Health : 'आयुष्यात कधीच हॉटेलचे जेवण माहित नाही', 115 वर्षांच्या आजीबाईंनी सांगितले डाएट Secret, तुम्हीही व्हाल थक्क
Health : खाण्याच्या सवयी आपल्याला शिकवतात की दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी योग्य आहार किती महत्त्वाचा असू शकतो.
Health : आजकाल बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव आपल्या शारिरीक आणि मानसिक जीवनावर होताना दिसतोय. अशात आपण जे काही खातो, त्या अन्नाचा आपल्या आरोग्यावर आणि आयुष्यावर खोलवर परिणाम होतो. तुम्हाला माहित आहे का? जगात असेही लोक आहेत, जे अजूनही 100 वर्षांहून अधिक जगत आहेत. या लोकांकडून संतुलित आणि पौष्टिक आहाराचे पालन केले जाते, असे अनेक संशोधनांमध्ये सांगण्यात आले आहे. जगातील विविध 'ब्लू झोन'मधील लोक, म्हणजे ज्या भागात लोक जास्त काळ जगतात आणि निरोगी राहतात, याचे नेमके कारण काय? असं कोणतं रहस्य आहे त्यांच्या जगण्याचे? जाणून घेऊया..
ही माणसं इतकी वर्षे कशी जिवंत आहेत? काय आहे रहस्य?
आहारामुळे त्यांचे आयुर्मान दीर्घ होते आणि त्यांचे आरोग्य चांगले राहते. आज आपण 99 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या चार लोकांच्या खाण्याच्या सवयींबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांच्या खाण्याच्या सवयी आपल्याला शिकवतात की दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी योग्य आहार किती महत्त्वाचा असू शकतो. ही माणसे इतकी वर्षे कशी जिवंत आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्या आहाराचे रहस्य त्यांच्याकडूनच जाणून घेतले पाहिजे.
एलिझाबेथ फ्रान्सिसचा आहार (115 वर्षे)
- एलिझाबेथ फ्रान्सिस या अमेरिकेतील सर्वात वयोवृद्ध महिला असून त्या आता 115 वर्षांच्या आहेत. तिने एका वृत्तवाहिनीच्या एका मुलाखतीत सांगितले की, त्या 'सर्व काही' खातात.
- त्यांची नात एथेल हॅरिसनच्या म्हणण्यानुसार, फ्रान्सिस नेहमीच तिच्या बागेत भाज्या वाढवतात आणि योग्य रितीने शिजवून खातात, त्या कधीही फास्ट फूड खात नाही. शिवाय, त्यांनी कधीही धूम्रपान किंवा मद्यपान केले नाही.
- या आरोग्यदायी सवयींमुळे त्याला दीर्घायुष्य लाभले. 102 वर्षांच्या वयातही त्यांनी कधीच मांसाहार केला नाही आणि नेहमी प्लांट बेस्ड डाएट घेतला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या पेस्केटेरियन आहेत म्हणजेच मासे आणि भाज्यांचे सेवन करतात पण मांस खात नाहीत.
- सकाळच्या नाश्त्याला दही, केळी किंवा अन्न धान्यांचा पौष्टीक नाश्ता, दुपारच्या जेवणाला सॅलेड किंवा रेस्टॉरंटमध्ये हलकं भोजन रात्रीच्या जेवणाला मासे, सॅलेड आणि भाजलेल्या बटाट्यांचा समावेश होता.
- एलिझाबेथ प्रामुख्याने वनस्पती-आधारित आहार खातात, ज्यामध्ये फळे, भाज्या आणि काजू यांचा समावेश होतो.
- त्यांचे डाएट मेडिटेरियन डाएटप्रमाणे आहे. ज्यात फळं, भाज्यांचा समावेश आहे.शर्ली डोह्स यांनी मागच्यावर्षी मार्चमध्ये CNBC Make It शी संवाद साधला. तेव्हा त्यांचे वय 106 होते.
- त्यांच्या जेवणात एनिमल फॅट कमीत कमी घेतात आणि फक्त स्किम मिल्क घेतात. त्यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान रेड क्रॉस कडून न्युट्रिशनचा कोर्स केला होता. त्याचवेळी संतुलित आणि साधा आहार घेतला.
- त्यांच्या डाएटमध्ये गोड पदार्थ खूप कमी असायचे. फोर्ब्सशी बोलताना 99 वर्षांच्या मॅकफॅडन यांनी आपले डाएट शेअर केले त्यांनी सांगितले की त्यांचे रोजचे जेवण असे काही होते नाश्त्याला ओटमील, क्रॅनबेरी, ज्यूस आणि केळी, सॅलेडमध्ये बीट, टोमॅटो, चिकन यांचा समावेश होता.
- तर रात्रीच्या जेवणात कमी फॅट्सयुक्त मांस आणि वाफेवर शिजलेल्या भाज्यांचा समावेश होता.
हेही वाचा>>>
Women Safety : महिलांनो..आता आवाज उठवण्याची वेळ आलीय, हिंसाचाराबद्दल गप्प बसू नका, 'या' नंबरवर कॉल करा, काही मिनिटांत पोलिस पोहोचतील
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )