थंडीत आरोग्याच्या कुरबुरींसाठी 'या' 5 गोष्टी फायदेशीर; अनेक आजारांवर गुणकारी
Health Tips : थंडीत उद्भवणाऱ्या आरोग्याच्या कुरबुरींसाठी अनेक गोष्टी फायदेशीर ठरतात.
Health Tips : थंडी सुरू झाली की, तिच्यासोबत अनेक छोट्या छोट्या आजारांचंही आगमन होतं. ताप, सर्दी, खोकला यांसारखे आजारही डोकं वर काढतात. सध्या कोरोना आणि दिवसागणिक येणाऱ्या नवनव्या व्हेरियंट्सनी सर्वांची धाकधुक वाढवली आहे. अशातच तब्येतीच्या कुरबुरींपासून सुटका करण्यासाठी काही घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर ठरतात. या समस्यांपासून सुटका करुन घेण्यासाठी अॅन्टी-बायोटिक्स घेण्याऐवजी नैसर्गिक पदार्थांचा वापर करणं गुणकारी ठरतं. जाणून घेऊया काही असे घरगुती आणि नैसर्गिक उपाय जे थंडीमध्ये त्रास देणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी मदत करतील. हे उपाय शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात. त्यामुळे थंडीमध्ये या पदार्थांचं सेवन अवश्य करा.
खडीसाखर :
आयुर्वेदानुसार खडिसाखर कफ काढून टाकण्यासाठी आणि खोकला कमी करण्याचं काम करते. खडीसाखर तोंडामध्ये ठेवून चघळल्याने आराम मिळतो. दिवसातून दोन वेळा हा प्रयोग केल्याने आराम मिळेल.
बडिशेप :
फार कमी लोकांना हे ठाऊक असेल की, थंडीमध्ये आपली पाचनशक्ती कमी होते. त्यामुळे अपचन आणि अॅसिडिटीसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. जेवल्यानंतर वडिशेप खाल्याने या समस्या दूर होण्यास मदत होते.
कापूर :
एक कप गरम नरळाच्या तेलामध्ये एक मोठा कापराचा तुकडा टाकून वितळवून घ्या. त्यानंतर सांध्यांवर त्या तेलाने मालिश करा. कापूर रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे सांधेदुखी दूर होण्यास मदत होते.
कोरफड :
अचानक तापमान आणि आद्रतेमुळे त्वचा कोरडी होते आणि खाज येते. कोरफड एक मॉयश्चरायझर आणि अॅन्टी-इन्फेमेटरीसरखे गुणधर्म आढळतात. कोरड्या त्वचेवर या जेलने मसाज केल्याने खाजेसारख्या समस्येपासून आराम मिळतो.
निलगिरी ऑईल :
निलगिरी ऑईल हे एक इसेंशिअल ऑईल आहे. निलगिरीच्या तेलाचे काही थेंब उकळत्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याची वाफ घ्या. त्यामुळे कफ निघून जाण्यास आणि खोकला नाहीसा होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे बंद नाकाची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Covid19 : इम्युनिटी वाढवतात 'या' गोष्टी, ओमायक्रॉनपासूनही होईल संरक्षण
- Omicron Variant Alert : ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी 'या' गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष, अन्यथा...
- Health Tips : ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी 'या' भाज्या खा, रोग प्रतिकारशक्ती देखील वाढेल
- Zinc For Health : प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी अत्यावश्यक Zinc, 'या' पदार्थांमधून मिळतात सर्वाधिक पोषक तत्व
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )