Health Tips : हृदयविकाराचा झटका अचानक कसा येतो? झटका आल्यानंतर मृत्यू येण्यास किती वेळ लागतो? वाचा सविस्तर
Health Tips : हृदयविकाराचा झटका जेव्हा येतो तेव्हा हृदयाच्या धमन्यांमध्ये अचानक अडथळा येतो आणि पुरेसे रक्त हृदयापर्यंत पोहोचत नाही.
Health Tips : सध्याच्या काळात हृदयविकाराच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. हृदयविकाराचा झटका (Heart Attack) ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. कारण आता हृदयविकाराचा झटका फक्त वृद्धांपुरता मर्यादित नाही तर तरुणही त्याला बळी पडू लागले आहेत. गुजरातमध्ये नवरात्रीदरम्यान गरबा खेळत असताना अनेक तरुणांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत, हृदयविकाराच्या झटक्याची कारणे आणि लक्षणे याबद्दल जागरूक असणे खूप महत्वाचे आहे.
हृदयविकाराचा झटका जेव्हा येतो तेव्हा हृदयाच्या धमन्यांमध्ये अचानक अडथळा येतो आणि पुरेसे रक्त हृदयापर्यंत पोहोचत नाही किंवा रक्ताची गुठळी तुटून धमनीमध्ये जाते आणि मार्ग बंद होतो. त्यामुळे हृदयाला ऑक्सिजन मिळत नाही आणि व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो. हे सर्व इतक्या वेगाने घडते की शरीराला कोणताही संकेत किंवा इशारा मिळत नाही. एका क्षणी ती व्यक्ती बरी असते आणि दुसऱ्याच क्षणी त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका येतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास हृदयविकाराचा झटका आल्यानंतर 2-3 तासांत मृत्यूची शक्यता वाढते. म्हणून, वेळेत वैद्यकीय मदत घेणे फार महत्वाचे आहे.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी काय करावे?
तुमच्या आजूबाजूला अचानक कोणी बेशुद्ध झाले तर सर्वप्रथम त्या व्यक्तीची नस तपासून घ्या. जर नस अजिबात जाणवत नसेल तर समजून घ्या की त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आहे. कारण हृदयविकाराच्या झटक्यामध्ये हृदयाचे ठोके बंद होतात, त्यामुळे नस सापडत नाही. या दरम्यान त्या व्यक्तीचे हृदय दोन ते तीन मिनिटांत पुनरुज्जीवित करणे आवश्यक असते, अन्यथा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याच्या मेंदूला इजा होऊ शकते. अशा स्थितीत हृदयविकाराचा झटका आल्यास ताबडतोब छातीवर जोरात मार द्या. तो शुद्धीवर येईपर्यंत त्यावर जोरजोरात मार करा. यामुळे हृदय पुन्हा काम करण्यास सुरवात करेल. त्यानंतर ताबडतोब आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संपर्क साधा आणि बेशुद्ध व्यक्तीला सीपीआर द्यावा. त्याला त्वरीत जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, कारण हृदयविकाराच्या झटक्यावर वेळीच उपचार न मिळाल्यास त्या व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )