एक्स्प्लोर

सॅनिटायझरच्या वापरामुळे स्मार्टफोन बिघडण्याच्या तक्रारी, कसा बचाव करायचा?

कोरोना विषाणूमुळे आलेल्या साथीमुळे प्रत्येक जण बचावासाठी सॅनिटायझरचा वापर करत आहेत. एवढंच नाही तर सर्वाधिक हाताळला जाणारा मोबाईल फोनही अनेक जण सॅनिटायझरने स्वच्छ करतात. परंतु सॅनिटायझरमुळे मोबाईल फोन बिघडत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

मुंबई : जगभरात सॅनिटायझरचा वापर अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु कोरोना व्हायरसमुळे आलेल्या साथीमुळे हॅण्ड सॅनिटायझर आता जणूकाही मूलभूत गरज बनली आहेत. प्रत्येक जण सॅनिटायझरचा वापर करुन कोरोना व्हायरसपासून बचाव करत आहे. लोक फक्त हातांसाठीच नाही तर सर्वाधिक हाताळली जाणारी वस्तू म्हणजेच मोबाईल फोन स्वच्छ करण्यासाठीही सॅनिटायझरचा वापर करत आहेत. परंतु आता याचे गंभीर परिणाम समोर आले आहेत.

स्क्रीन, लेन्सवर परिणाम कोरोना व्हायरसपासून बचाव होण्यासाठी लोक मास्कसह सॅनिटायझरचाही वापर करत आहेत. त्याचवेळी आपल्या हातात असणारा मोबाईल फोनही व्हायरसचा वाहक बनू नये यासाठी अनेक जण यावरही सॅनिटायझर लावत आहेत. परंतु यामुळे मोबाईल फोनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

अनेक जणांनी मोबाईल फोनमध्ये बिघाड झाल्याबाबत तक्रार केली आहे. फोन स्वच्छ करण्यासाठी हॅण्ड सॅनिटायझरचा वापर हे बिघाडाचं कारण समजलं जात आहे. मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात अशा तक्रारी आल्या आहेत, ज्यात फोनच्या स्क्रीनपासून ईअरफोन जॅक आणि कॅमेऱ्याचे लेन्समध्येही बिघाड झाला आहे.

सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असतं, ज्यामुळे व्हायरसचा खात्मा होण्यास मदत होते. पण मोबाईल फोनवर सॅनिटायझर लावल्यामुळे स्पीकर आणि मायक्रोफोनच्या ठिकाणाहून सॅनिटायझर हेडसेटच्या आत पोहोचतं आणि आतील सर्किट आणि चिपचं नुकसान होतं.

फोनची स्वच्छताही गरजेची मात्र फोन स्वच्छ करणंही तेवढंच गरजेचं आहे, कारण तो सातत्याने आपल्या हातात असतो आणि बऱ्याचदा धोकादायक व्हायरस आणि जिवाणूंचा वाहक बनतो. अशा परिस्थितीत काळजीपूर्वक आणि सतर्कतेने फोन स्वच्छ करणं गरेजचं आहे.

यासाठी एक छोटं कापड घेऊन त्यावर एक थेंब सॅनिटायझर टाकून त्यानेच फोनची स्क्रीन आणि बॅक पॅनल स्वच्छ करावा. मात्र हे कापड कधीच मायक्रोफोन, स्पीकर किंवा चार्जिंग/ईयरफोन जॅकजवळ नेऊ नये.

याशिवाय मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन मेडिकल वाईप्सवर आणू शकता. या वाईप्समध्ये सॅनिटायझरसारखे घटक असतात. सामान्यत: याचा वापर हातांच्या स्वच्छतेसाठी केला जातो. पण सतर्कतेसह फोनच्या स्वच्छतेसाठी याचा वापर केला जाऊ शकतो. शिवाय ही सोपी पद्धतही आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Embed widget