Health Tips : अल्झायमर हा आजार नेमका कशामुळे होतो? 'ही' लक्षणे दिसल्यास सावध व्हा
Health Tips : अल्झायमर हा एक प्रकारे मेंदूचा आजार आहे, ज्यामुळे व्यक्तीचा मेंदू कमकुवत होतो आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो.
Alzheimers Disease : गेल्या काही वर्षांत, अल्झायमर (Alzheimers) हा एक सामान्य आजार म्हणून उदयास आला आहे. अल्झायमर हा एक प्रकारे मेंदूचा आजार आहे, ज्यामुळे व्यक्तीचा मेंदू कमकुवत होतो आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो. पूर्वी हा आजार मोठ्या प्रमाणात वृद्धांमध्ये दिसून येत होता. परंतु, तणाव आणि नैराश्यामुळे आता तरुणांनादेखील या आजाराचा सामना करावा लागतोय. अल्झायमर हा आजार वाढण्यामागचं कारण जागरूकतेचा अभाव हे देखील आहे. अल्झायमर संबंधित तुम्हाला या आजाराची लक्षणं, कारणं आणि उपचारांबाबत माहिती असणं गरजेचं आहे.
अल्झायमर (Alzheimers) हा आजार म्हातारपणात मेंदूच्या ऊतींचे नुकसान झाल्यामुळे होतो. मेंदूतील प्रथिनांच्या संरचनेत अडथळा निर्माण झाल्यामुळे या आजाराचा धोका वाढतो. हा मेंदूशी संबंधित आजार आहे, ज्यामध्ये व्यक्ती हळूहळू स्मरणशक्ती गमावू लागते. या आजारात व्यक्तीला छोटीशी गोष्टही लक्षात ठेवता येत नाही. जेव्हा या आजाराचं प्रमाण वाढत जातं तेव्हा अल्झायमर रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना लोकांचे, जवलच्या नातेवाईकांचे चेहरेही लक्षात राहत नाहीत. आजपर्यंत अल्झायमर या आजारावर अचूक उपचार सापडलेले नाहीत.
अल्झायमरची लक्षणे काय आहेत?
- रात्री झोप न लागणे
- खूप लवकर गोष्टी विसरणे
- दृष्टी कमी होणे
- अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्येही त्रास होणे
- कुटुंबातील सदस्यांची ओळख न पटणे
तुम्हाला सुद्धा या संबंधित कोणती लक्षणं जाणवत असल्यास वेळीच सावध व्हा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. या आजाराचं वेळीच निदान झाल्यास यावर ट्रिटमेंट घेणं सोपं होऊ शकतं.
अल्झायमर हा आजार कसा टाळाल?
हा आजार टाळण्यासाठी नियमित व्यायामासोबतच पोषक तत्वांनी युक्त आहार घ्यावा. मित्रमंडळी, नातेवाईकांची भेट घ्या जेणेकरून तुम्हाला उदासीन वाटणार नाही. घरातील लोकांशी संपर्कात राहावे जेणेकरून त्यांचे चेहरे ओळखण्यास कोणतीही अडचण येणार नाही. जर तुमच्या घरातील कोणाला हा आजार आधीच झाला असेल तर तुम्ही आधी त्याकडे लक्ष द्यावे. सतत नवीन काहीतरी शिकत राहा. जसे की, पुस्तकं वाचणे, मित्र आणि कुटुंबासह वेळ घालवणे इ. डिप्रेशनपासून दूर राहण्यासाठी तुम्ही तुमचे आवडते संगीतही ऐकू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : यकृताचा आजार आरोग्यासाठी धोकादायक; 'ही' लक्षणं दिसल्यास सावधान
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )