Health: काय सांगता! शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी तेलाने नव्हे तर 'या' तीन गोष्टींनी वाढते? तज्ज्ञांकडून तोटे जाणून घ्या..
Health: कोलेस्टेरॉल एक चिकट द्रव असतो, ज्याचं शरीरात योग्य प्रमाणात असणं आवश्यक आहे, मात्र त्याचा अतिरेक देखील हानिकारक आहे. जीवनशैलीच्या सवयी हे देखील त्याच्या वाढीचे कारण आहे.
Health: आजकालच्या बदलत्या जीवनशैलीने अनेक लोकांना विविध आजारांनी ग्रासलंय. हृदयविकार, कर्करोग आणि लठ्ठपणा यासारख्या आजारांचं प्रमाण सध्या वाढत चाललंय. याचं आणखी एक कारण म्हणजे शरीरात वाढणारं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण.. कोलेस्टेरॉलचे वाईट आणि चांगले असे दोन प्रकार आहेत. शरीर निरोगी ठेवण्यासाठी चांगले कोलेस्ट्रॉल आवश्यक आहे. त्याचबरोबर शरीरात खराब कोलेस्टेरॉल वाढले तर हृदयविकाराचा धोका वाढतो. कोलेस्टेरॉलमुळे अनेक गंभीर आजारही होतात. उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या खाण्यापिण्याच्या सवयींशी संबंधित आहे. या सवयींपैकी, योग्य खाण्याच्या सवयी ओळखणे देखील खूप महत्वाचे आहे. बरेचदा लोक मानतात की, कोलेस्ट्रॉल वाढण्याचे एक कारण म्हणजे जास्त तेल खाणे, पण तसे नाही. तेलासोबतच आपल्याला काही खाण्यायोग्य गोष्टींचीही काळजी घ्यावी लागते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. जाणून घेऊया यावर तज्ज्ञ काय म्हणतात?
तज्ज्ञांचा सल्ला काय आहे?
एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार, डॉ. बिमल छाजेड, एक वरिष्ठ हृदय शल्यचिकित्सक आणि हृदयरोगतज्ज्ञ म्हणतात की, ते स्वयंपाकाचे तेल नसून प्राण्यांचे अन्न आहे, म्हणजे मांसाहारी पदार्थ, जे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यासाठी सर्वात जास्त जबाबदार आहेत. तेलामुळे कोलेस्टेरॉल वाढणे हे आपण स्वयंपाक करताना कोणत्या प्रकारचे तेल वापरतो? ते किती शुद्ध आहे? यावर अवलंबून असते. योग्य, स्वच्छ आणि शुद्ध तेल किंवा देशी तूप वापरल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहते.
हे पदार्थ कोलेस्ट्रॉल वाढवतात?
दुग्धजन्य पदार्थ - डॉ. बिमल सांगतात की प्राण्यांच्या उत्पादनांमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे की दही, मलई किंवा छेना यांचा समावेश होतो, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. त्याचबरोबर देसी तूप हे चांगल्या कोलेस्टेरॉलचा स्रोत आहे, जर ते कमी प्रमाणात खाल्ले तर शरीराला फायदे मिळतात.
मांस - लाल मांस, बकरीचे मांस किंवा कोंबडी आणि अंडी हे देखील उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येचे कारण आहे. त्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने कोलेस्टेरॉलही वाढू शकते. हृदयरोगींनी मांसाहार कमीत कमी करावा.
मासे - काही मासे आणि सीफूडमध्येही कोलेस्टेरॉल आढळते. हे जास्त खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढू शकते.
याशिवाय जंक फूड, फास्ट फूड आणि रिफाइंड मैद्यापासून बनवलेल्या गोष्टींचे अतिसेवन केल्यानेही कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.
आपण काय खावे?
- फायबरयुक्त पदार्थ खा, जसे की ओट्स, ब्राऊन राइस आणि केळी आणि द्राक्षे यांसारखी फळे.
- आवळा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रणात राहते.
- आलं टाकून बनवलेला चहा पिणे देखील चांगले होईल.
हेही वाचा>>>
Health: अधूनमधून दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक की चांगले? एका अभ्यासात धक्कादायक तथ्ये समोर! अनेकांना माहीत नाही..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )