Abdul Sattar यांना धक्का, MIDC तील भूखंड सत्तारांच्या संस्थेला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळला
अब्दुल सत्तारांना आणखी एक धक्का
औद्योगिक वसाहतींमधील भूखंड देण्याचा सत्तारांचा प्रस्ताव एमआयडिसीने फेटाळून लावला
छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा आणि वाळुज या दोन औद्योगिक वसाहतींमधील ३४ व ३५ हजार चौरस मीटरचा सत्तारांनी दिला होता प्रस्ताव
सत्तारांच्या नॅशनल एज्युकेशन संस्थेस भूखंड देण्याचा होता प्रस्ताव
विधानसभा निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आला होता प्रस्ताव
Maharashtra Assembly Election 2024 : अब्दुल सत्तारांना निवडणूक आयोगाचा झटका! 24 तासांचा वेळ; अडचणी वाढल्या, काय आहे प्रकरण?
सिल्लोड: शिवसेना शिंदे गटाचे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील (Sillod Assembly Constituency) उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यात मालमत्तेची माहिती लपवल्याची तक्रार सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने ई- मेलद्वारे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आणि सिल्लोड येथील निवडणूक अधिकारी यांना 24 तासांच्या आत अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. आता प्रशासनामार्फत काय अहवाल दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी (Sillod Assembly Constituency) उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यात मालमत्तेची माहिती लपवल्याची तक्रार करणारे तक्रारदार शंकरपेल्ली यांनी सांगितले की, याबाबत लवकरच सिल्लोड दिवाणी तथा फौजदारी न्यायालयात लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 मधील तरतुदी अनुसार फौजदारी खटला दाखल करण्यात येईल. त्याचबरोबर, उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणाक आहे.