Health: 'Heart Attack आणि Cardiac Arrest मध्ये फरक काय रे भाऊ?' अधिक धोकादायक काय आहे? जाणून घ्या.
Health: हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्ट हे दोन सर्वात गंभीर हृदयविकार आहेत. या दोन आजारांमधील फरक तसेच कोणता अधिक धोकादायक आहे? जाणून घ्या.
Health: आजकालची बदलती जीवनशैली ज्याला आपण फास्ट लाईफ असेही म्हणतो. जे आरोग्य बिघडवण्यात सर्वात जास्त आपली भूमिका बजावतात. यामुळे अनेक लोकांना विविध शारिरीक आणि मानसिक आरोग्याचा सामना करावा लागतो. गेल्या काही काळापासून तरुण, लहान मुले आणि वृद्धांसह प्रत्येकामध्ये हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये देखील वाढ झाली आहे. हृदयविकाराच्या दोन सर्वात सामान्य स्थिती म्हणजे Heart Attack आणि Cardiac Arrest. या दोघांमुळे लोकांना जीव गमवावा लागल्याच्या बातम्या रोज समोर येत असतात. मात्र, या दोन आजारांबाबत लोकांमध्ये बराच संभ्रम आहे. म्हणजे दोन्ही एकच आहेत की वेगळे. जर ते वेगळे असतील तर आपल्याला कोणता धोका जास्त आहे? कोणता रोग टाळता येऊ शकतो? एका रिपोर्टनुसार दोघांमधील फरक आणि संकेत जाणून घेऊया.
कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय?
कार्डियाक अरेस्ट ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये हृदय अचानक काम करणे थांबवते, ज्यामुळे मृत्यू होतो. या स्थितीत मानवी हृदयातील रक्ताभिसरण थांबते. यामध्ये, हृदयाचे ठोके सहसा अनियमित होतात, ज्याला वेंट्रिक्युलर फायब्रिलेशन म्हणतात.
(Heart Attack) हृदयविकाराचा झटका म्हणजे काय?
हृदयाच्या धमनीमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे रक्तप्रवाह थांबतो तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा थांबतो आणि स्नायू मृत व्हायला लागतात. या स्थितीला मायोकार्डियल इन्फेक्शन देखील म्हणतात.
दोघांमध्ये काय फरक आहे?
कार्डियाक अरेस्टमध्ये हृदय अचानक काम करणे बंद करते. त्याच वेळी, हृदयविकाराच्या झटक्यामध्ये ब्लॉकेजची समस्या असते. हृदयविकारात, हृदयाचे ठोके थांबतात आणि हृदयविकाराच्या झटक्यामध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात. या दोन आजारांच्या लक्षणांमध्येही फरक आहे. हृदयविकाराच्या झटक्यामध्ये बेशुद्ध पडणे, श्वसनक्रिया बंद होणे अशी लक्षणे दिसतात, तर दुसरीकडे हृदयविकाराच्या झटक्यामध्ये छातीत दुखते.
कोणता अधिक धोकादायक आहे?
तज्ज्ञांच्या मते, कार्डिॲक अरेस्टमुळे मृत्यूची शक्यता जास्त असते, कारण या स्थितीत काही सेकंदात मृत्यू होतो. त्याचबरोबर हृदयविकाराच्या झटक्यावर योग्य वेळी उपचार सुरू झाले तर जीव वाचू शकतो.
हेही वाचा>>>
Men Health: सावधान! लॅपटॉपमुळे शुक्राणूंची संख्या कमी होतेय? कारण जाणून घ्या, कसं टाळाल?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )