(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health : उन्हाळ्यात कॉफी पिणाऱ्यांनो सावधान! डिहायड्रेशन...निद्रानाश..हृदयविकार अन् बऱ्याच आजाराचा धोका
Health : उन्हाळ्यात जेव्हा तापमान वाढते, तेव्हा तुमच्या शरीराला थंड ठेवण्याची गरज असते आणि यामध्ये कॉफीचा फायदा होत नाही.
Health : अनेक जणांची दिवसाची सुरूवात चहा किवा कॉफी घेतल्याशिवाय होत नाही. काही जणांना झोपेतून उठल्या उठल्या चहा-कॉफी लागते. तसेच ऑफीसमध्ये काम करताना देखील कॉफीचा घोट लागतोच.. आपल्या दैनंदिन जीवनात कॉफी पिणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. कॉफी पिणे एक प्रकारे आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे. ऑफिसमध्ये येताच लोकांना कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कॉफी लागते. पण तुम्हाला माहित आहे का की कॉफी पिण्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. विशेषतः उन्हाळ्यात कॉफी प्यायल्यास शरीरात अनेक दुष्परिणाम होऊ शकतात..
उष्णतेच्या लाटेचा सामना
देशासह राज्यातील नागरिकांना सध्या उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतोय, सध्या बाहेर सूर्य आग ओकत असून उन्हाळ्यात अगदी थोड्या वेळासाठी घराबाहेर पडल्यास शरीरातील ऊर्जा कमी होऊ लागते. अशात या कडाक्याच्या उन्हाशी लढण्यासाठी आपण आपला आहार योग्य ठेवणे आवश्यक आहे आणि असे अन्नपदार्थ खाऊ नयेत, ज्यामुळे उन्हाळ्यात नुकसान होऊ शकते. या खाद्यपदार्थांपैकी एक म्हणजे कॉफी. प्रत्येकजण दररोज एक किंवा दोन कप कॉफी पितात. कडाक्याच्या उन्हातही लोक ऑफिसमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम करतात ते म्हणजे कॉफी पिणे. हे तुमच्या कामात एकाग्रता वाढवण्यास नक्कीच मदत करते, परंतु त्यात असलेल्या कॅफिनचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. उन्हाळ्यात जेव्हा तापमान वाढते तेव्हा तुमच्या शरीराला थंड ठेवण्याची गरज असते आणि यामध्ये कॉफीचा फायदा होत नाही. जाणून घेऊया कॉफी पिण्याने होणाऱ्या हानीबद्दल.
कॉफी पिण्याचे तोटे
डिहायड्रेशन
कॉफीमध्ये जास्त प्रमाणात कॅफिन आढळल्यास शरीराचे तापमान वाढू शकते, ज्यामुळे घाम येण्याचे प्रमाण वाढू शकते आणि शरीरातील निर्जलीकरण होऊ शकते. यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. डिहायड्रेशन ही उन्हाळ्यातील सामान्य समस्यांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत कॉफी टाळावी आणि जास्तीत जास्त पाणी प्यावे.
शरीराचे तापमान वाढते
कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे तापमान वाढू शकते, ज्यामुळे उन्हाळा अधिक असह्य होऊ शकतो. यामुळे, जास्त घाम येण्याची समस्या असू शकते, ज्यामुळे थकवा आणि चक्कर येऊ शकते. कॉफी प्यायल्याने तुम्हाला उन्हाळ्यात मळमळ यासारख्या समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
झोपेचा अभाव
बरेच लोक रात्री उशिरापर्यंत काम करण्यासाठी कॉफी पितात, पण ती तुमच्या आरोग्यासाठी अजिबात चांगली नसते. कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात कॅफिन असते. यामुळे, रात्रीच्या वेळी तुमच्या झोपेची गुणवत्ता बिघडते, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ आणि थकल्यासारखे होऊ शकता.
हृदयविकाराचा धोका वाढू शकतो
जास्त प्रमाणात कॅफीन घेतल्याने हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. त्यामुळे हृदयविकार असलेल्या लोकांसाठी कॉफी पिणे योग्य मानले जात नाही.
हेही वाचा>>>
Women Health : महिलांनो... रोज 'इतकी' पावलं चाला, डाएट आणि व्यायामाशिवाय वजन कमी होईल, योग तज्ज्ञ सांगतात...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )