Health Tips : PCOD/PCOS नेमका कशामुळे होतो? जाणून घ्या लक्षणं, कारणे, योगोपचार आणि निसर्गोपचार
Health Tips : पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS), ज्याला पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (PCOD) असेही म्हणतात. हा एक सामान्य हार्मोनल विकार आहे.
Health Tips : आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिला तसेच तरूणींमध्ये PCOD आणि PCOS चं प्रमाण वाढत चाललं आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS), ज्याला पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (PCOD) असेही म्हणतात. हा एक सामान्य हार्मोनल विकार आहे. हा Reproductive Harmones च्या असंतुलनामुळे होतो. ज्यामुळे विविध आरोग्य समस्या उद्भवतात. PCOS/PCOD हा सध्या सर्रास वापरला जाणारा शब्द आहे, ज्याचा प्रजनन संस्था आणि Metabolism शी संबंध आहे. पण PCOD/PCOS चा त्रास नेमका कशामुळे होतो? यावर लक्षणं आणि उपचार काय? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
PCOD/ PCOS म्हणजे काय?
PCOS/PCOD हा एक complicated endocrine disorder आहे ज्यामध्ये मासिक पाळीत अनियमितता, वाढलेली एंड्रोजन पातळी (पुरुष संप्रेरक) आणि अंडाशयात लहान द्रवाने भरलेल्या पिशव्या (सिस्ट) विकसित होतात. हे सिस्ट्स, हानिकारक नसले तरी ovulation वर परिणाम करू शकतात आणि PCOS/PCOD शी संबंधित हार्मोनल असंतुलनास हातभार लावू शकतात.
PCOD/ PCOS ची लक्षणं काय?
PCOS किंवा PCOD ची लक्षणे प्रत्येक स्त्रीमधे वेगवेगळी असू शकतात. जसे की,
- अनियमित मासिक पाळी
- चेहऱ्यावर पुरळ येणे
- वजन वाढणे
- डोक्यावरचे केस गळणे
- चिडचिडपणा वाढणे
PCOS/PCOD असलेल्या व्यक्तींना प्रजनन समस्या देखील येऊ शकतात. कारण Irregular ovulation मुळे गर्भधारणेत अडथळा येऊ शकतो. शिवाय, याचे metabollism वर सुद्धा परिणाम होतात, ज्यामुळे insulin resistance, टाईप 2 मधुमेह आणि हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधिचे आजार होण्याचा धोका वाढतो.
PCOD/ PCOS ची कारणं
PCOS/ PCOD नेमका कशामुळे होतो याचं कारण अद्याप स्पष्ट नाही. पण, अनुवांशिक (genetic) आणि पर्यावरणीय (environmental) दोन्ही घटक भूमिका बजावतात. Insulin resistance (जेथे शरीराच्या पेशी इंसुलिनला प्रभावीपणे प्रतिसाद देत नाहीत) बहुतेकदा PCOS/ PCOD शी जोडलेले असते. या व्यतिरिक्त, इन्सुलिनच्या अतिउत्पादनामुळे एंड्रोजनचे उत्पादन वाढू शकते, ज्यामुळे हार्मोनल असंतुलन वाढू शकते. याशिवाय बैठी जीवनशैली, अयोग्य आहार, मानसिक आणि शारीरिक ताण, व्यायामाचा अभाव, रात्री जागणे सुद्धा कारणीभूत ठरतात.
PCOS/ PCOD साठी योगासने
योग पीसीओडीचा सामना करणाऱ्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकतो. काही योगासने मानसिक ताण तणावाचे व्यवस्थापन करण्यास, हार्मोनल संतुलन सुधारण्यास आणि एकंदर स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी मदत करतात.
सूर्यनमस्कार
भुजंगासन (cobra pose),
पश्चिमोत्तनासन,
तितली आसन (butterfly pose),
विरभद्रासन (1 आणि 2) ,
राजकपोटासान (pigeon pose),
देवी आसन(Goddess pose),
उत्कटासन( chair pose),
मलासन,
PCOD/PCOS साठी निसर्गोपचार
- पोटावर थंड गरम पाण्याचा आलटून पालटून शेक घेणे.
- आहारात कच्या अन्नाचा जास्तीत जास्त समावेश करणे.
- आहारातून मांस, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वर्ज करणे.
- आहारातून गहू, मैदासारखे gluten युक्त घटक वर्ज करणे.
- झोपण्यापूर्वी नाभीमधे दोन थेंब एरंडेल तेल लावणे.
प्रतिबंध
आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये PCOS/ PCOD ला प्रतिबंध करण्याचा कोणताही हमी मार्ग नसला तरी, निसर्गोपचाराच्या तत्वांनुसार निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्याने जोखीम लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते आणि लक्षणे व्यवस्थापित करता येतात. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि निरोगी वजन राखणे हे महत्त्वाचे आहे. योग आणि ध्यान यांसारख्या पद्धतींद्वारे तणावाचे व्यवस्थापन करणे देखील योगदान देऊ शकते आणि PCOS/ PCOD चा प्रभाव कमी करू शकते.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )