Health: हिवाळ्यात तब्येत सांभाळा! 'हार्ट अटॅक' येण्याची शक्यता? कारण आणि 5 उपाय जाणून घ्या
Health: हिवाळ्याची सुरुवात काही लोकांसाठी, विशेषत: हृदयाच्या रुग्णांसाठी समस्या घेऊन येते. थंडीत हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. यामागील कारण आणि उपाय जाणून घेऊया.
Health: ऑक्टोबर हिट (October) संपून नोव्हेंबरचा महिना सध्या सुरू आहे. अशात थंडीला (Winter Season) सुरुवात झालीय. सध्या देशात हवामान बदलताना दिसत आहे. तसं पाहायला गेलं तर अनेकांना हिवाळा ऋतू आवडतो. हा एक असा ऋतू आहे, या दिवसांमध्ये लोक चांगले आणि चविष्ट अन्न खातात, जे त्यांना उन्हाळ्यात खाणे शक्य नसते. तुम्हाला माहित आहे का? हा हिवाळा जितका चांगला असतो, तितकाच तो अनेक आजारही घेऊन येतो. होय, सर्दी-खोकला हे सामान्य आजार आहेत, परंतु विशेष म्हणजे हृदयरोगींनाही हिवाळ्यात काळजी घ्यावी लागते, अन्यथा त्यांची प्रकृती बिघडू शकते. हे का घडते? यापासून बचाव करण्याचे उपाय काय आहेत? जाणून घेऊया.
हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका का वाढतो?
सध्या बदलती जीवनशैली, कामाचा ताण, स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, शात देशात सध्या हवामान सारखं बदलताना दिसतंय. यासारख्या कारणांमुळे लोकांना अनेक आजारांनी ग्रासलंय. अशात लोकांनी स्वत:ची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
याची मुख्यतः 3 कारणे आहेत:
रक्तवाहिन्या गोठणे - आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात हृदयाच्या नसांमध्ये रक्त गोठण्यास सुरुवात होते. त्याच्या संचयामुळे, हृदयविकाराचे अनेक आजार आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.
कोरोनरी हार्ट डिसीज - कोरोनरी डिसीजमध्ये छातीत दुखण्याची समस्या सामान्य आहे, जी हिवाळ्याच्या ऋतूमध्ये वाढते.
तापमान असंतुलन - हिवाळ्यात, आपले हृदय सामान्य तापमान संतुलित करू शकत नाही. वारंवार तापमानाच्या असंतुलनामुळे हृदयाच्या स्नायूंना नुकसान होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
या 5 मार्गांनी स्वतःला सुरक्षित ठेवा
हिवाळा सुरू झाला आहे. सध्या सकाळ-संध्याकाळ थंडी असते, हृदयाच्या रुग्णांनी असंच निश्चिंत राहू नका, स्वतःला झाकून ठेवा आणि उबदार कपडे घाला.
हृदयाच्या रुग्णांनी शक्य तितक्या कमी बाहेर जावे, विशेषत: जेव्हा थंड लाटा वाहू लागतात.
अल्कोहोलचे सेवन कमी करा. यामुळे शरीरातील तापमान गरम होईल, पण बाहेरून थंड वारे वाहत असल्याने तापमान वर-खाली होऊ शकते.
हाताची स्वच्छता राखा. याच्या मदतीने तुम्ही संसर्ग टाळू शकता.
जर आधीच बीपी किंवा कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची चिन्हे
- उलट्या आणि मळमळ.
- श्वास घेण्यास त्रास होतो.
- पाय आणि बोटांमध्ये मुंग्या येणे.
- थंड घाम.
- थकवा येणे.
हेही वाचा>>>
Women Health: गरोदर महिलांच्या 'या' चुकांमुळे बाळाचा चेहरा बिघडू शकतो? गर्भावर होतो परिणाम? अभ्यासात म्हटलंय...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )