Ghee Beauty Benefits : तूप खाऊन येईल रुप... ग्लोईंग त्वचा आणि डार्क सर्कलपासून सुटका हवीय, तुपाचा असा करा वापर
Ghee Skin Care Benefits : तूप आरोग्य उत्तम राखण्यासोबतच तुमची त्वचा सुंदर बनवण्यासाठीही उपयोगी आहे.
Ghee Beauty Secrets and Skincare Tips : त्वचा निरोगी आणि सुंदर (Beauty Tips) बनवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. काही जण घरगुती उपाय करतात तर काही जण बाजारातील महागडे प्रोडक्ट्स वापरतात. पण सुंदर त्वचेसाठी तूप (Ghee) हा एक उत्तम उपाय आहे. तुपाचा वापर संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात स्वयंपाकासाठी केला जातो. तूप हे एक सुपरफूड मानले जाते कारण ते शरीराच्या चांगल्यासाठी कार्य करणारे विविध पोषक तत्वांनी समृद्ध आहे. तूप खाण्याचे विविध फायदे तुम्ही ऐकले असतील पण, तूप तुमची त्वचा सुंदर बनवण्यातही मदत करते, हे तुम्हाला माहिती आहे का? तूप आरोग्य उत्तम राखण्यासोबतच तुमची त्वचा सुंदर बनवण्यासाठीही उपयोगी आहे.
स्किन केअरसाठी तूप वापरा
तुम्ही थेट त्वचेवर तूप लावू शकता आणि याचा काहीही दुष्परिणाम होणार नाही. तुम्ही तुपाचे फेस पॅकही बनवू शकता.
तूप आणि हळद फेस पॅक
तूप आणि हळदीचा फेस पॅक त्वचेसाठी सर्वोत्तम आहे. एक चमचे हळदीमध्ये 2 चमचे तूप मिसळून पेस्ट बनवा. हे चेहऱ्यावर लावून मसाज करा आणि 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. याशिवाय एका भांड्यात दोन चमचे तूप, दोन चमचे बेसन एकत्र करूनही तुम्ही फेस पॅकही बनवू शकता.
तुपाचे 5 फायदे
डार्क सर्कलपासून सुटका
डोळ्यांखाली काळे डाग म्हणजेच डार्क सर्कलच्या समस्येपासून सुटका हवी असेल, तर तूप उत्तम उपाय आहे. डार्क सर्कलवर रोज तुप चोळल्यास तर त्वचेला चमक येऊन काळे डाग दूर होतील. याचा दररोज वापर केल्यास हळूहळू काळ्या डार्क सर्कलपासून सुटका होईल.
कोरड्या त्वचेपासून मुक्ती
तुपामध्ये व्हिटॅमिन ए आणि फॅटी ऍसिड असतात, यामुळे ते उत्कृष्ट नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. हे त्वचेला दीर्घकाळ हायड्रेशन देते आणि कोरड्या त्वचेची समस्या दूर करते. आंघोळ करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेवर हळुवारपणे तूप लावून मसाज करू शकता, यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार होईल.
फाटलेल्या ओठांपासून मुक्ती
कोरड्या आणि फाटलेल्या ओठांच्या समस्येवर तूप खूप उपयुक्त ठरेल. मॉइश्चरायझिंग गुणधर्म असलेले तूप तुमच्या फाटलेल्या ओठांची समस्या दूर करेल. तूप लावल्याने ओठ मऊ होतात.
त्वचा होईल ग्लोईंग
तुपातील काही गुणधर्म असतात त्वचेची लवचिकता सुधारतात, यामुळे त्वचा ग्लोईंग होईल. तुपातील व्हिटॅमिन ए, डी आणि ई तसेच अँटिऑक्सिडंट्स चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी प्रभावी आहेत.
डिटॉक्स
तूप सूपरफूड आहे. तुपात जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक फॅटी ऍसिड असतात. यामुळे पचनसंस्थेला मदत होते आणि तेव्हा तुमच्या शरीरातून सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचा स्वच्छ होते.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )