हाताला वेदना, बोटाला सूज; लक्षणं साधी, पण संकेत मोठे, हार्ट अटॅकचा धोका, काय कराल?
Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्यापूर्वी तुमच्या हातावर दिसतात लक्षणं, त्यामुळे सावध राहा आणि वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Heart Attack Symptoms on Hand : हृदयाशी (Heart) संबंधित आजारांचा धोका सध्या वेगानं वाढत आहे, या आजारांमध्ये हार्ट अटॅकचं (Heart Attack) प्रमाण सर्वाधिक आहे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात अनेक बदल दिसून येतात, त्यापैकी काही हातांवरही दिसतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच लक्ष दिलं तर रुग्णांचे प्राण वाचू शकतात. म्हणूनच, जर तुम्हाला हृदयाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या आजाराचा धोका असेल, तर अशा परीस्थितीत तुमच्या शरीरावर होणाऱ्या बदलांकडे बारकाईनं लक्ष द्या. हार्ट अटॅक आणि त्याच्या लक्षणांबाबात सविस्तर जाणून घेऊयात...
हृदयविकाराची लक्षणं कोणती? (What Are The Symptoms of Heart Disease?)
हाताच्या बोटांना सूज येणं (Swelling of Fingers)
हृदयविकाराच्या या लक्षणाला हिप्पोक्रॅटिक फिंगर्स म्हणतात. या अवस्थेत हाताची बोटं एकमेकांवर आदळल्यास बोटांच्या टोकांना सूज येते. ही हृदयविकाराची गंभीर लक्षणं आहेत. या प्रकरणात, त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच काळापासून हृदयामध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये अशी लक्षणं दिसणं सामान्य झालं आहे.
डाव्या हाताला वेदना (Pain in Left Hand)
हातांवर हृदयविकाराची लक्षणं दिसणं सामान्य आहे. हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही वेळापूर्वी, हाताच्या डाव्या बाजूला तीव्र वेदना होतात. तुमचाही डावा हात बऱ्याच काळापासून दुखत असेल किंवा सुन्न झाला असेल, तर ताबडतोब तुमच्या आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्या. जेणेकरून तुमचे उपचार वेळेवर होऊ शकतील.
काही इतर लक्षणं
हार्ट अटॅकपूर्वी रुग्णांना खांद्याजवळ खूप प्रेशर जाणवतं, वेदना होतात. अशा परिस्थितीत तुम्ही तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. गरजेचं नाही की, खांदेदुखीचं कारण हार्ट अटॅकच असू शकतं, पण लक्षण दिसलं तर दुर्लक्ष न करता, तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मनातली शंका दूर करा. तसेच, डाव्या हातानं काम करताना त्रास होणं, हेदेखील हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं.
हार्ट अटॅक येण्यापूर्वी रुग्णाच्या शरीरात अनेक बदल होतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, अनेक लक्षणं हातावर दिसतात. अशा परिस्थितीत योग्य वेळा डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. आणि वेळेपूर्वीच लक्षणं रोखणं फायदेशीर ठरतं.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Egg for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी रोज खा अंडी; पण कशी, उकडून की तळून?
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )