एक्स्प्लोर

लठ्ठ व्यक्तींना कोरोना व्हायरस अधिक धोकादायक; संशोधकांचा दावा

लठ्ठपणामुळे हृदयाच्या समस्या, हाय ब्लड प्रेशर, मूत्रपिंडाचा आजार, आतड्यांचे आजार यांसारऱ्या अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. आता लठ्ठपणचा संबंध थेट कोरोना व्हायरसचा संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूशी जोडण्यात आला आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात आपले हातपाय पसरले आहेत. कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसवर जगभरात अनेक संशोधनं करण्यात येत आहेत. अशातच इग्लंडमधील पब्लिक हेल्थ रिपोर्टमध्ये एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या रुग्णाचं वजन मर्यादेपेक्षा अधिक असेल तर, हा व्हायरस त्यांचं आयुष्य धोक्यात घालू शकतो. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आयसीयूमध्ये दाखल होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी तीन चतुर्थांश रुग्ण लठ्ठपणाने ग्रस्त होते.

लठ्ठपणामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक

लठ्ठपणा आरोग्याच्या इतर घातक समस्यांसाठी कारण ठरू शकतो, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अशातच लठ्ठपणामुळे हृदयाच्या समस्या, हाय ब्लड प्रेशर, मूत्रपिंडाचा आजार, आतड्यांचे आजार यांसारऱ्या अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. आता लठ्ठपणचा संबंध थेट कोरोना व्हायरसचा संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूशी जोडण्यात आला आहे. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, 'कोरोनाची लागण झाल्यामुळे ज्या लोकांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. त्यामध्ये तीन चतुर्थांश रुग्ण लठ्ठपणाने ग्रस्त होते. तसेच या रुग्णांमध्ये मृत्यूचा दर इतरांच्या तुलनेत टक्क्यांनी अधिक होता.'

'हा' रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका; रिसर्चमधून खुलासा

नव्या संशोधनातून लठ्ठपणाने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांबाबत खुलासा

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झालेल्या इतर रुग्णांच्या तुलनेत लठ्ठपणाने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांची प्रकृती अधिक चिंताजनक नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, आणि इतरांच्या तुलनेत लठ्ठपणाने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींचे मृत्यूचे प्रमाण अधिक का आहे, याबाबत खुलासा झालेला नाही. परंतु, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की, लठ्ठपणाचा या रुग्णांच्या रोगप्रितकार शक्तीवर परिणाम झाला आणि त्यामुळेच ते कोरोनाशी लढा देऊ शकले नाहीत.

पब्लिक हेल्थ इग्लंडशी निगडीत संशोधक एलिसन टेडेस्टोन यांनी सांगितलं की, 'नव्या निष्कर्षानुसार, लठ्ठपणाने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना इतर गंभीर समस्या किंवा कोविड-19मुळे मृत्यूचा धोका अधिक आहे.' पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'आपलं वजन नियंत्रणात ठेवून किंवा कमी करून आरोग्या उत्तम राखण्यास मदत होते. तसेच, अनेक समस्यांपासून बचावही होतो. त्यांनी सांगितल्यानुसार, सामान्य वजन कोरोनापासून बचाव करण्यासाठी मदत करतं. दरम्यान, ब्रिटनमध्ये युरोपच्या तुलनेत सर्वाधिक लोक लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहेत. इंग्लंडमध्ये दोन तृतियांश तरुण लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. तसेच स्कॉटलँड, वेल्स आणि उत्तर आयर्लंडमध्येही काहीशी अशीच परिस्थिती आहे.

कोरोना असं बदलतोय आपलं रूप; संशोधकांच्या हाती मोठं यश

संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, दावा करण्यात आला आहे. असं असलं तरिही आपण योग्य ती काळजी घेऊन कोरोनापासून बचाव करणं सहज शक्य आहेत. आतापर्यंत अनेक सकारात्मक उदाहरण समोर आली आहेत. वयाची नव्वदी पार केलेल्या अनेक वृद्धांनीही कोरोनाला मात दिली आहे. तसेच, कोरोनाला घाबरू नका योग्य ती काळजी घ्या, असं आवाहनही अनेक लोकांकडून केलं जात आहे.

(टिप : वरील बाबी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून त्या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Coronavirus | एकदा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?

Work From Home | जास्त वेळ बसणे आरोग्यास हानिकारक; कॅन्सर, हृदयरोगाचा धोका

सॅनिटायझरच्या वापरामुळे स्मार्टफोन बिघडण्याच्या तक्रारी, कसा बचाव करायचा?

हँड सॅनिटायझरचा अतिवापर धोकादायक, आरोग्य विभागचा इशारा

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget