एक्स्प्लोर

हार्ट अटॅक अचानक येत नाही! खूप आधीपासून शरीरात दिसतात धोक्याचे संकेत, तुम्हाला जाणवलीत का 'ही' लक्षणं?

Heart Attack: अनेकांना वाटतं की हार्ट अटॅक अचानक येतो पण हे खरं नाही! संशोधन सांगतं की, बहुतांश हृदयरोग हळूहळू वाढत जातात आणि त्यांची चिन्हं आधीच शरीरात दिसू लागतात

Heart Attack:आजच्या काळात असा क्वचितच कुणी असेल ज्याने आपल्या नात्यातल्या किंवा परिचयातील एखाद्या व्यक्तीच्या हार्ट अटॅकने मृत्यूची बातमी ऐकली नसेल. कधी विचार केलात का, आजकाल इतक्या कमी वयात लोकांना हार्ट अटॅक का येतो? फिट, हेल्दी दिसणारे लोकही क्षणार्धात कोसळतात आणि आपल्याला नवल वाटतं की “अरे, त्याला तर काहीच त्रास नव्हता!” आज अनेक तरुणवयीन लोकांनाही हार्ट अटॅक येतो आणि काहीजण आपला जीव गमावतात. पण खरंय की हार्ट अटॅक कधीच अचानक येत नाही. (Health News)

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, दरवर्षी सुमारे 1.79 कोटी लोक हार्ट अटॅकने मृत्यूमुखी पडतात. अनेकांना वाटतं की हार्ट अटॅक अचानक येतो आणि त्याची कोणतीही पूर्वसूचना मिळत नाही. पण हे खरं नाही! संशोधन सांगतं की, बहुतांश हृदयरोग हळूहळू वाढत जातात आणि त्यांची चिन्हं आधीच शरीरात दिसू लागतात.

हृदयरोगाचे संकेत वेळीच ओळखा 

दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक आलेल्या 99% लोकांमध्ये काही वर्षांपूर्वीच लक्षणं दिसत होती. त्यात उच्च रक्तदाब, साखरेचं प्रमाण वाढणं, कोलेस्ट्रॉल जास्त असणं किंवा धूम्रपानाची सवय ही मुख्य धोक्याची चिन्हं होती. डॉक्टर सांगतात की, या छोट्या पण महत्त्वाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास धोका वाढतो.

हार्ट अटॅकपूर्वी शरीर देतं हे संकेत:

- सतत थकवा जाणवणे किंवा उर्जेचा अभाव

- छोटं काम केल्यावरही श्वास लागणे

- छातीत फडफड किंवा हृदयाचे ठोके अनियमित होणे

- वारंवार छातीत जळजळ, अपचन

- उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल

- चालताना पायात गोळे येणे किंवा वेदना

- जबडा, हात किंवा छातीत घट्टपणा

- अचानक घाम येणे किंवा चिंताग्रस्त वाटणे

हार्ट अटॅक अचानक का येत नाही?

संशोधकांनी 90 लाखांहून अधिक दक्षिण कोरियन आणि हजारो अमेरिकन लोकांवर 20 वर्षांचा अभ्यास केला. निष्कर्ष असाच निघाला, हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात एक तरी संकेत आधी दिसतोच. अगदी रक्तदाब थोडा वाढला, साखर किंचित जास्त झाली किंवा कोलेस्ट्रॉल वाढलं तरीही ते हृदयरोगाचा संकेत मिळू शकतो. अमेरिकेतील डॉ. फिलिप ग्रीनलँड सांगतात, “ब्लड प्रेशर, शुगर किंवा कोलेस्ट्रॉल जरा जरी वाढलं तरी दुर्लक्ष करू नका. वेळेवर टेस्ट आणि उपचार केल्यास धोका कमी होतो.”

हार्ट अटॅकची मुख्य कारणं

हार्ट अटॅक एका कारणामुळे होत नाही. धूम्रपान, व्यायामाचा अभाव, जास्त तेलकट किंवा गोड पदार्थ, ताण-तणाव, अपुरी झोप आणि हाय ब्लड प्रेशर ही मुख्य कारणं आहेत. यापैकी एक-दोन सवयींचाही हृदयावर विपरीत परिणाम होतो आणि अर्टरीज ब्लॉक होऊ लागतात.

हार्ट अटॅकपासून बचाव कसा कराल?

या संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे की हार्ट अटॅक अचानक नाही येत, तो वर्षानुवर्षांच्या चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम असतो. म्हणूनच—

- नियमित आरोग्य तपासणी करा

- ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्ट्रॉल तपासत राहा

- आरोग्यदायी आहार घ्या, धूम्रपान टाळा

- दररोज थोडा व्यायाम करा

- ताण कमी ठेवा आणि पुरेशी झोप घ्या

असं केल्याने तुम्ही तुमचं हृदय फक्त आजच नव्हे, तर आयुष्यभर तरुण आणि निरोगी ठेवू शकता. 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
Multibagger Share : 66 रुपयांचा शेअर पाच वर्षात पोहोचला 2301 रुपयांवर,'या' मल्टी बॅगर शेअरनं 1 लाखांचे केले 35 लाख,गुंतवणूकदार मालामाल
66 रुपयांचा शेअर पाच वर्षात पोहोचला 2301 रुपयांवर,'या' मल्टी बॅगर शेअरनं 1 लाखांचे केले 35 लाख
Mumbai Crime Anant Garje: अनंत गर्जेंच्या घरी फॉरेन्सिक टीमची झाडाझडती, गौरी पालवेंनी फास घेतलेल्या पंख्याची उंची अन् वजन मोजलं, नेमकं काय घडलं?
अनंत गर्जेंच्या घरी फॉरेन्सिक टीमची झाडाझडती, गौरी पालवेंनी फास घेतलेल्या पंख्याची उंची अन् वजन मोजलं, नेमकं काय घडलं?
एका दिवसात सरकार पडू शकतं मग, नाशिकमध्ये संतप्त युवकाने एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला; उपमुख्यमंत्र्यांकडून आश्वासन
एका दिवसात सरकार पडू शकतं मग, नाशिकमध्ये संतप्त युवकाने एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला; उपमुख्यमंत्र्यांकडून आश्वासन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Palghar News : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन ते चार जखमी
Dharmendra Passes Away:धर्मेंद्र यांच्या पार्थिवार विले पार्लेच्या स्मशानभूमीत पार पडले अंत्यसंस्कार
Dharmendra Death News : धर्मेंद्र यांचं निधन,थोड्याच वेळात अंत्यसंस्कार : IANS वृत्त संस्था
Raj Thackeray Full Speech Parel : मतदार याद्यांवर लक्ष ठेवा, मराठी माणसांसाठी ही शेवटची निवडणूक
Hasan Mushrif : वॉर्डात कमी मतदान झालं तर खैर नाही, मतदारांना जेव्हा तंबी मिळते Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
Multibagger Share : 66 रुपयांचा शेअर पाच वर्षात पोहोचला 2301 रुपयांवर,'या' मल्टी बॅगर शेअरनं 1 लाखांचे केले 35 लाख,गुंतवणूकदार मालामाल
66 रुपयांचा शेअर पाच वर्षात पोहोचला 2301 रुपयांवर,'या' मल्टी बॅगर शेअरनं 1 लाखांचे केले 35 लाख
Mumbai Crime Anant Garje: अनंत गर्जेंच्या घरी फॉरेन्सिक टीमची झाडाझडती, गौरी पालवेंनी फास घेतलेल्या पंख्याची उंची अन् वजन मोजलं, नेमकं काय घडलं?
अनंत गर्जेंच्या घरी फॉरेन्सिक टीमची झाडाझडती, गौरी पालवेंनी फास घेतलेल्या पंख्याची उंची अन् वजन मोजलं, नेमकं काय घडलं?
एका दिवसात सरकार पडू शकतं मग, नाशिकमध्ये संतप्त युवकाने एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला; उपमुख्यमंत्र्यांकडून आश्वासन
एका दिवसात सरकार पडू शकतं मग, नाशिकमध्ये संतप्त युवकाने एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला; उपमुख्यमंत्र्यांकडून आश्वासन
Pakistan Army Video: पाकिस्तानी लष्करावर एकाचवेळी दोन आत्मघाती हल्ले; हल्लेखोर थेट मुख्यालयात घुसले, 3 कमांडो ठार
Video: पाकिस्तानी लष्करावर एकाचवेळी दोन आत्मघाती हल्ले; हल्लेखोर थेट मुख्यालयात घुसले, 3 कमांडो ठार
'तर भिंत फोडणार साहेब' कोल्हापूर विमानतळाला लागून रस्ता बंद झाल्याने तामगावकरांचा आक्रोश; गावकऱ्यांना 20-25 किमी वळसा घालायची पाळी
'तर भिंत फोडणार साहेब' कोल्हापूर विमानतळाला लागून रस्ता बंद झाल्याने तामगावकरांचा आक्रोश; गावकऱ्यांना 20-25 किमी वळसा घालायची पाळी
Gold Rate : सोन्याच्या दरात 1448 रुपयांची घसरण, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदी स्वस्त, जाणून घ्या नवे दर
सोन्याच्या दरात 1448 रुपयांची घसरण,आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदी स्वस्त, जाणून घ्या नवे दर
Solapur News : दोन मित्रांनी गळ्याला दोरी लावली, आधी गोरख गेला, मग दु:ख सहन न झाल्याने सुरेशनेही जीवन संपवलं, सोलापूर हादरलं
मोठी बातमी : दोन मित्रांनी गळ्याला दोरी लावली, आधी गोरख गेला, मग दु:ख सहन न झाल्याने सुरेशनेही जीवन संपवलं, सोलापूर हादरलं
Embed widget