Viral Video : इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
नवा कर्णधार मोहम्मद रिझवानची नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे मालिका 2-1 ने जिंकून इतिहास रचला होता.
Mohammad Rizwan Viral Video : नवा कर्णधार मोहम्मद रिझवानची नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे मालिका 2-1 ने जिंकून इतिहास रचला होता. पण ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध टी-20 मालिका जिंकून त्याचा बदला घेतला. सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 13 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या पराभवामुळे मोहम्मद रिझवानच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरंतर, व्हायरल झालेल्या मुलाखतीत पत्रकाराने रिझवानला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याबद्दल त्याचे मत विचारले. पण तो दुसरच काहीतरी बडबडत होता. ज्याचा हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
भारतीय बिझनेस टायकून हर्ष गोयनका यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी लिहिले की, "पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिजवान काय म्हणत आहे ते तुम्हाला समजत असेल तर मला कळवा." आतापर्यंत ही पोस्ट 4 लाख 62 हजार 900 लोकांनी पाहिली आहे आणि जवळपास 3 हजार 'लाइक्स आहे.
If you can understand what the Pakistan captain Mohammad Rizwan is saying do let me know 😄😀😀 pic.twitter.com/wbNfpkkjvM
— Harsh Goenka (@hvgoenka) November 16, 2024
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गुडघे टेकावे लागले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद मिळण्याची आशा सध्या पीसीबीसाठी दूरची वाटत आहे. 8 संघांच्या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला न पाठवण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयानंतर पीसीबी असहाय्य दिसत आहे. पीसीबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) संपर्क साधला, परंतु कोणताही निकाल लागला नाही. असा अंदाज वर्तवला जात आहे की भारताशिवाय ही स्पर्धा पीसीबीसाठी आयसीसीसह मोठ्या तोट्याची ठरेल, ज्यामुळे एकतर हायब्रीड मॉडेल स्वीकारले जाईल किंवा यजमानपद दुसऱ्या देशाकडे सोपवले जाईल.
पीसीबीला ट्रॉफी टूरमध्येही करावा लागला बदल
बीसीसीआयच्या आक्षेपानंतर आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी फिरवण्यासाठी पीसीबीच्या 'ट्रॉफी टूर'मध्ये बदल केला. खरंतर, भारताने ज्या भागात दावा केला आहे, म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर (POK) तेथेही ट्रॉफी फिरवण्याचा पाकिस्तानचा हेतू होता. आयसीसीने यावर तात्काळ कारवाई करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ट्रॉफी कोणत्याही वादग्रस्त ठिकाणी नेण्यास मनाई केली.
हे ही वाचा -