स्वदेशी स्टाईलमध्ये फ्युचर सेट! पतंजलीचे नवे उपक्रम आरोग्य अन् शाश्वततेच्या वाटेवर भारताचं भविष्य कसं घडवतेय?
Patanjali: या उत्पादनांची परवडणारी किंमत आणि सहज उपलब्धता यामुळे ग्रामीण भागांसह शहरी भागातही उत्पादने लोकप्रिय झाली आहेत .

Patanjali news: भारतातील आरोग्य आणि शाश्वत क्षेत्रात क्रांती घडवत आहे.2006 मध्ये सुरू झालेली ही कंपनी आज आयुर्वेदिक उत्पादने, खाद्यपदार्थ आणि जीवनशैलीशी संबंधित नवनवीन शोध लावत देशाला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. असा दावा पतंजलीने केलाय .स्वदेशी आणि स्वावलंबी भारताच्या दृष्टिकोनातून पतंजलीने लाखो लोकांचा विश्वास जिंकला आहे . (Patanjali)
कंपनीने अलीकडेच न्यूट्रेला स्पोर्ट ब्रिंक आणि प्रीमियम ड्रायफ्रूट सारखी नवीन उत्पादने लॉन्च केली आहेत .जी तरुणांना तसेच आरोग्यविषयी जागरूक लोकांच्या पसंतीस उतरत आहे .ही उत्पादने अश्वगंधा तुळस आणि शतावरी सारख्या नैसर्गिक घटकांपासून बनवली आहेत .ची उत्पादन केवळ शारीरिक आरोग्यालाच प्रोत्साहन देत नाही तर मानसिक आणि अध्यात्मिक कल्याणालाही प्रोत्साहन देतात असा पतंजलीचा दावा आहे .या उत्पादनांची परवडणारी किंमत आणि सहज उपलब्धता यामुळे ग्रामीण भागांसह शहरी भागातही उत्पादने लोकप्रिय झाली आहेत .
हर्बल टी आणि सी बकथॉर्न सारखी पौष्टिक उत्पादने
शाश्वततेच्या क्षेत्रात पतंजली पर्यावरणासाठी आपली जबाबदारी दर्शवत आहे .मातीच्या भांड्यांना प्रोत्साहन देत आहे .जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत .पर्यावरणाला ही यातून हानी पोहोचत नाही .असं कंपनीने म्हटलं आहे .याशिवाय पतंजलीने संरक्षण संशोधन संघटना (DRDO) च्या सहकार्याने सैनिकांसाठी हर्बल टी आणि सी बकथॉर्न सारखी पौष्टिक उत्पादनेही विकसित केली आहेत .ही उत्पादने आरोग्यसह स्थानिक संसाधनांचा वापर करून आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देतात असं पतंजलीने सांगितलं.
पतंजली चा प्रभाव जागतिक स्तरावर ही वाढत असल्याचं कंपनीने सांगितलं आहे . पतंजलीचे उत्पादने 30 गुण अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात .ज्यामुळे आयुर्वेद आणि स्वदेशी ब्रँडची मागणी वाढली आहे .डिजिटल आणि ऑफलाइन मार्केटिंग च्या मदतीने पतंजलीने ग्रामीण भारताला सक्षम केलं असून रोजगाराच्या संधी वाढल्याचं पतंजलीनं सांगितलं .पुढील पाच वर्षात पतंजलीचे 50000 कोटी रुपयांची उलाढाल करण्याचे उद्दिष्ट आहे .ज्यामुळे भारताची अर्थव्यवस्था मजबूत होईल असा कंपनीचा दावा आहे.
आरोग्य आणि संस्कृतीला नवी ओळख
पारंपरिक आयुर्वेदाला आधुनिक विज्ञानाशी, संशोधनाशी जोडून पतंजलीने भारतीय आरोग्य आणि संस्कृतीला एक नवी ओळख दिली आहे .ही केवळ एक कंपनी नाही तर स्वदेशी,आरोग्य आणि शाश्वततेची चळवळ आहे जी भारताचे भविष्य उज्वल बनवत आहे असं पतंजलीने म्हटलं.
हेही वाचा:
Health Benefits Of Eating Crab: पावसाळ्यात खेकडे खाण्याचे जबरदस्त फायदे जाणून घ्या!
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























