एक्स्प्लोर

Health: अंड्यांसोबत खा 'या' गोष्टी, शरीरातील व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता होईल लवकर दूर

Health: अंडी खाल्ल्याने शरीराला प्रथिने आणि जीवनसत्त्वे मिळतात. जर तुम्ही त्यात इतर काही गोष्टी मिसळून खाण्यास सुरुवात केली, तर शरीराचा प्रत्येक भाग बी-12 ने भरला जाईल.

Health:  निरोगी आरोग्यासाठी आपल्या शरीराला विविध व्हिटॅमिन्स, कॅल्शिअमची गरज असते. त्यापैकी व्हिटॅमिन बी-12 हे शरीरासाठी एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे, जे शरीरातील लाल रक्तपेशी तयार करण्यास, मज्जातंतूंचे आरोग्य आणि शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, मुंग्या येणे आणि कमकुवत स्मरणशक्ती यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता चांगला आहार आणि निरोगी अन्नाच्या संयोजनाने सहजपणे भरून काढता येते.

व्हिटॅमिन बी 12 महत्वाचे का आहे?

व्हिटॅमिन बी-12 शरीरात रक्त निर्मिती आणि डीएनए वाढण्यास मदत करते. हे तंत्रिका पेशींचे संरक्षण करते. त्याच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, पेशींचे नुकसान, थकवा, हात आणि पाय सुन्न होणे आणि स्मृतिभ्रंश यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. शाकाहार करणाऱ्यांना बहुतेक वेळा याच्या कमतरतेचा धोका असतो, कारण ते मुख्यतः मांस, मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळते. अंडी देखील व्हिटॅमिन बी-12 चा चांगला स्रोत आहे. विशेषतः त्याचा पिवळा भाग B-12 ने भरलेला असतो. पण जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल, ज्यांना शरीरातील या जीवनसत्वाची कमतरता लवकरात लवकर दूर करायची असेल तर ते अंड्यांसोबत इतर काही गोष्टी खाऊ शकतात. अंड्यांचे हे निरोगी मिश्रण तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरेल.

या गोष्टी अंड्यामध्ये मिसळा

हिरव्या पालेभाज्या

अंड्यांसह पालकाचे सेवन केल्याने शरीराला लोह आणि फॉलिक ॲसिड मिळते, जे व्हिटॅमिन बी-12 शोषण्यास मदत करते. तुम्ही स्क्रॅम्बल्ड अंडी किंवा ऑम्लेट सोबत पालक खाऊ शकता.

दुग्धजन्य पदार्थ

अंड्यांसोबत दूध, दही किंवा चीज खाल्ल्याने शरीराला अतिरिक्त कॅल्शियम आणि बी-12 मिळतात. हे आरोग्यदायी मिश्रण तुम्ही नाश्त्यात खाऊ शकता. अंडी आणि दूध मिसळून हेल्दी पॅनकेक्स बनवता येतात.

मशरूम

मशरूम व्हिटॅमिन डीचा स्त्रोत आहे, जो शरीरात व्हिटॅमिन बी-12 चा विकास वाढवण्यास मदत करतो. अंडी आणि मशरूम ऑम्लेट किंवा भुर्जी हा एक चवदार आणि पौष्टिकतेने भरलेला पर्याय आहे, जो नियमितपणे खाल्ल्यास शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन बी-12 प्रदान करू शकतो.

मासे आणि चिकन

जे लोक नॉनव्हेज खातात ते अंडी खातच असतील. पण हे लोक अंड्यांसोबत सॅल्मन, ट्यूना किंवा चिकनसारखे इतर मांसाहारी पदार्थही घेऊ शकतात. यामुळे तुमच्या शरीराला व्हिटॅमिन बी-12 आणि प्रोटीन दोन्ही मिळतील. अंडी तुम्ही चिकन सूपमध्ये मिसळून खाऊ शकता.

फोर्टिफाइड तृणधान्ये आणि नट

फोर्टिफाइड तृणधान्ये, सोया दूध आणि अक्रोड आणि बदाम यांसारख्या सुक्या मेव्यासह अंडी खाल्ल्याने तुम्हाला व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेवर मात करण्यास मदत होईल. उकडलेल्या अंड्यांसोबत भिजवलेले काजू तुम्ही नाश्त्यात घेऊ शकता. लक्षात ठेवा, ज्या लोकांना व्हिटॅमिन B-12 ची तीव्र कमतरता आहे ते डॉक्टरांच्या सल्ल्याने B-12 सप्लिमेंट घेऊ शकतात.

हेही वाचा>>>

Women Health: जुळी मुलं कशी जन्माला येतात? कोणत्या महिलांमध्ये अशी शक्यता असते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health: IVF प्रक्रियेत तीन वेळा अपयश आले? मग आता पुढे काय? मूल होणार की नाही? डॉक्टरांची महत्त्वाची माहिती...
IVF प्रक्रियेत तीन वेळा अपयश आले? मग आता पुढे काय? मूल होणार की नाही? डॉक्टरांची महत्त्वाची माहिती...
Health Tips : दप्तरांच्या ओझ्याने शाळकरी मुलांना मणक्याच्या समस्या; वाचा लक्षणं आणि तज्ज्ञांचा सल्ला
दप्तरांच्या ओझ्याने शाळकरी मुलांना मणक्याच्या समस्या; वाचा लक्षणं आणि तज्ज्ञांचा सल्ला
Health: पावसाळ्याच्या ऋतूत बाळाचे नियोजन करताय? मग, 'या' एका गोष्टीचं सेवन करायला विसरु नका! स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात...
पावसाळ्याच्या ऋतूत बाळाचे नियोजन करताय? मग, 'या' एका गोष्टीचं सेवन करायला विसरु नका! स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात...
बाहेर मुसळधार पाऊस, तरी डोळे का होतात कोरडे? पावसाळ्यातील ही चूक पडू शकते महागात
बाहेर मुसळधार पाऊस, तरी डोळे का होतात कोरडे? पावसाळ्यातील ही चूक पडू शकते महागात

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
Rohini Khadse: फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
Satej Patil on Jayant Patil: जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Embed widget