एक्स्प्लोर

Health Tips : पावसाळ्यात झपाट्याने पसरतोय 'अमेबियासिस'; जाणून घ्या या रोगाची लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाय

Amebiasis Infection : अमेबियासिस हा एंटामोईबा हिस्टोलिटिका नावाच्या प्रोटोझोआमुळे आतड्यांवरील परजीवी संसर्ग आहे.

Amebiasis Infection : पावसाळ्याचा (Rainy Season) ऋतू हा जसा मनाला आल्हाददायक सुख देतो तसाच अनेक आजारांनाही आमंत्रण देतो. पावसाळ्यात अनेक प्रकारचे संसर्गजन्य रोग पसरतात. या ऋतूत रोगांचा प्रादुर्भाव खूप होतो. पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेतली नाही तर अनेक प्रकारच्या संसर्गजन्य आजारांची लागण होऊ शकते. जसे की, ताप, सर्दी, खोकला यांसारखे सामान्य आजार तर पसरतातच. पण त्याचबरोबर पसरणारा आणखी एक रोग म्हणजे अमेबियासिस (Amebiasis). हा रोग नेमका काय आहे? त्याची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधक उपाय कोणते आहेत? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

अमेबियासिस म्हणजे काय?

अमेबियासिस हा एंटामोईबा हिस्टोलिटिका नावाच्या प्रोटोझोआमुळे आतड्यांवरील परजीवी संसर्ग आहे. या आजाराला 'अमीबिक डिसेंट्री' असेही म्हणतात. हा रोग होतो तेव्हा पोटदुखी, दुखणे आणि मल सैल होणे यांसारखी काही लक्षणं उद्भवतात. परजीवी जीवाणूंमुळे होणारा अमेबियासिस हा प्रामुख्याने पाण्यापासून होणारा आजार आहे. हा रोग संक्रमित पाणी पिणे आणि दूषित अन्नपदार्थ खाल्ल्याने होतो. ज्या ठिकाणी योग्य स्वच्छता नसते अशा ठिकाणी या रोगाचं प्रमाण जास्त असते. हा परजीवी मोठ्या आतड्यात शिरकाव करतो. त्यानंतर शरीराच्या अनेक प्रणालींवर परिणाम करतो. अमेबियासिसने पीडित व्यक्तीच्या पोटात हा रोग झाल्यानंतर 1 ते 4 आठवड्यांनंतर याची लक्षणे दिसतात. असे असले तरी मात्र, केवळ 10 ते 20 टक्के लोक अमेबियासिसमुळे आजारी पडतात.

अमेबियासिस रोगाची लक्षणे कोणती?

  • ओटीपोटात प्रचंड वेदना आणि जळजळ होणे
  • अतिसाराचे वाढते प्रमाण
  • स्टूलसह तीव्र रक्तस्त्राव
  • उजव्या ओटीपोटात तीव्र वेदना जाणवणे
  • उच्च ताप येणे
  • उलट्या होणे
  • चक्कर येणे
  • भूक न लागणे

'या' गोष्टी लक्षात ठेवा

  • टॉयलेट सीट नियमितपणे स्वच्छ करा.
  • पावसाळ्यात सार्वजनिक स्वच्छतागृहे वापरणे टाळा.
  • नेहमी हात धुतल्यानंतरच अन्नपदार्थांचं सेवन करा.
  • बाळाचे डायपर बदलल्यानंतर कोमट पाण्याने हात धुवा.
  • बाहेरून आलेली फळे आणि भाज्या चांगल्या प्रकारे धुवा.
  • बाहेरचे तिखट, तेलकट अन्नपदार्थ  खाणे टाळा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Ghee Beauty Benefits : तूप खाऊन येईल रुप... ग्लोईंग त्वचा आणि डार्क सर्कलपासून सुटका हवीय, तुपाचा असा करा वापर

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar यांना धक्का, MIDC तील भूखंड सत्तारांच्या संस्थेला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळलाSantosh Banger : हिंगोलीच्या कळमनुरीचे महायुतीचे उमेदवार संतोष बांगर यांचं शक्ती प्रदर्शनSolapur : सोलापुरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलंNitin Raut With Family : चिमुकल्या नातीसह नितीन राऊत नागपूरमध्ये प्रचाराच्या मैदानात Nagpur

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
Viral Video : इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
Kalicharan Maharaj Speech: कालीचरण महाराजांची मनोज जरांगेंवर दातओठ खात टीका, म्हणाले, मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस
मनोज जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस; कालीचरण महाराजांचा हल्लाबोल
Rahul Gandhi: 'एक है तो सेफ है'च्या मागे मोदी-अदानींचा फोटो, महाराष्ट्राची तिजोरी दाखवली, शेवटच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मिसाईल सोडलं
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधींनी मिसाईल सोडलं, मोदी-अदानींचा फोटो दाखवत रान उठवलं
Jalgaon Crime : मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
Embed widget