(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : तणाव दूर करण्यासाठी 'हे' उपाय करा; वाचा सविस्तर
Strees Buster Tips : आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यात तणाव असतो, परंतु तुमच्या जीवनशैलीत काही सवयींचा समावेश करून तुम्ही तणाव दूर करू शकता.
Strees Buster Tips : आजकाल प्रत्येकजण वाढत्या तणावामुळे त्रस्त आहेत. ऑफिसमध्ये काम आणि बिझनेस दरम्यान लोकांना छोट्या-छोट्या गोष्टींचा ताण येऊ लागतो, पण तुम्हाला माहीत आहे का की, जर तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात टेन्शनमध्ये राहत असाल तर तुमच्या काही सवयी बदला आणि काही नवीन चांगल्या सवयी लावा. ज्यामुळे तुम्हाला तणाव कमी होण्यास मदत होईल. तणावमुक्त आयुष्य जगण्यासाठी हे उपाय करा.
1. तणावाचे वर्चस्व होऊ देऊ नका
आजकाल तणाव हा जीवनशैलीचा एक भाग बनला आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारच्या तणावाचा सामना करत आहे. अशा स्थितीत तुम्ही तणावाखाली एकटे आहात असा विचार करू नका हे महत्त्वाचे आहे. दुसरे म्हणजे, लक्षात ठेवा की तुम्ही तणावाबद्दल जितका कमी विचार कराल तितके चांगले आहे. यासाठी स्वतःला व्यस्त ठेवणे देखील आवश्यक आहे. जितका मोकळा वेळ असेल तितके नकारात्मक विचार तुमच्या मनात येतात. शक्य असल्यास स्वतःला काही कामात गुंतवून ठेवा.
2. तुमच्या आवडीची कामे करा
व्यस्त जीवनशैलीत कधी कधी छंद पूर्ण करायला वेळ मिळत नाही. पण, जर तुम्ही तणावात राहत असाल तर तुमच्या आवडीच्या कामासाठी थोडा वेळ नक्कीच द्या. यामुळे मनाला आराम मिळतो आणि मन काम करत असताना फील गुड फॅक्टर येतो.
3. गोंधळ करू नका.
आयुष्यातील काही ताणतणाव कमी करायचा असेल, तर घर आणि मन दोन्हीमध्ये गोंधळ होऊ देऊ नका. मनात येणारे निरुपयोगी विचार स्वच्छ करण्यासाठी तार्किक पद्धतीने म्हणजेच प्रॅक्टीकल विचार करा. भावना मध्ये येऊ देऊ नका. मन जितके स्वच्छ राहील तितके सोपे होईल. हा दृष्टिकोन घरात ठेवा, कोणत्याही कामाशिवाय घरात जास्त सामान जमा होऊ देऊ नका. घर स्वच्छ ठेवल्याने चांगली भावनाही येते आणि कामाचा ताण वाढत नाही, त्यामुळे तणाव कमी होतो.
4. तणाव टाळण्यासाठी योग करा.
ध्यान करणे खूप फायदेशीर आहे, तर नित्यक्रमात योग किंवा ध्यानासाठी थोडा वेळ नक्कीच काढा. तुम्हाला आवडत असल्यास, तुम्ही आध्यात्मिक पुस्तके वाचू शकता किंवा व्हिडिओ पाहू शकता. या प्रकारच्या क्रियाकलापाने मनाला शांती मिळते आणि मन शांत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Summer Skin Care : त्वचा सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी घरीच बनवा 'हे' स्क्रब
- Health Tips : जेवल्यानंतर लगेच करु नका 'ही' चूक, आरोग्यावर होईल वाईट परिणाम
- Health Tips : व्यायाम केल्यानंतर लगेच चुकूनही करु नका 'या' गोष्टी, होईल नुकसान
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )