Health Tips : वारंवार डोकेदुखीचा त्रास होतोय? होऊ शकतो मायग्रेनचा प्रकार; 'अशी' घ्या काळजी
Stress Migraine Treatment : मायग्रेन का होतो हे माहीत नसले तरी तुमचा ट्रिगर पॉईंट ओळखता आलात तर बर्याच अंशी तुमची चिंता दूर होऊ शकते.
![Health Tips : वारंवार डोकेदुखीचा त्रास होतोय? होऊ शकतो मायग्रेनचा प्रकार; 'अशी' घ्या काळजी Health tips Stress Migraine Treatment what helps migraines from stress marathi news Health Tips : वारंवार डोकेदुखीचा त्रास होतोय? होऊ शकतो मायग्रेनचा प्रकार; 'अशी' घ्या काळजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/07/247d9e6bb5b8d8d5923dfeeccb806803_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Stress Migraine Treatment : सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे अपुरी झोप, अपुरा आहार आणि वाढता तणाव यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेन यांसारख्या समस्या उद्भवू लागतात. मायग्रेन होण्याची अनेक कारणे आहेत. वेगवेगळ्या लोकांचे ट्रिगर पॉइंट्स देखील वेगवेगळे असतात. यामध्ये सर्वात सामान्य लक्षण म्हणजे तणाव. जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा डोकेदुखी सुरू होते. मायग्रेनमध्ये कधी डोक्याच्या एका बाजूला, कधी दोन्ही बाजूला तणाव जाणवतो. तर कधी डोळ्यात तीव्र वेदना होतात. ही वेदना अधूनमधूनही होऊ शकते. मायग्रेन का होतो हे माहीत नसले तरी तुमचा ट्रिगर पॉईंट ओळखता आलात तर बर्याच अंशी तुमची चिंता दूर होऊ शकते. मायग्रेनपासून सुटका कशी याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊयात.
तणाव मायग्रेनपासून मुक्त कसे व्हावे?
1. जीवन सक्रिय ठेवा : व्यायाम हा तणाव दूर करण्याचा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग आहे. दररोज सुमारे अर्धा तास चालणे, व्यायाम करणे किंवा इतर कोणतीही शारीरिक क्रिया करावी. यामुळे मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरद्वारे एंडोर्फिन तयार होतात, जे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करतात.
2. झोप महत्त्वाची : तणाव दूर करण्यासाठी पुरेशी झोप घेतली पाहिजे. आपण शांत झोप झोपली पाहिजे. जर तुमची झोपेची पद्धत विस्कळीत असेल तर त्यामुळे तणाव वाढतो आणि मायग्रेनची स्थिती निर्माण होते. त्यामुळे झोपेची काळजी घ्या. वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा. यासाठी कमीत कमी 8 तास चांगली झोप घेतली पाहिजे.
3. सकस आहार घ्या : तणाव दूर करण्यासाठी चांगला आहार घ्या. जेवण वेळेवर खा. आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. तुमच्या आहारात संपूर्ण धान्याचा समावेश करा. तुम्हाला जास्त कॅफिन आणि जंक फूड टाळावे लागेल.
4. मायग्रेनचे कारण ओळखा : तुम्हाला कधी आणि कोणत्या कारणांमुळे मायग्रेन होतो याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. यासाठी तुमची एक डायरी बनवा आणि त्यात तुमच्या ट्रिगर्स पॉइंटबद्दल लिहा. या काळात तुम्ही कोणते उपचार केले, ज्यामुळे तुम्ही बरे झाला आहात ते देखील लिहा. वेदना होण्यापूर्वी तुम्ही काय करत होता आणि तुम्हाला वेदना कधीपासून आराम मिळाला? या सगळ्या गोष्टींची नोंद घ्या.
5. योगाचा आधार घ्या : योगामुळे शरीर तर निरोगी राहतेच, पण तुमचे मनही निरोगी राहते. योगासने मनाला आराम मिळेल. दररोज योग, ध्यान आणि प्राणायाम करा, यामुळे तणाव आणि मायग्रेन दोन्हीमध्ये आराम मिळेल. जेव्हा तुम्हाला तणाव वाटत असेल तेव्हा तुमची आवडती गोष्ट करा. कोमट पाण्याने आंघोळ करा, यामुळे तुमच्या शरीराला आराम मिळेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Unhealthy Diet : सॉफ्ट ड्रिंक पिताय? तर सावधान! तुमचं वय होईल 12.4 मिनिटं कमी, कसं ते वाचा
- Strong Hair : केसांना मुळापासून मजबूत बनवा, 'या' टिप्स वापरा
- Heart Health : कोविड संसर्गामुळे वाढतो ह्रदयविकाराचा धोका, काय आहे यामागची कारणं?
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)