Health: काय सांगता! कोणत्याही औषधाशिवाय थायरॉईडपासून मिळेल आराम? स्वामी रामदेव यांनी समस्येपासून मुक्त होण्याचा मार्ग शोधला
Health: थायरॉईडचा त्रास असलेल्यांसाठी स्वामी रामदेव यांनी या समस्येपासून मुक्त होण्याचा मार्ग शोधला आहे. या टिप्सच्या मदतीने आराम मिळेल.
Swami Ramdev Tips: आजकाल महिलांमध्ये थायरॉईड ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येतेय. जर तुम्हाला थायरॉईडच्या आजाराने ग्रस्त असाल तर तुम्ही औषध घेत असाल. हा जीवनशैलीशी संबंधित आजार आहे, ज्यामुळे जगभरातील अनेक लोक त्रस्त आहेत. अनेकजण यासाठी महागडी औषधंही घेतात. पण आता औषधांशिवाय थायरॉईड बरा करता येईल का? असा प्रश्न अनेक लोकांकडून विचारला जात आहे. यावर स्वामी रामदेव बाबा यांनी या समस्येपासून मुक्त होण्यासाठी मार्ग शोधला आहे. जाणून घ्या..
थायरॉईडपासून मुक्त होण्यासाठी स्वामी रामदेवांनी सांगितला मार्ग
थायरॉईड हा आजार भारतात विशेषत: महिलांमध्ये सक्रिय आहे. हायपोथायरॉईडीझम सारख्या थायरॉईड समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी योग हा एक प्रभावी आणि कार्यक्षम उपाय असू शकतो. बाबा रामदेव यांनी त्यांच्या अनेक योग सत्रांमध्ये थायरॉईडसाठी विशेष आसने आणि प्राणायाम बद्दल सांगितले आहे. आम्ही तुम्हाला त्यांनी सुचवलेल्या काही आसनांबद्दल सांगत आहोत, जे थायरॉईडच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतील. कारण त्याचे शरीरावर इतर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. योगामुळे आपल्याला इतर अनेक फायदे मिळू शकतात.
या आसनांनी थायरॉईडच्या समस्येपासून मुक्ती मिळवा
सिंहासन
सिंहासन घसा आणि मानेच्या भागासाठी फायदेशीर आहे. हे आसन थायरॉईड ग्रंथींची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते. या आसनाच्या वेळी, घशाचे स्नायू ताणले जातात, ज्यामुळे थायरॉईड ग्रंथी उत्तेजित होते आणि तिची कार्यक्षमता सुधारते. हे आसन केल्याने घशातील ताण कमी होऊन मानसिक शांती मिळते.
उष्टासन
उष्टासन हे देखील एक प्रभावी आसन आहे जे थायरॉईड ग्रंथी सक्रिय ठेवण्यास मदत करते. या आसनामुळे मान आणि घशाच्या आसपासच्या भागाला फायदा होतो, ज्याचा थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक प्रभाव पडतो. हे आसन केल्याने हार्मोनल असंतुलन देखील संतुलित राहते. तसेच हे आसन केल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते.
View this post on Instagram
मत्स्यासन
मत्स्यासन हे सर्वोत्तम आसन मानले जाते जे थायरॉईड आणि पॅराथायरॉईड ग्रंथी सक्रिय ठेवते. हे आसन थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करते आणि तिचे कार्य सुधारते. हे आसन केल्याने मान आणि खांद्यांची लवचिकता वाढते, मानसिक शांती मिळते आणि तणाव कमी होतो.
सर्वांगासन
बाबा रामदेव सांगतात की, हे आसन अत्यंत प्रभावी आहे जे थायरॉईडमुळे होणारे वेदना कमी करण्यास देखील मदत करते. हे आसन थायरॉईड आणि इतर ग्रंथींचे रक्त परिसंचरण चांगले ठेवते, ज्यामुळे त्यांची कार्य प्रणाली देखील सुधारते. हे आसन केल्याने तणाव आणि चिंता कमी होऊ शकते.
हलासना
हलासन हे थायरॉईड ग्रंथींना, विशेषत: मान आणि घशाच्या भागात उत्तेजित करण्यासाठी एक महत्त्वाचे आसन आहे. थायरॉईडच्या रुग्णांसाठी हे आसन खूप फायदेशीर आहे. या आसनामुळे मणक्यामध्ये लवचिकता येते आणि शरीराच्या इतर भागांमध्ये ताण वाढतो.
स्वामी रामदेव म्हणतात की...
स्वामी रामदेव म्हणतात की थायरॉईडच्या रुग्णांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात या आसनांचा समावेश करावा. ही आसने किमान 5 वेळा करा. तसेच कपालभातीचा सराव करावा. याशिवाय कोथिंबिरीचे पाणी पिणेही चांगले राहील.
हेही वाचा>>>
Health: ब्लीडिंग Eye व्हायरसपासून सावधान! डोळ्यातून वाहते रक्त? जगभरात पसरतोय धोका, ही लक्षणं तुम्हाला नाही ना?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )