Health : रोज टॉयलेटमध्ये तुम्ही तासन् तास घालवताय? आताच थांबवा.. तोटे आणि परिणाम जाणून घ्या
Health : तुम्हीही टॉयलेटमध्ये तासनतास घालवणाऱ्यांपैकी एक आहात का? तुम्हीही मोबाईल किंवा वर्तमानपत्र घेऊन टॉयलेट सीटवर बसता का? त्यामुळे शरीरावर होणाऱ्या परिणामां बद्दल तुम्हाला माहिती आहे?
Health : आजकालच्या धावपळीच्या जगात आपल्याकडे वेळच नसतो. अनेकजण वेळ नाही अशी तक्रार करत असतात. कामाचा ताण, त्याची व्यस्तता इतकी वाढलीय की अनेकदा लोक टॉयलेट किंवा वॉशरूममध्ये तासन् तास मोबाईल घेऊन बसतात, तर काही लोक वेळ वाचवण्यासाठी टॉयलेट सीटवर बसून वर्तमानपत्र वाचतात. यामुळे लोक आजकाल शौचालयात जास्त वेळ घालवू लागले आहेत, तर ही सवय आरोग्यासाठी किती हानीकारक आहे? खरं तर टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसल्याने संसर्गासह अनेक आजारांचा धोका वाढतो. असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
टॉयलेट सीटवर 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसणे आरोग्यासाठी हानिकारक
नोएडाचे जनरल फिजिशियन डॉ. व्ही.के. सिंग आणि त्यांच्याकडून मिळालेली माहिती तुमच्यासोबत शेअर करत आहोत. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, टॉयलेट सीटवर 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. टॉयलेट सीटवर बराच वेळ बसल्याने इन्फेक्शनचा धोका वाढतो, त्याच स्थितीत जास्त वेळ बसल्याने अनेक शारीरिक समस्याही उद्भवू शकतात. या सर्व समस्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मूळव्याध समस्या
टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसल्याने मुळव्याधची समस्या उद्भवू शकते. टॉयलेट सीटवर बसण्याच्या आसनामुळे गुद्द्वारावर अतिरिक्त दाब पडतो, त्यामुळे तेथे सूज आणि गाठींचा त्रास होऊ शकतो. या गुठळ्या नंतर मूळव्याधाचे गंभीर स्वरूप घेऊ शकतात. त्यामुळे या सवयीवर वेळीच नियंत्रण ठेवणे योग्य ठरेल.
संसर्गाचा धोका
टॉयलेटमध्ये आणि सीटवर अनेक प्रकारचे धोकादायक जीवाणू असतात, ज्यामुळे संसर्गजन्य रोगांचा धोका असतो. विशेषत: जेव्हा तुम्ही मोबाइल किंवा वर्तमानपत्र घेऊन तिथे बसता तेव्हा हे जीवाणू मोबाइल आणि स्क्रीनला चिकटून राहतात. अशा स्थितीत मोबाईल स्वच्छ न केल्यास त्यातून संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे टॉयलेटमध्ये मोबाइल कधीही न नेणेच चांगले.
पचन समस्या
पोट साफ करण्यासाठी तुम्ही टॉयलेटमध्ये बराच वेळ बसून राहिल्यास ही तुमची मोठी चूक आहे. टॉयलेट सीटवर एकाच स्थितीत बराच वेळ बसल्याने पोटावर अतिरिक्त दबाव पडतो आणि त्यामुळे शरीराच्या हालचालीवर परिणाम होतो. त्यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
पायांना सूज येणे
टॉयलेट सीटवर सतत एकाच स्थितीत बसल्याने पाठीच्या खालच्या भागात रक्तप्रवाह कमी होतो. अशा स्थितीत पायाला सूज येणे, मुंग्या येणे किंवा बधीरपणाची समस्या उद्भवू शकते. ही समस्या विशेषतः जास्त वजन असलेल्या लोकांमध्ये आढळते. म्हणून, हे टाळण्यासाठी, शौचालयात कमीत कमी वेळ काढणे चांगले.
पाठदुखी
टॉयलेट सीटवर सतत बसल्याने पाठीच्या आणि कंबरेच्या स्नायूंवर अतिरिक्त दबाव पडतो. यामुळे स्नायूंमध्ये सूज आणि क्रॅम्प होऊ शकतात आणि काळजी न घेतल्यास पाठदुखी होऊ शकते.
नसांवर ताण
टॉयलेट सीटवर सतत एकाच स्थितीत बसल्यामुळे मज्जातंतूंवर ताण किंवा दाब येण्याची समस्या उद्भवू शकते, ज्याला वैद्यकीय भाषेत पिंच्ड नर्व्हस म्हणतात. हे केवळ पायांमध्येच नाही तर हात आणि मानेच्या नसांमध्ये देखील होऊ शकते. म्हणून, ज्या लोकांना ताणलेल्या नसांची समस्या आहे त्यांनी विशेषतः टॉयलेटमध्ये जास्त वेळ घालवणे टाळावे.
सवयीवर वेळीच नियंत्रण ठेवा
साहजिकच शौचालयात आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवू शकता. उदाहरणार्थ, पोट साफ नसताना लोक अनेकदा टॉयलेट सीटवर तासन्तास बसतात. जर तुम्हालाही अशीच समस्या असेल तर तुमच्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्या. यासाठी तुमच्या आहारात अधिकाधिक फायबर युक्त गोष्टींचा समावेश करा आणि पुरेसे पाणी प्या.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Health : काय! वयाच्या आधीच म्हातारपणा नको ना.. उत्तम आयुष्य हवंय ना.. मग या 6 सवयी आताच सोडा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )