एक्स्प्लोर

Health Tips: तुम्हालाही सकाळी अंथरुणातून उठावसं वाटत नाही? 'या' आजारांपैकी एक असू शकतं कारण; 'ही' गोष्ट बनवेल सक्रिय

Health Tips: तुम्हालाही सकाळी लवकर जाग येत नसेल, अंथरुणातून बाहेर यावसं वाटत नसेल किंवा सकाळी संपूर्ण शरीर जड वाटत असेल तर काळजी घ्या, कारण हे एक-दोन नाही तर 10 आजार याला कारणीभूत ठरू शकतात.

Morning Fatigue: बिझी शेड्युल आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे (Stressful Lifestyle) सकाळी झोपेतून (Sleep) उठणं कठीण होतं. सकाळी उठताना शरीर खूप जड झाल्यासारखं वाटतं, अंथरुण सोडावंसं वाटत नाही. बर्‍याचदा लोक ही एक सामान्य समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. तुम्हालाही सकाळी उठावसं वाटत नसेल तर ही काही आजारांची सुरुवातीची लक्षणं असू शकतात, त्याबद्दल जाणून घेऊयात...

सकाळी उठता न येणं 'या' आजारांची लक्षणं

  • मधुमेह (Diabetes)
  • नैराश्य (Depression)
  • कर्करोग (Cancer)
  • मल्टीपल स्क्लेरोसिस
  • चिंता विकार (Anxiety Disorder)
  • किडनी रोग
  • फायब्रोमायल्जिया
  • क्रॉनिक फटीग सिंड्रोम
  • स्लीप एपनिया
  • हायपोथायरॉईडीझम

अशा प्रकारे दूर करा थकवा

क्रॉनिक फटीग सिंड्रोम (Chronic Fatigue Syndrome) किंवा स्लीप एपनियामुळे (Sleep Apnea) तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल, तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी मनुक्यांचं (Raisin Water) पाणी प्यावं. यामुळे शरीरातील कमतरता दूर होऊन ऊर्जा मिळते. हे प्यायल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला सक्रिय (Active) आणि निरोगी (Healthy) वाटू लागेल. मनुक्यांच्या पाण्यात भरपूर नैसर्गिक साखर उपलब्ध असते. रिसर्च गेटच्या मते, मनुका शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देऊ शकते.

स्लीप एपनियामध्ये मनुका फायदेशीर

जर तुम्ही जोरात घोरत असाल तर स्लीप एपनिया होऊ शकतो. यामुळे गाढ झोप येत नाही आणि झोपेच्या कमतरतेमुळे दुसऱ्या दिवशी थकवा आणि आळस येतो. मनुक्यांमध्ये मेलाटोनिन आढळते, जे गाढ झोपेसाठी आवश्यक आहे. या हार्मोनमुळे त्वचा निरोगी राहते.

लोहाची कमतरता होईल दूर

मनुक्यांच्या पाण्यात भरपूर प्रमाणात लोह (Iron) असतं. शरीराला चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी लोह आवश्यक आहे. लोहाच्या कमतरतेमुळे रक्त निर्मिती देखील थांबू शकते आणि सकाळी उठणं देखील कठीण होऊ शकतं, त्यामुळे रोज सकाळी मनुक्यांचं पाणी (Raisin Water) प्यावं.

मनुका पाण्याचे फायदे

मनुक्यांमध्ये फेरुलिक अ‍ॅसिड, रुटिन, क्वेर्सेटिन आणि ट्रान्स-कॅफ्टेरिक अ‍ॅसिड आढळतात. हे सर्व अँटिऑक्सिडंट शरीरात पोहोचून कर्करोग, टाईप 2 मधुमेह आणि अल्झायमरपासून शरीराचं संरक्षण करण्यास मदत करतात. यामुळे वृद्धापकाळानंतरही शरीर निरोगी राहतं.

मनुक्यांचं पाणी कसं बनवायचं?

मनुक्यांचं पाणी बनवणं खूपच सोपं आहे. 4 ते 5 मनुके एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. तुम्हाला वाटल्यास तुम्ही पाणी प्यायल्यानंतर भिजवलेले मनुकेसुद्धा खाऊ शकता. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Health : तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकता, सोशल मीडियावर झपाट्याने ट्रेंड होणारा Cozy Cardio! जाणून घ्या

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : लहान मुलांमध्ये आढळतायत किडनीचे विकार; पालकांनी 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
लहान मुलांमध्ये आढळतायत किडनीचे विकार; पालकांनी 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
Health Tips : शहरी भारतातील लठ्ठपणा : वजन कमी करणे दिवसेंदिवस का कठीण होतंय? वाचा तज्ज्ञांचं मत
शहरी भारतातील लठ्ठपणा : वजन कमी करणे दिवसेंदिवस का कठीण होतंय? वाचा तज्ज्ञांचं मत
World Health Day 2026: काय सांगता! धुम्रपान न करणाऱ्यांचे फुफ्फुस सुद्धा धोक्यात? कारण जाणून व्हाल थक्क, तज्ज्ञ सांगतात...
काय सांगता! धुम्रपान न करणाऱ्यांचे फुफ्फुस सुद्धा धोक्यात? कारण जाणून व्हाल थक्क, तज्ज्ञ सांगतात...
Health: सावधान! नॉन-स्टिक भांड्यांवरील एक लहान स्क्रॅचही 'कॅन्सर' चं कारण ठरतंय? आरोग्यासाठी धोक्याची घंटा, तज्ज्ञांचा इशारा..
सावधान! नॉन-स्टिक भांड्यांवरील एक लहान स्क्रॅचही 'कॅन्सर' चं कारण ठरतंय? आरोग्यासाठी धोक्याची घंटा, तज्ज्ञांचा इशारा..

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Taxi And Rickshaw Licenses: मराठी लिहिता वाचता येत नसेल रिक्षा अन् टॅक्सी चालकांचे लायसन्स होणार रद्द; राज्य सरकारच्या निर्णयाला रिक्षा, टॅक्सी चालक-मालक संघटनांचा विरोध
मराठी लिहिता वाचता येत नसेल रिक्षा अन् टॅक्सी चालकांचे लायसन्स होणार रद्द; राज्य सरकारच्या निर्णयाला रिक्षा, टॅक्सी चालक-मालक संघटनांचा विरोध
Supriya Sule son in Law: सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या जावयाच्या कंपनीसोबत राज्य सरकारचा आणखी एक करार, साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक
सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या जावयाच्या कंपनीसोबत राज्य सरकारचा आणखी एक करार, साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक
Jalgaon Crime News : 600 बनावट शिक्षकांची भरती अन् कोट्यवधींचा पगार लाटला; शालार्थ घोटाळ्यात 48 अधिकाऱ्यांना एसआयटीची नोटीस
600 बनावट शिक्षकांची भरती अन् कोट्यवधींचा पगार लाटला; शालार्थ घोटाळ्यात 48 अधिकाऱ्यांना एसआयटीची नोटीस
Sahar Shaikh Mumbra AIMIM: कैसा हराया...सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात; निवडणूक लढवताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल, नेमकं प्रकरण काय?
कैसा हराया...सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात; निवडणूक लढवताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल, नेमकं प्रकरण काय?
4000 कोटींच्या 'रामायण'चा 'तो' अभिनेता, ज्याला 8 वर्षांपूर्वी कोणी ओळखतंही नव्हतं; मग 1200 कोटींच्या फिल्ममधून देशभरात गाजला, अन् मानधनच घेतो 100 कोटी
4000 कोटींच्या 'रामायण'चा 'तो' अभिनेता, ज्याला 8 वर्षांपूर्वी कोणी ओळखतंही नव्हतं; मग 1200 कोटींच्या फिल्ममधून देशभरात गाजला अन्...
Rupali Chakankar On Ashok Kharat Case: बहिणीची 8 तास चौकशी, आता रुपाली चाकणकर मनातलं सगळं बोलून गेल्या, 28 दिवसांनी काय काय म्हणाल्या?
बहिणीची 8 तास चौकशी, आता रुपाली चाकणकर मनातलं सगळं बोलून गेल्या, 28 दिवसांनी काय काय म्हणाल्या?
CSK Vs KKR : कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
Ashok Kharat and Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 फोन कॉल, सगळ्यात मोठा कॉल 22 मिनिटांचा, अंजली दमानियांनी सगळंच बाहेर काढलं
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 फोन कॉल, सगळ्यात मोठा कॉल 22 मिनिटांचा, अंजली दमानियांनी सगळंच बाहेर काढलं
Embed widget