Hypertension and Heart Attack : वेळेवर उपचार न घेणं हे 70 टक्के हृदयविकाराच्या झटक्याचं कारण; न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स पॅनलच्या तज्ज्ञांचा दावा
Hypertension and Heart Attack : हृदयविकाराच्या झटक्यासाठी विविध पारंपरिक धोके जबाबदार असून अतितणाव हा प्रमुख घटकांपैकी एक आहे. हृदयाचं आरोग्य कायम देखरेखीखाली ठेवणे महत्त्वाचे असल्याचं न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स पॅनलच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
Hypertension and Heart Attack : "70 टक्के हृदयविकाराच्या झटक्याचं कारण हे वेळेवर उपचार न घेणं हे आहे," असा दावा न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स पॅनलच्या तज्ज्ञांनी केली आहे. हृदयविकाराच्या झटक्यासाठी विविध पारंपरिक धोके जबाबदार असून अतितणाव हा प्रमुख घटकांपैकी एक घटक जो हृदयाच्या आरोग्यावर विपरित परिणाम करतो. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणानुसार, मागील पंधरा वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीत, भारतात जवळपास 21 टक्के महिला आणि 24 टक्के पुरुष अतितणावाग्रस्त आहेत. तर 39 टक्के महिला आणि 49 टक्के पुरुषांमध्ये पूर्व-तणावाची स्थिती दिसते.
न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स पॅनल चर्चेत सदस्य मंडळाने सक्रिय सहभाग नोंदवत 'अतितणाव व हृदयविकार झटका' या विषयासंबंधी जागरुकता निर्मितीची आवश्यकता असल्याचं स्पष्ट केलं. आपल्या हृदयाचं आरोग्य कायम देखरेखीखाली ठेवणे महत्त्वाचे असल्याचा मुद्दा या चर्चेतून अधोरेखित करण्यात आला. वयोगट कोणताही असो, लोकांनी घरच्याघरी अॅम्ब्युलटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग (एबीपीएम) साठी उपलब्ध विविध उपकरणांद्वारे रक्तदाब तपासणं आवश्यक ठरतं. हृदयविकाराच्या झटक्यासाठी निरनिराळे पारंपरिक धोके जबाबदार असून अतितणाव हा प्रमुख घटकांपैकी एक घटक हृदयाच्या आरोग्यावर विपरित परिणाम करतो. कारण ही स्थिती शरीराच्या धमन्यांना प्रभावित करते.
उच्च रक्तदाब असल्यास रक्ताचा दबाव सातत्याने धमन्यांच्या भिंतींच्या विरुद्ध धक्का देत राहतो. हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जोराने कार्य करणे आवश्यक ठरते. काळानुरुप, हृदयावर पडणाऱ्या ताणामुळे हृदयाचे स्नायू कमकुवत होतात आणि त्यांची कार्यशीलता मंदावते. लवकरच अथवा काही काळाने, अतिताणाने बेजार झालेल्या हृदयाचे काम कायमचे थांबते.
मधुमेह, कोलेस्ट्रॉल, आळशी जीवनशैली, अतिमहत्त्वाकांक्षा तसेच ताण, नियमित अतिव्यायाम करणे, हवेचे प्रदूषण, धूम्रपान तसेच अनारोग्यदायक आहार आणि जीवनशैली ही हृदय विकारामागील प्रमुख कारणं आहेत.
फोर्टीस हॉस्पिटल्स मुंबई येथील कन्सलटंट इंटरवेंशनल कार्डिओलॉजी, डॉ. विवेक महाजन म्हणाले की, "अशी काही औषधे आहेत, जी रक्तदाबाशी संबंधित औषधासोबत घेतल्यास रक्तदाब वाढू लागतो. याला कारणीभूत ठरणाऱ्या वेदनाशामक गोळ्यांच्या काही वर्गवाऱ्या म्हणजे आयब्यूप्रोफेन तसेच डायक्लोफेनॅक इत्यादी. अतिताणाला कारणीभूत अन्य औषध गट म्हणजे नाकाद्वारे सर्दीसाठी घेण्यात येणारे ड्रॉप, गर्भनिरोधक गोळ्या तसेच जेष्ठमधासारखी काही आयुर्वेदिक औषधे आणि स्टेरॉइडस्”.
ते पुढे म्हणाले की, "आजच्या काळात अगदी शाळकरी विद्यार्थी देखील अतितणावग्रस्त असतात. अतिप्रमाणात खाणे, असंतुलित जीवनशैली, भाज्या आणि फळ सेवनाचा अभाव असे काही जोखमीचे घटक प्राथमिक स्वरुपातील अतितणावाला जबाबदार ठरतात. त्यामुळे कायम या वयोगटाकडे लक्ष देण्याची शिफारस करण्यात येते, जेणेकरुन अतितणावाला प्रतिबंध करण्याविषयीचे शिक्षण देऊन चांगले आरोग्यदायक जीवन जगता येईल.
न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स, क्लिनिकल अँड इमेजिंग सेंटरचे वैद्यकीय संचालक डॉ अजिथ के. एन. म्हणाले की, "आपल्या सर्वांना ठाऊक आहे, कधीही प्रतिबंध हा उपायापेक्षा बेहत्तर! त्यामुळे ठराविक अंतराने आपला रक्तदाब तपासून घेणे फार महत्त्वपूर्ण ठरते, काही लक्षणं दिसो अथवा न दिसो. त्यासोबत संतुलित जीवनशैली, मिठाचा आहारात समावेश तपासणं, मोसमातील फळं खाणं, पुरेशी झोप घेणं, योग्य वजन राखणं तसेच शारीरिक व्यायाम आपल्या पेशींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी, आरोग्यदायक राहण्याकरता तसंच रक्तदाब प्रतिबंधित करण्यासाठी साह्य करतो."
जर एखादी व्यक्ती औषधोपचार घेत असेल आणि दीर्घकाळ तिचा रक्तदाब स्थिर असेल तर आपण औषधे थांबवू नये, उलट तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, त्याचप्रमाणे सदस्य मंडळाने जारी केल्याप्रमाणे औषधांचं प्रमाण किंवा गोळ्या कमी करण्याविषयी विचारणा करता येईल. कारण अल्प रीडिंगकरिता अनेक वेगळे घटक जबाबदार असतात आणि ते स्थिर नसतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
World Hearth Day 2022 : नवजात बाळांच्या हृदयाची तपासणी जन्मतःच महत्त्वाची
Hypertension in Adults : तरूणांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण का वाढते? जाणून घ्या उपाय
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )