Ice Bath Benefits : सेलिब्रिटींमध्ये आइस बाथची क्रेझ, बर्फाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे भन्नाट फायदे
Health Tips : अलिकडे अनेक सेलिब्रिटी आइस बाथ करताना दिसतात. बर्फाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे जाणून घ्या.
![Ice Bath Benefits : सेलिब्रिटींमध्ये आइस बाथची क्रेझ, बर्फाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे भन्नाट फायदे ice bath health benefits will surprise you know here marathi news Ice Bath Benefits : सेलिब्रिटींमध्ये आइस बाथची क्रेझ, बर्फाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे भन्नाट फायदे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/03/41b08a4217ad6bab9d872e29afa33b131704270935764322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ice Bath Tips : स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी रोज अंघोळ (Bath) करतात. प्रत्येकजण त्यांच्या आवडीनुसार आणि सोयीनुसार अंघोळीसाठी पाणी (Water) निवडतात. काही लोक गरम पाण्याने अंघोळ करतात तर काही साध्या पाण्याने अंघोळ करतात, पण तुम्हाला माहित आहे का की बर्फाच्या पाण्याने अंघोळ केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. अलिकडे अनेक सेलिब्रिटी आइस बाथ करताना दिसतात. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर याबाबत पोस्टही शेअर केल्या आहेत. बर्फाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे आश्चर्यकारक फायदे आहेत. हे फायदे सविस्तर जाणून घ्या.
ह्रदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
आइस बाथ म्हणजे बर्फाच्या पाण्याने अंघोळ करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे ह्रदयाचं आरोग्य सुधारते. आइस बाथमुळे ह्रदयाला फायदा मिळतो. बर्फाच्या पाण्याने अंघोळ केल्याने
पेरिफेरल रक्तवहिन्यासंबंधी प्रणाली (Peripheral Vascular System) सक्रिय करण्यास मदत होते, यामुळे तुमच्या हृदयाचे कार्य सुरळीत चालून आरोग्य सुधारण्यास मदत होते.
चांगली झोप येते
बर्फाच्या पाण्याने अंघोळ केल्याने झोप चांगली येते. बर्फाच्या पाण्याने अंघोळ केल्याने पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय होण्यासाठी मदत होते, ज्यामुळे रात्री चांगली झोप येऊ शकते.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
वजन कमी करण्यासाठी आइस बाथ फायदेशीर आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर बर्फाच्या पाण्याने अंघोळ करणे खूप फायदेशीर ठरेल. बर्फाच्या पाण्याने अंघोळ केल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते आणि तेही आहारात कोणताही बदल न करता.
स्मरणशक्ती आणि ऊर्जा वाढते
बर्फाच्या पाण्याने अंघोळ केल्याने मज्जासंस्थेवर आणि तणाव संप्रेरकांवर सकारात्मक प्रभाव पडतो, ज्यामुळे तुमचा मूड आणि ऊर्जा पातळी सुधारण्यास मदत होते. स्मरणशक्ती आणि ऊर्जा वाढवण्यासाठी बर्फाच्या पाण्याने अंघोळ करणे, हा उत्तम पर्याय आहे.
वेदनांपासून सुटका
व्यायामानंतर बर्फाच्या पाण्याने अंघोळ केल्यास स्नायू दुखी आणि सूज कमी होण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Momos : आवडीने मोमोज खाताय? तर सावधान! 'या' गंभीर आजाराचा धोका, मधुमेह रुग्णासाठी विष
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)