टॉवर परिसरात प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर धनंजय देशमुख हेदेखील सोमवारी सकाळपासून बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे आंदोलनाच्या तयारीत असलेले धनंजय देशमुख अचानक कुठे गेले, असा सवाल विचारला जात आहे. यामुळे मस्साजोग गावातील लोक आक्रमक झाले आहेत. संतोष देशमुख यांच्याप्रमाणे धनंजय देशमुख यांचेही अपहरण करण्यात आले का, त्यांचाही घातपात करण्याचा प्रयत्न आहे का, असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. त्यामुळे आता धनंजय देशमुख नेमके कधी समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, काहीवेळानंतर धनंजय देशमुख हे गावातील एका पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत असल्याचे समोर  आले आहे.

लक्ष्मण हाकेंना धमकी

संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याविरोधात टीकेची लाट उसळली होती. मात्र, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुंडे यांचा बचाव केला होता. याच लक्ष्मण हाके यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारच्या पत्रकार परिषदेपूर्वी लक्ष्मण हाके यांना धमकी देण्यात आल्याचे समजते. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून फोनवरून धमकी देण्यात आल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले.

दरम्यान, मस्साजोग गावातील आजच्या आंदोलनात मराठा आंदोलक मनोज जरांगे हेदेखील सहभागी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मस्साजोग गावातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

आणखी वाचा

एसआयटीचा प्रमुख अन् दोन बड्या वकिलांची नावं सांगितली, मस्साजोगच्या गावकऱ्यांच्या 5 मागण्या, संक्रातीला टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : पिवळ्या रंगांचे सोवळं अन् उपरणं घालून मुख्यमंत्री त्र्यंबकराजाच्या दरबारी, फडणवीसांचा खास लूक पाहिलात का?
पिवळ्या रंगांचे सोवळं अन् उपरणं घालून मुख्यमंत्री त्र्यंबकराजाच्या दरबारी, फडणवीसांचा खास लूक पाहिलात का?
Yashwant Varma : पहिल्यांदा न्यायमूर्तींच्या बंगल्यात पैसा सापडलाच नाही म्हणाले अन् मध्यरात्री सुप्रीम कोर्टाकडून पोतीच्या पोती भरून जळालेल्या पैशाचा व्हिडिओ मध्यरात्री शेअर!
पहिल्यांदा न्यायमूर्तींच्या बंगल्यात पैसा सापडलाच नाही म्हणाले अन् मध्यरात्री सुप्रीम कोर्टाकडून पोतीच्या पोती भरून जळालेल्या पैशाचा व्हिडिओ मध्यरात्री शेअर!
Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंह राजपूतला विष दिलं की गळा दाबला, चॅटिंगमध्ये काय सापडलं? सीबीआय रिपोर्टमधील 10 महत्त्वाच्या गोष्टी
सुशांत सिंह राजपूतला विष दिलं की गळा दाबला, चॅटिंगमध्ये काय सापडलं? सीबीआय रिपोर्टमधील 10 महत्त्वाच्या गोष्टी
Devendra Fadnavis : फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा इशारा, पोलिसांनी तत्काळ उचललं मोठं पाऊल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा इशारा, पोलिसांनी तत्काळ उचललं मोठं पाऊल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 09 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 08 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra News 23 March 2025ABP Majha Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : पिवळ्या रंगांचे सोवळं अन् उपरणं घालून मुख्यमंत्री त्र्यंबकराजाच्या दरबारी, फडणवीसांचा खास लूक पाहिलात का?
पिवळ्या रंगांचे सोवळं अन् उपरणं घालून मुख्यमंत्री त्र्यंबकराजाच्या दरबारी, फडणवीसांचा खास लूक पाहिलात का?
Yashwant Varma : पहिल्यांदा न्यायमूर्तींच्या बंगल्यात पैसा सापडलाच नाही म्हणाले अन् मध्यरात्री सुप्रीम कोर्टाकडून पोतीच्या पोती भरून जळालेल्या पैशाचा व्हिडिओ मध्यरात्री शेअर!
पहिल्यांदा न्यायमूर्तींच्या बंगल्यात पैसा सापडलाच नाही म्हणाले अन् मध्यरात्री सुप्रीम कोर्टाकडून पोतीच्या पोती भरून जळालेल्या पैशाचा व्हिडिओ मध्यरात्री शेअर!
Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंह राजपूतला विष दिलं की गळा दाबला, चॅटिंगमध्ये काय सापडलं? सीबीआय रिपोर्टमधील 10 महत्त्वाच्या गोष्टी
सुशांत सिंह राजपूतला विष दिलं की गळा दाबला, चॅटिंगमध्ये काय सापडलं? सीबीआय रिपोर्टमधील 10 महत्त्वाच्या गोष्टी
Devendra Fadnavis : फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा इशारा, पोलिसांनी तत्काळ उचललं मोठं पाऊल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा इशारा, पोलिसांनी तत्काळ उचललं मोठं पाऊल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Virat Kohli : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात किंग खानकडून कोहली कोहलीचा गजर, रिंकू सिंगकडून विराटचा अपमान? नेमकं काय घडलं?
आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात किंग खानकडून कोहली कोहलीचा गजर, रिंकू सिंगकडून विराटचा अपमान? नेमकं काय घडलं?
दिवसाढवळ्या रुग्णालयातील चेंबरमध्ये घुसून 30 वर्षीय महिला संचालकाची निर्घृण हत्या; सहा गोळ्या झाडल्या, खोली धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
दिवसाढवळ्या रुग्णालयातील चेंबरमध्ये घुसून 30 वर्षीय महिला संचालकाची निर्घृण हत्या; सहा गोळ्या झाडल्या, खोली धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
Eknath Khadse : जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
Jaykumar Gore: कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही; देवाभाऊ माझ्या पाठिशी; जयकुमार गोरे कडाडले
कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही; देवाभाऊ माझ्या पाठिशी; जयकुमार गोरे कडाडले
Embed widget