एक्स्प्लोर

Sleep : माणूस झोपेशिवाय किती दिवस जगू शकतो? जागरणावरही आहे मर्यादा

Effect Of Going Days Without Sleep : झोप मानवांसाठी एक प्रकारचं इंधन म्हणून काम करते. पण, एखादी व्यक्ती अनेक दिवस झोपली नाही तर काय होईल, झोपेशिवाय मानवाचा मृत्यू होतो? जाणून घ्या...

How Long Person Can Go Without Sleep : आपण दिवसभरात विविध क्रिया करतो. श्वासोच्छवास, खाणं, पिणं, चालणं, बसणं, झोपणं (Sleep) या सर्वच क्रिया प्रत्येक मनुष्य करत असतो. प्रत्येक क्रियेमागे कारण आणि त्याचं महत्त्व आहे. ज्याप्रमाणे श्वास घेणं बंद केल्यावर आपला मृत्यू होऊ शकतो, पाण्याशिवायही मानवाचं जगणं कठीण आहे, त्याप्रमाणे शरीरासंबंधित इतरही अशा क्रिया आहेत, ज्या बंद केल्याने मृत्यचू धोका ओढवू शकतो. यातीलच एक म्हणजे झोप.

झोप मानवांसाठी एक प्रकारचं इंधन

झोप मानवांसाठी एक प्रकारचं इंधन म्हणून काम करते. यामुळे मनुष्याला ऊर्जा मिळते. झोपेमुळे व्यक्ती रिचार्ज होतो. यामुळे शरीराला आराम मिळतो त्यासोबतच थकवा आणि क्षीण दूर करण्यासाठीही मदत होते. झोपेमुळे माणसाने खर्चे केलेली ऊर्जा भरून काढण्यास मदत होते. पण, एखादी व्यक्ती अनेक दिवस झोपली नाही तर काय होईल. झोपेशिवाय मानवाचा मृत्यू होतो का याबाबत सविस्तर जाणून घ्या.

झोप आरोग्यासाठी आवश्यक

झोप (Sleep) ही मानवाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची क्रिया आहे. झोप आरोग्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही चुकून एखादा दिवस जागरण केलं तर दुसऱ्या दिवशी तुमच्या दिनचर्येवर फरक दिसून येतो. जागरणामुळे दुसऱ्या दिवशी तुम्हाला थकवा जाणवू लागतो. अशात तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे की, एखादा माणूस झोपेशिवाय किती दिवस राहू शकतो आणि झोपेशिवाय माणसाचा मृत्यू होऊ शकतो का?

अपुरी झोपही आरोग्यासाठी हानिकारक

अपुरी झोपही (Altered Sleep Cycle) आरोग्यासाठी हानिकारक आहे. उत्तम आरोग्यासाठी दररोज किमान 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. याहून कमी झोपेमुळे आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. अपुरी झोप अनेक आजारांना आमंत्रण ही ठरू शकते. यामुळे तुम्हाला ह्रदयविकार आणि ह्रदयासंबंधित इतर समस्या होण्याचा धोका असतो.

11 दिवस जागरण करू शकतो माणूस

एका रिपोर्टनुसार, माणूस 11 दिवस जागरण करू शकतो. एखादा व्यक्ती 11 दिवस न झोपता राहिला तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. संशोधनानुसार, जर एखाद्या व्यक्तीने झोपणं टाळलं तर, त्याला सुरुवातीचे काही दिवस जास्त अडचणी येतात. त्यानंतर शरीर कमकुवत होऊन अस्वस्थ वाटू लागतं. दहाव्या किंवा अकराव्या दिवशी माणसाचं मानसिक संतुलन बिघडलतं आणि बाराव्या दिवशी माणसाचा मृत्यू होईल.

स्लीप एक्सपेरिमेंट

दरम्यान, इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, एका व्यक्तीवर स्लीप एक्सपेरिमेंट म्हणजेच झोपेबाबतचा प्रयोग करण्यात आला होता. 1963 साली रँडी गार्डनर (Randy Gardner) या 17 वर्षीय तरुणावर हा प्रयोग करण्यात आला होता. तो 11 दिवस 25 मिनिटे झोपेशिवाय राहिला. रँडी गार्डनरच्या नावावर सर्वाधिक दिवस जागं राहण्याचा विक्रम आहे. 11 दिवसानंतर त्याला झोप अनावर झाली. या प्रयोगानंतर तो त्याच्या नियमित आयुष्यात परतला. यानंतर त्याच्या झोपेच्या सवयीमध्ये काही बदल दिसून आले.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

जपानमध्ये पती-पत्नी एकत्र झोपत नाहीत, कारण ऐकून चकित व्हाल

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात 192 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स, भाजप आमदाराचे महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे, म्हणाले..
गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात 192 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स, भाजप आमदाराचे महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे, म्हणाले..
Embed widget