Health: हे काय भलतंच? चुंबन घेतल्याने होतात हिरड्यांचे गंभीर आजार? तोंडाचे आरोग्य बिघडते? तज्ज्ञ काय सांगतात...
Health: चुंबनाने प्रेम वाढते, हे जरी खरं असलं तरी आरोग्याच्या दृष्टिकोनातून, यामुळे काही समस्या देखील उद्भवू शकतात. जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट वाचा...
![Health: हे काय भलतंच? चुंबन घेतल्याने होतात हिरड्यांचे गंभीर आजार? तोंडाचे आरोग्य बिघडते? तज्ज्ञ काय सांगतात... Health Serious gum disease Poor oral health caused by kissing What experts say lifestyle marathi news Health: हे काय भलतंच? चुंबन घेतल्याने होतात हिरड्यांचे गंभीर आजार? तोंडाचे आरोग्य बिघडते? तज्ज्ञ काय सांगतात...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/25/d42d3f34b1cdd1cf75309d15431832c41729830739690381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Health: प्रत्येक जोडीदार आपलं प्रेम वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत असतो. बहुतेक जण आपलं जोडीदारावर किती प्रेम आहे, हे दर्शविण्यासाठी त्याचे चुंबन घेतात, ज्यालाच आपण इंग्रजी भाषेत Kiss असेही म्हणतो. आरोग्याच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास निरोगी राहण्यासाठी, तोंडाचे आरोग्य चांगले असणे महत्वाचे आहे. जर तोंडाचे आरोग्य चांगले नसेल तर तुम्हाला गंभीर आजार होण्याची शक्यता असते. तोंडाच्या आरोग्याबद्दल बोललो तर चुंबनाबद्दल जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, किस केल्याने हिरड्यांचे आजार होऊ शकतात. हे कसं शक्य आहे? तज्ज्ञ काय सांगतात? ते जाणून घ्या...
चुंबन घेतल्याने हिरड्यांचा आजार कसा होतो?
खूप कमी लोकांना माहित नाही की चुंबन हे देखील हिरड्यांच्या समस्यांचे एक प्रमुख कारण आहे. हिरड्यांचा आजार, ज्याला पीरियडॉन्टल आजार देखील म्हणतात, ही एक सामान्य तोंडी आरोग्य समस्या आहे, जी जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करते. हिरड्यांचा आजार हा प्लेकच्या निर्मितीमुळे होतो. प्लेक हा जीवाणूंचा एक चिकट थर आहे जो दातांवर जमा होतो. नियमित ब्रशिंग आणि फ्लॉसिंग न केल्यास, प्लेक हळूहळू टार्टरचे रूप धारण करते. टार्टर हा हिरड्यांचा आणखी एक गंभीर आजार आहे, ज्यामुळे हिरड्यांना जळजळ आणि संसर्ग होतो. सुरुवातीच्या दिवसांत हिरड्यांना सूज, लालसरपणा आणि रक्तस्त्राव सामान्य आहे. यावर योग्य वेळी उपचार न केल्यास दातांना आधार देणाऱ्या हाडांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
चुंबनामुळे संसर्ग कसा होतो?
चुंबन घेणे आणि हिरड्यांची समस्या निर्माण होणे यात कोणताही विशिष्ट संबंध नाही. परंतु चुंबन घेताना, लाळेची देवाणघेवाण होते, ज्यामुळे जीवाणूंची देवाणघेवाण होते. अशा परिस्थितीत हिरड्या खराब होऊ शकतात. कधीकधी, हे जीवाणू हिरड्यांना गंभीरपणे संक्रमित करणारे जंतू देखील बदलतात.
संसर्ग कोणाला होतो?
- ज्यांना नेहमी दात किंवा तोंडाच्या संसर्गाची समस्या असते, त्यांनी चुंबन घेताना स्वच्छतेची काळजी घ्यावी.
- जर तुमच्या जोडीदाराला दात किंवा हिरड्यांशी संबंधित काही समस्या असतील तर किस करणे टाळा.
- चुंबन घेण्यापूर्वी, आपल्या जोडीदाराच्या तोंडी आरोग्याची देखील काळजी घ्या.
तोंडाचा संसर्ग टाळण्याचे मार्ग
- दिवसातून दोनदा ब्रश करा.
- आठवड्यातून 2-3 वेळा दात फ्लॉस करा.
- तुमचा ब्रश किंवा चमचा कोणाशीही शेअर करू नका.
- दातांची नियमित तपासणी करत राहा.
हेही वाचा>>>
Fitness: अरेच्चा.. बटाटे आणि अंडी खाऊन चक्क 31 किलो वजन कमी केलं? फिटनेस प्रशिक्षक महिलेचा दावा, जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)