एक्स्प्लोर

मंत्रिपद जाताच केसरकरांना आणखी एक धक्का; गणवेशानंतर वह्यांची पानं जोडण्याचा निर्णयही रद्द होणार

पुस्तकाला वह्याचीपाने जोडणाऱ्या निर्णय रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून नव्या शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय  घेणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांना यंदा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात न आल्याने ते काहीसे नाराज झाले आहेत. त्यातच, गेल्याच आठवड्यात दीपक केसरकर यांनी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेश योजनेच्या निर्णयात बदल करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यावरुन, केसरकर यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच, हा निर्णय घेण्यापूर्वी माझ्याशी चर्चा तरी करायला हवी होती, असे म्हटले होते. आता, केसरकर यांनी घेतलेल्या आणखी एका निर्णयात बदल करण्यात येणार असल्याचे समजते. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून शालेय शिक्षणमंत्रीपदाचा पदभार दादा भुसे (Dada Bhuse) यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यानंतर, आता पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्यात आलेल्या निर्णयावर राज्य सरकारकडून फेरविचार सुरू असल्याची माहिती आहे. 

पुस्तकाला वह्याचीपाने जोडणाऱ्या निर्णय रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून नव्या शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय  घेणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एक राज्य एक गणवेश या निर्णयात बदल केल्यानंतर आता पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्याचा निर्णयावर सुद्धा फेरविचार सुरू झाला आहे. सन 2023- 24 या शैक्षणिक वर्षापासून  पुस्तकाला वह्याची पाने जोडण्याचा निर्णय  घेण्यात आला होता. जेणेकरून दप्तराचे ओझे कमी होईल, याशिवाय शिक्षकांकडून वर्गात शिकवलं जात असताना विद्यार्थ्यांकडून वह्यांमध्येच याच्या नोंदी घेतल्या जातील, असा उद्देश त्यावेळी सांगण्यात आला होता. मात्र, ज्याप्रकारे तज्ज्ञांकडून आणि काही अधिकाऱ्यांकडून या निर्णयासंदर्भात काही सूचना येत आहेत, हे पाहता या निर्णयावर फेरविचार केला जात असल्याची माहिती आहे. 

पुस्तकाला वह्यांची पाने छापण्याआधी ज्याप्रकारे कुठलीही वह्यांची पाने न जोडता पुस्तके छापली जायची, तशाच प्रकारची पुस्तके पुन्हा छापण्यासंदर्भात विचार केला जात आहे.नवे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबत चर्चा करून यावर शासन निर्णय जारी केला जाईल अशी माहिती आहे. त्यामुळे, दीपक केसरकर हे शालेय शिक्षणमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या दोन महत्त्वाच्या निर्णयात आता बदल करुन ते रद्द होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

शालेय शिक्षणमंत्री थेट वर्गातील बेंचवर

दरम्यान, शिक्षण खात्याचा पदभार मिळताच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे ग्रामीण भागातील शाळांमध्ये पोहोचले आहेत. वर्गातील बेंचवर बसून मुलांकडून त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेतील कवितांचे वाचनही करून घेतले. शिक्षकांच्या शाळेतील दप्तरांचीही तपासणी केली, मालेगाव तालुक्यातील देवरपाडे येथील ग्रामीण भागातील शाळांना दादा भुसे यांनी अचानक भेटी दिल्याचं पाहायला मिळालं. शालेय शिक्षण, आरोग्य तपासणी, विद्यार्थी पोषण आहार आदी अडचणी समजून घेतल्या. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ज्ञानदान वाढवा अशा सूचना शिक्षकांना मंत्रीमहोदयांकडून करण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा

वाल्मिक कराड माफिया, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या; राहुल गांधींचा दौरा अन् नाना पटोलेंची मागणी

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : 23 March 2025 : सर्वात महत्वाच्या घडामोडी लाईव्ह : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 01 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsRaj Thackeray on MNS | पक्ष बांधणीसाठी मनसेची नवी यंत्रणा, अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Devendra Fadnavis : तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !  जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !
Embed widget