Heart Attack Symptoms : हृदयविकाराची नेमकी कारणे कोणती ? जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाय
Heart Attack Symptoms : हृदयाची जर नीट काळजी घेतली नाही तर हृदयविकार हा सायलेंट किलरसुद्धा ठरू शकतो.
Heart Attack Symptoms : सध्याच्या धावपळीच्या जीवनात हृदयविकाराचे (Heart Attack) प्रमाण फार मोठ्या संख्येने वाढताना दिसते आहे. आपल्या आजूबाजूला हृदयविकारा (Heart Attack) संबंधित अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. नुकतेच गायक केके हे सुद्धा हृदयविकाराच्या झटक्यानेच (Heart Attack) त्यांचे निधन झाले. बदलती जीवनशैली, अवेळी जेवण, बाहरेचं खाणं या सगळ्या गोष्टी तर कारणीभूत आहेतच. पण, या बरोबरच अजून कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत. या संदर्भात डॉ. प्रताप सी. रेड्डी, अध्यक्ष, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप यांनी माहिती दिली आहे जाणून घ्या.
हृदयविकार (Heart Attack) ‘सायलेंट किलर’ ठरू शकतो का? (Heart Attack Symptoms)
सुमारे 75 टक्के रुग्णांना आपल्या या आजाराची कल्पना नसते, परिणामी केवळ एक चतुर्थांश रुग्ण आपल्यात दिसून येणाऱ्या लक्षणांवर कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय किंवा शस्त्रक्रियेचे उपचार घेत राहतात. आज, ‘इस्केमिक हार्ट डिसीज’ सारखे हृदय आणि रक्तवाहिन्या संबंधीचे रोग आणि ‘स्ट्रोक’ सारखे ‘सेरेब्रोव्हॅस्क्युलर इव्हेंट्स’ ही जागतिक स्तरावर मृत्यूची प्रमुख कारणे बनली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, जगभरातील या मृत्यूंपैकी एक पंचमांश मृत्यू भारतात होतात विशेषत: सर्वात चिंताजनक बाब अशी की हे सर्व भारतीय 20 ते 40 वयोगटातील तरुण आहेत आणि तरुणांमध्ये त्यांचे प्रमाण वाढते आहे.
हृदयक्रिया अचानक बंद पडण्याची कारणे?
सध्याच्या धावपळीच्या काळात अनेकदा शरीराकडे लक्ष देणे आपण टाळतो. यातूनच ताणतणाव, उच्च उष्मांक असलेला आणि असंतुलित आहार आणि कमी शारीरिक हालचाली यांसारख्या अनेक घटना हृदयविकाराच्या (Heart Attack) वाढीला कारणीभूत ठरत आहेत.
हृदयविकार (Heart Attack) प्रतिबंधक धोरणांमुळे टाळता येऊ शकतात का? (Heart Attack Symptoms)
हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने होणाऱ्या अकाली मृत्यूंपैकी 80 टक्के मृत्यू हे आरोग्याचे सक्रिय व्यवस्थापन आणि जोखीम कमी करण्यासाठीचे प्रतिबंधक धोरण यांमुळे टाळता येऊ शकतात. या जोखमीच्या घटकांचा प्रभाव कमी करण्यासाठी आपण आरोग्य संवर्धन आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला पाहिजे. आरोग्यविषयक मूलभूत स्थिती समजून घेतल्याशिवाय, केवळ वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित केलेले निरोगीपणाचे पारंपरिक कार्यक्रम यापुढे पुरेसे ठरणार नाहीत. विविध चाचण्यांची आणि त्वरीत निदानाची मजबूत क्षमता उभारणे, त्याचबरोबर जनजागृतीचे उपक्रम राबविणे यातून या दिशेने काही भरीव कार्य होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीचा कौटुंबिक इतिहास आणि त्याची जीवनशैली वेगवेगळी असते. त्यांचा सकारात्मक विचार करून एक प्रभावशाली कार्यक्रम तयार करणे, या व्यक्तींना विश्वासार्ह आरोग्य माहिती पुरविणे आणि स्वत:च्या आरोग्याची सक्रियपणे जबाबदारी घेण्यास त्यांना प्रोत्साहित करणे या गोष्टी करणे आवश्यक आहे.
आपत्कालीन परिस्थितीत काय कराल?
आपत्कालीन परिस्थितीत वेळ महत्वाचा असतो आणि रुग्णाने लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचणे महत्वाचे असते. सध्या ठिकठिकाणी ‘इमर्जन्सी कार्डियाक अॅम्ब्युलन्स’ सेवा मोफत उपलब्ध असते. रूग्णालयात नेण्यात येत असतानाही रुग्णावर तात्काळ स्वरुपात रूग्णवाहिकेत प्राथमिक उपचार करता येतात. प्रत्येकाने या अशा रुग्णवाहिका सेवांचे फोन नंबर जवळ ठेवले पाहिजेत; जेणेकरून आणीबाणीच्या काळात ही सेवा मिळविणे सोपे होईल.
महत्वाच्या बातम्या :
- Covid19 Update : बदलत्या ऋतूत वाढतोय कोरोनाचा धोका! आजार टाळण्यासाठी 'ही' खबरदारी घ्या
- Copper Water : तांब्याच्या भांड्यात पाणी किती वेळ ठेवणं फायदेशीर? तुम्ही करु नका 'ही' चूक
- Health Tips : मुलांचं वजन कमी होतंय? मुलं सारखी आजारी पडतायत? 'ही' आहेत यामागची कारणं
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )