Nashik Accident | नाशिकमध्ये भीषण अपघात पाच जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
नाशिक मधल्या भीषण अपघाताची. नाशिक शहरात मुंबई आगरा महामार्गावर रविवारी रात्री एक भीषण अपघात घडला. टेंपो आणि लोखंडी सळयांची वाहतूक करणारा ट्रक यांच्यात घडलेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया.
नाशिक मधला मुंबई आगरा महामार्ग. वेळ रविवारी रात्री आठ वाजताची. महामार्गावर धुळ्यातून मुंबईच्या दिशेन एक ट्रक जात होता. या ट्रकवर... हजारो टन वजनाच्या लोखंडी सळया होत्या. तितक्यात मागून येणारा एक टेंपो ट्रकच्या मागच्या बाजूला धडकला आणि भेषण अपघात घडला. टेंपोतील पाच जण जागीच ठार झाले. रात्री आठ वाजेच्या दरम्यान नाशिकच्या द्वारका चौकाच्या उड्डाण पुलावर एक भीषण अपघात घडला. ऐसर गाडी आणि माल वाहतूक टेंपो या दोन वाहनांमध्ये अपघात घडलेला आहे. नाशिकच्या सिडको येथील काही रहिवासी सकाळी जे आहे ते नाशिकच्या निफाड तालुक्यात असलेल्या. गावात एका धार्मिक विधीसाठी गेले होते आणि तो धार्मिक विधी आटपून येताना हा अपघात घडलेला आहे. या टेंपोतील मंडळी निफाडवरून देवदर्शन करून परतत होती पण त्यांचा टेंपो या ट्रकला धडकला. या ट्रक मधल्या सळया काही फूट बाहेर होत्या. अपघात होताच या सळया टेंपोतील प्रवाशांच्या थेट शरीरात घुसल्या.
अपघातनंतर बचाव कार्य सुरू झालं. पण पाच जणांनी जागीच जीव गमावला. तर 13 जण अजूनही मृत्यूशी झुंझा. देत आहे. काल रात्री आठ सवा आठ च्या दरम्यान जो अपघात घडला त्याच्या संदर्भात आमच्याकडे 11 टोटल पेशंट्स आले होते. त्याच्यामध्ये पाच ब्रॉड डेड होते आणि त्याच्यामध्ये आमचे जे उरलेले सहा होते त्याच्यामधले आम्ही सगळ्यांना स्टेबल केलं. रात्रीतन आमच्याकडचे जे चार होते ते प्रायव्हेटला डिस्चार्ज ऑन रिक्वेस्ट गेले. आता सध्या स्थितीत आमच्याकडे दोन पेशंट डमिट आहेत. दोघं क्रिटिकल आहेत हेड इंजुरी आहे आणि एकाला फ्रॅक्चर फीमर आहे. दोघ आयसीयू मध्ये डमिट असून आम्ही प्रयत्न करत आहोत. हेड इंजरी कम्पोनंट सबसाईड झाल्यावर. अपघातनंतर महामार्गावर तब्बल पाच किलोमीटर च्या रांगा लागल्या होत्या. या अपघाताची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर केली आणि आरटीओ अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली. अधिकारीशी चर्चा करणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की एक मुंबईलाच सर्व राज्याचे अधिकारी आहेत, संबतचे मंत्री यांची बैठक घेऊन हे नियम नियम आहेत. त्या वेहिकल वरती नव्हते तर एक विशेष मोहीम राबवून रिफ्लेक्टर रेडियम बसवण्याची कार्यवाई करण्यात येणार आहे. शिवाय धोकादायक पद्धतीने माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अपघातनंतर आता दोषींवर काय कारवाई होते ते पाहाव लागेल शुभम बोडके एबीपी माझा नाशिक.
AI Translate