एक्स्प्लोर

Lifestyle : एखादा पदार्थ तुम्ही एक्सपायरी डेट नंतर खाल्लाय का? आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या..

Lifestyle : अनेकदा लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो की, एखादा खाद्यपदार्थ एक्सपायरी डेटनंतरही वापरता येईल की नाही. याबाबत तज्ज्ञांचे मत काय आहे?

Lifestyle : आपल्या दैनंदिन जीवनात आपण बऱ्याच वस्तू बाजारातून आणतो. त्यापैकी अनेक खाद्यपदार्थ असे असतात. जे पॅकेटवर दिलेल्या वेळेआधी खाल्ले जातात. ज्याला आपण एक्सपायरी डेट म्हणतो. बरेच लोक अन्नाशी संबंधित कोणताही पदार्थ खरेदी करण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट तपासतात. जर त्या वस्तूची एक्सपायरी डेट जवळ आली असेल किंवा निघून गेली असेल तर साधारणपणे ती खरेदी केली जात नाही. पण काही वेळा काही वस्तू इतके दिवस घरात ठेवल्या जातात की त्यांची एक्स्पायरी डेट निघून जाते. अशा स्थितीत त्या वस्तूंची मुदत संपल्यानंतर वापरायची की नाही, असा संभ्रम अनेकांच्या मनात असतो. जाणून घ्या याविषयी तज्ज्ञ काय म्हणतात.

अशा पद्धतीने निश्चित होते एक्सपायरी डेट 

जेव्हा एखाद्या पदार्थाची एक्सपायरी डेट निघून जाते, तेव्हा सामान्यतः लोकांचा असा विश्वास असतो की, एक्सपायरी झाल्यानंतरही ती वस्तू आरोग्यासाठी लगेच हानिकारक ठरत नाही. असे मानले जाते की बऱ्याच गोष्टींमध्ये एक्सपायरी डेट सुरक्षिततेपेक्षा गुणवत्तेच्या आधारावर अधिक निश्चित केली जाते. उदाहरणार्थ, हे शक्य आहे की चिप्स किंवा बिस्किटे काही काळानंतर कुरकुरीत राहू शकत नाहीत, परंतु याचा अर्थ असा नाही की ते खाल्ल्याने तुम्ही आजारी पडाल. मात्र जर दूध किंवा मांस असेल तर ते लवकर खराब होऊ शकते. या गोष्टींमध्ये बॅक्टेरिया लवकर वाढू लागतात आणि त्यानुसार त्यांची एक्सपायरी डेट ठेवली जाते.

मसाले वर्षानुवर्षे खराब होत नाहीत

इंडिया टुडे वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार मुंबई येथील आहारतज्ज्ञ पूजा शाह भावे म्हणतात की, भारतातील लोक गव्हाचे पीठ, बेसन, रिफाइंड पीठ आणि रवा यांचे पॅकेट्स एक्सपायरी डेट लक्षात न ठेवता वापरतात. पूजा शाह भावे पुढे म्हणाल्या की, डाळी, पास्ता आणि तांदूळ यांसारखे नाशवंत अन्नपदार्थ कोरड्या, हवेशीर खोल्यांमध्ये ठेवल्यास ते कालबाह्य तारखेनंतरही चांगल्या स्थितीत राहू शकतात. नट, तेलबिया आणि रवा यांसारख्या गोष्टी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने त्यांचे शेल्फ लाइफ देखील वाढते. मसाल्यांबद्दल सांगायचे तर, ते वर्षानुवर्षे खराब होत नाहीत, परंतु पूजा यांनी असाही सल्ला दिला आहे की, एखाद्या वस्तूची एक्सपायरी डेट निघून गेली असेल तर आधी त्याचा वास आणि चव नीट तपासली पाहिजे. ती वस्तू कोणत्या स्थितीत दिसते हेही पाहिले पाहिजे.

एक्सपायरी डेट विविध चाचण्यांवर आधारित असते

तर न्यूट्रिशनिस्ट दीपाली शर्मा म्हणतात की, खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगची एक्सपायरी डेट अन्नाचा प्रकार, वापरलेले पॅकेजिंग, उत्पादन प्रक्रिया आणि नियामक मार्गदर्शक तत्त्वांसह अनेक घटकांद्वारे निर्धारित केली जाते. निर्मात्याला कोणत्याही गोष्टीचे शेल्फ लाइफ माहित असते. यासाठी वेगवेगळ्या स्टोरेज परिस्थितीनुसार चाचण्या आणि प्रयोग केले जातात. एक्सपायरी डेट विविध चाचण्यांवर आधारित आहे.

हेही वाचा>>>

Trending : काय रे भाऊ...रेस्टॉरंट्समध्ये दारूसोबत शेंगदाणे मोफत का देतात? कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर मध्यरात्री घेतले उपचार, आज आमरण उपोषणाचा 9 वा दिवस
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर मध्यरात्री घेतले उपचार, आज आमरण उपोषणाचा 9 वा दिवस
Devendra Fadnavis: 'उद्धव ठाकरे अन् शरद पवारांकडून ते लिहून घ्या, मग मदत करा'; देवेंद्र फडणवीसांचं मनोज जरागेंना आव्हान
उद्धव ठाकरे अन् शरद पवारांकडून ते लिहून घ्या, मग मदत करा; फडणवीसांचं मनोज जरागेंना आव्हान
गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
Horoscope Today 25 September 2024 : आजचा बुधवार खास! हा दिवस तुमच्यासाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा बुधवार खास! हा दिवस तुमच्यासाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव, माझा जिल्हा : 6.30 AM Superfast News : 25 Sept 2024ABP Majha Headlines : 6.30 AM : 25 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 11 PM : 24 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Metro 3 : मुंबईच्या पोटातून प्रवास, सुसाट, गारेगार ; मेट्रो 3 मार्गिकेचा ग्राऊंड रिपोर्ट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर मध्यरात्री घेतले उपचार, आज आमरण उपोषणाचा 9 वा दिवस
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर मध्यरात्री घेतले उपचार, आज आमरण उपोषणाचा 9 वा दिवस
Devendra Fadnavis: 'उद्धव ठाकरे अन् शरद पवारांकडून ते लिहून घ्या, मग मदत करा'; देवेंद्र फडणवीसांचं मनोज जरागेंना आव्हान
उद्धव ठाकरे अन् शरद पवारांकडून ते लिहून घ्या, मग मदत करा; फडणवीसांचं मनोज जरागेंना आव्हान
गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
Horoscope Today 25 September 2024 : आजचा बुधवार खास! हा दिवस तुमच्यासाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा बुधवार खास! हा दिवस तुमच्यासाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
प्रवाशांचा जीव भांड्यात, अखेर बीडमधून संभाजीनगरसाठी बससेवा सुरू; पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा
प्रवाशांचा जीव भांड्यात, अखेर बीडमधून संभाजीनगरसाठी बससेवा सुरू; पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा
Horoscope Today 25 September 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Nitin Gadkari : अमित शाह नागपुरात, नितीन गडकरी काश्मिरात; राज्यातील राजकारणापासून गडकरींना कोण दूर ठेवतंय? 
अमित शाह नागपुरात, नितीन गडकरी काश्मिरात; राज्यातील राजकारणापासून गडकरींना कोण दूर ठेवतंय? 
Shani 2024 : दिवाळीनंतर शनि चालणार सरळ चाल; 'या' 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्समध्ये होणार अफाट वाढ
दिवाळीनंतर शनि चालणार सरळ चाल; 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्समध्ये होणार वाढ
Embed widget