Health Tips : डेंग्यूचा संसर्ग वारंवार होऊ शकतो? हा संसर्ग कितपत घातक आहे? वाचा आरोग्य तज्ज्ञांचं मत
Health Tips : एकदा डेंग्यू झाल्यानंतर दुसऱ्यांदा डेंग्यू झाला तर तो कितपत घातक ठरू शकतो, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
Health Tips : सध्या सगळीकडे डेंग्यूच्या (Dengue) रोगाने कहर केला आहे. या रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत चालली आहे. राजधानी दिल्लीत डेंग्यूचा सर्वात गंभीर प्रकार असलेल्या डेन-2 चे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे डेंग्यू आणखी गंभीर होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली जातेय. या आजारापासून सर्वांनी सावध राहण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. अशा वेळी एकदा डेंग्यू झाल्यानंतर दुसऱ्यांदा डेंग्यू झाला तर तो कितपत घातक ठरू शकतो, हा सर्वात मोठा प्रश्न आहे? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
डेंग्यूचा संसर्ग किती गंभीर आहे?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डेंग्यूचा संसर्ग अनेक वेळा होऊ शकतो. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. संसर्गजन्य रोगांबाबत, असे मानले जाते की, एकदा एखाद्याला हा संसर्ग झाला की शरीरात प्रतिकारशक्ती विकसित होते. हे पुढील वेळी जोखमीपासून तुमचे संरक्षण करण्यात मदत करू शकते. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते डेंग्यूबाबत कोणतेही पुरावे उपलब्ध झालेले नाहीत.
दुसऱ्यांदा डेंग्यू होणे जास्त धोकादायक आहे का?
WHO च्या अहवालानुसार, डेंग्यूचे प्रामुख्याने चार प्रकार दिसतात. तसेच, सर्व चार सेरोटाईप प्रतिजैविकदृष्ट्या समान आहेत. त्यापैकी एकाचा संसर्ग झाल्यानंतर क्रॉस-संरक्षण काही महिने टिकू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला दुसऱ्यांदा डेंग्यूचा संसर्ग इतर काही सेरोटाईपमुळे झाला तर ते अधिक धोकादायक ठरू शकते. डेंग्यूचा नंतरचा प्रत्येक संसर्ग अधिक गंभीर होऊ शकतो.
पुन्हा डेंग्यूचा बळी जाण्याचा धोका
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दुसऱ्यांदा डेंग्यूचा संसर्ग होण्याचा धोका सामान्य आहे. तसेच, दुसऱ्यांदा संसर्ग झाल्यास, रोगाच्या कालावधीत किंवा क्लिनिकल सादरीकरणात बदल होऊ शकतो. दुसऱ्यांदा संसर्ग झाल्यास, डास चावल्यानंतर पाच दिवसांत हा आजार गंभीर होऊ शकतो. डेंग्यूच्या गंभीर केसेसमद्ये डेंग्यू हेमोरेजिक शॉक, अंतर्गत रक्तस्त्राव अशा समस्या उद्भवू शकतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वेळेवर उपचार न केल्यास ते प्राणघातकही ठरू शकते.
डेंग्यूवर प्रतिबंधात्मक उपाय काय?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डेंग्यूची दुसरी लागण टाळायची असेल, तर प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला पाहिजे. डासांच्या अळ्यांना जन्म घेण्यापासून रोखण्यासाठी, घाण पाणी साचू देऊ नका. जेथे पाणी साचते तेथे कीटकनाशकाची फवारणी करत रहा. डेंग्यूच्या डासांच्या चावण्यापासून स्वतःचे संरक्षण करत रहा. शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्याकडे लक्ष द्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )