(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Hearth Day 2022 : नवजात बाळांच्या हृदयाची तपासणी जन्मतःच महत्त्वाची
World Hearth Day 2022 : जन्मजात नवजात बाळांमधील हृदयदोषांबद्दल मुलांच्या पालकांमध्ये जागरुकतेचा अभाव आहे. त्यामुळे वेळेवर आजार लक्षात न आल्याने बाळाच्या जीवावर बेतू शकतं. यासाठी जन्मानंतर नवजात बाळांची हृदयचाचणी करणं गरजेचं आहे, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत.
World Hearth Day 2022 : नवजात बाळांमध्ये जन्मजात हृदयासंबंधी आजार होत असल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. जन्मतः हदयविकार (Heart Disease)असणाऱ्या या बाळांना मृत्यूचा धोकाही अधिक असतो. परंतु, जन्मजात नवजात बाळांमधील हृदयदोषांबद्दल मुलांच्या पालकांमध्ये जागरुकतेचा अभाव आहे. त्यामुळे वेळेवर आजार लक्षात न आल्याने बाळाच्या जीवावर बेतू शकतं. यासाठी जन्मानंतर नवजात बाळांची हृदयचाचणी करणं गरजेचं आहे, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत. मुंबईतील गोरेगाव इथल्या एसआरव्ही हॉस्पिटलमधील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जयदीप राजेबहादूर यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
हृदयाची समस्या केवळ ज्येष्ठ नागरिक किंवा प्रौढांपुरतीच मर्यादित नाही तर लहान मुले आणि नवजात मुलांमध्येही आता ही समस्या प्रकर्षाने दिसू लागली आहे. तुम्हाला माहित आहे काय? सध्या नवजात बाळांमध्येही जन्मतः हृदयात दोष असल्याचं आढळून येत आहे. या आजारात बाळाच्या हृदयात छिद्र असते. ज्यावेळी बाळाचे हृदय शरीराला योग्य त्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवू शकत नाही, त्यावेळी बाळांना गंभीर जन्मजात हृदयरोग होतो.
लक्षणे :
गंभीर जन्मजात हृदयविकाराने आढळलेली बाळं जन्मतः निरोगी दिसू शकतात. परंतु काही दिवसांनी गंभीर लक्षणे दिसू शकतात. यात बाळाच्या त्वचेचा रंग निळसर पडणं, सायनोसिस, श्वास घेण्यास त्रास होणं, चेहरा किंवा हातापायाला सूज येणं ही लक्षणं दिसून येतात. या व्यतिरिक्त, डोळे, छातीत दुखणे, रक्तदाब कमी होणं, धाप लागणं आणि वजन कमी होणं ही सुद्धा काही लक्षणं बाळांमध्ये दिसू शकतात. बाळाला हृदयरोग असल्यास योग्य प्रमाणात वजन न वाढणं, वारंवार फुफ्फुसाचा जंतूसंसर्ग होणं, दूध पिताना खूप घाम येणं किंवा अर्धवट दूध पिणं अशी लक्षणं दिसतात. तर अनुवांशिकता, गरोदरपणात आईला ताप आल्यास, गरोदरपणात घातक औषधांचे सेवन, किरणे संपर्क, गर्भधारणेदरम्यान मधुमेह या कारणांमुळे बालकांमध्ये हृदयरोग होण्याची प्रमुख कारणं आहेत.
गंभीर जन्मजात हृदयरोगाची यंत्रणा गर्भाशयात हृदयाच्या अपुरी किंवा सदोष विकासाशी संबंधित आहे. हृदयाची निर्मिती कशी होते. याविषयी शरीराला सूचना देणार्या जनुकांमधील बदलांमुळे हे दिसून येते. गंभीर जन्मजात हृदयरोग देखील रसायने किंवा औषधे, संसर्ग किंवा बाळाच्या किंवा आईच्या इतर परिस्थितींमुळे होऊ शकतो.
गंभीर जन्मजात हृदयविकार असलेल्या बाळांसाठी स्क्रीनिंग का महत्त्वाचे आहे ते जाणून घ्या :
जन्मतः नवजात बाळांच्या हृदयाची तपासणी न केल्यास गंभीर समस्या उद्भवू शकता. यात बाळाला हृदयाचा झटका येणं, हृदयाची गती मंदावणं आणि शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ शकतो. याशिवाय बाळाचा आजार लवकर लक्षात न आल्यास काही दिवसात किंवा काही आठवड्यात बाळाचा मृत्यू होण्याची संभावना असते. त्यामुळे जन्मानंतर प्रत्येक नवजात बाळाची हृदय तपासणी करणं गरजेचं आहे. जेणेकरून हृदयासंबंधी विकार लक्षात आल्यास त्यावर तातडीनं उपचार करुन बाळाचे प्राण वाचवता येऊ शकतात.
डॉ. जयदीप राजेबहादूर, हृदयरोगतज्ज्ञ, एसआरव्ही हॉस्पिटल - गोरेगाव
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )