सावधान! रात्री उशिरापर्यंत जागरण पडेल महागात, लवकर मृत्यू होण्याचा धोका; संशोधनात 'ही' धक्कादायक बाब उघड
Bad Sleeping Habits : लोक दिवसा जागे असतात त्यांच्या तुलनेत रात्री जागणाऱ्या लोकांचा लवकर मृत्यू होण्याची शक्यता 9 टक्क्यांनी वाढते, असं एका संशोधनात समोर आलं आहे.
Late Night Sleeping Side Effects : दिवसभर धावपळ केल्यानंतर रात्रीच्या वेळी आपण झोपतो. झोपण्याच्या (Sleep) वेळेत आपलं शरीर रिचार्ज होतं. दररोज किमान सात ते आठ तास झोपणं गरजेच आहे. पण रात्री लवकर झोपणंही (Sleeping Habits) आवश्यक आहे. अनेक वेळा दिवसभरातील कामाचा थकवा आल्यानंतरही आपल्या झोप लागत नाही. तर काही जण मोबाईलवर टाइमपास करत वेळ घालवतात, यामुळे झोपायला उशीर होतो. रात्री उशिरापर्यंत जागे राहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ही वाईट सवय तुमच्या (Bad Sleeping Habits) जीवावर बेतू शकतो.
उशिरापर्यंत जागरण पडेल महागात
उशिरा झोपण्याच्या सवयीमुळे लवकर मृत्यू होण्याचा धोका असतो. एका संशोधनात ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. फिनलंडमध्ये झालेल्या एका संशोधनात धक्कादायक बाब समोर आली आहे. या संशोधनाच्या अहवालानुसार, जे लोक दिवसा जागे असतात त्यांच्या तुलनेत रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या लोकांचा लवकर मृत्यू होण्याची शक्यता वाढते. म्हणजेच रात्री लवकर झोपणाऱ्या व्यक्तींपेक्षा रात्री उशिरापर्यंत जागरण करणाऱ्यांच्या मृत्यूची शक्यता 9 टक्क्यांनी वाढते, असा दावा या संशोधनातून करण्यात आला आहे.
लवकर मृत्यूचा धोका वाढतो
फिनलंडमध्ये केलेल्या या संशोधनात असे समोर आले आहे. रात्री उशिरापर्यंत जागे राहणारे लोक दिवसा जागे राहणाऱ्या लोकांपेक्षा जास्त दारू आणि तंबाखूचे सेवन करतात. त्यामुळे याचं व्यसन जडते. संशोधनानुसार, रात्री उशिरापर्यंत जागे राहणाऱ्या लोकांना दारू आणि तंबाखू यांसारख्या चुकीच्या गोष्टींचं व्यसन लागते. इतकंच नाही तर या वाईट सवयींमुळे लवकर मृत्यू होण्याची शक्यता 9 टक्क्यांनी वाढते, असंही संशोधनाच्या अहवालात समोर आहे.
24,000 लोकांवर करण्यात आलं संशोधन
क्रोनोबायोलॉजी इंटरनॅशनलमध्ये या संबंधित संशोधनाचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या संशोधनामध्ये 1981 ते 2018 दरम्यान 24,000 जुळ्या मुलांच्या आरोग्यावर करण्यात आले. ज्यामध्ये त्याच्या झोपेच्या वेळा आणि सवयींबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. 1981 ते 2018 या 37 वर्षांच्या कालावधीत 8,728 मृत्यूची नोंद झाली. त्यावरून असे दिसून आले की, रात्री उशिरापर्यंत जागे राहणाऱ्या लोकांचा मृत्यू रात्री लवकर झोपलेल्या लोकांपेक्षा आधी झाल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.
मेलाटोनिन हार्मोनवर होतो परिणाम
संशोधकांनी दावा केला आहे की, जे लोक उशिरा झोपतात त्यांच्या शरीरात मेलाटोनिन हार्मोन उशिरा सोडलं जातं. आपल्या मेंदूमधून झोपेसाठी आवश्यक मेलाटोनिन हार्मोन तयार केलं जातं. हे हार्मोन झोपेला प्रवृत्त कर. मेलाटोनिन हार्मोन उशिरा सोडलं गेल्यामुळे झोप उशिरा येते, तसेच त्या व्यक्तीला सकाळी लवकर उठता येत नाही. अशा उशिरा उठणाऱ्या व्यक्ती सक्रिय राहत नाहीत, त्यांच्यामध्ये दुपारीनंतर किंवा संध्याकाळपर्यंत ऊर्जा येते. त्यामुळे त्यांच्या दिनचर्येवरही परिणाम होतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Sleep : माणूस झोपेशिवाय किती दिवस जगू शकतो? जागरणावरही आहे मर्यादा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )