Fact Check: भाजप नेत्यांकडून आपच्या अवध ओझांचा सिसोदियांना 'घाबरट' म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल, दावा ठरला खोटा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Fact Check : आम आदमी पार्टीचे नेते अवध ओझा यांनी मनीष सिसोदियांना घाबरट म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र, हा दावा चुकीचं असल्याच फॅक्ट चेकमध्ये स्पष्ट झालं आहे.
फॅक्ट चेक
निर्णय : असत्य
हा व्हिडीओ एडिटेड आहे, ज्यामध्ये दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कट करुन मनीष सिसोदिया यांच्याशी संबंधित प्रश्नाोसबत जोडण्यात आलं आहे. अवध ओझांनी सिसोदियांना घाबरट म्हटलेलं नाही.
दावा काय आहे?
दिल्ली निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपचे पटपडगंज विधानसभेचे उमदेवार अवध ओझा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अवध ओझांनी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 'घाबरट' आणि 'पळपुटा' म्हटल्याचा दावा त्या व्हिडिओत करण्यात येत आहे. व्हिडीओत एक पत्रकार अवध ओझांना मनीष सिसोदिया यांनी पटपडगंज मतदारसंघ सोडल्यासंदर्भात प्रश्न विचारतो, उत्तरात अवध ओझा म्हणतात, युद्ध ज्यांच्या जीवनात नाही, ते सर्वात मोठे अभागी असतील, मग ज्यांनी वचन मोडलं असेल किंवा रणांगणातून पळ काढला असेल.
या व्हिडीओला काही भाजप नेत्यांनी एक्स वर शेअर केलं आहे. ज्यामध्ये भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय, भाजयुमो राष्ट्रीय सचिव तजिंदर बग्गा, राष्ट्रीय प्रवक्ता प्रदीप भंडारी, भाजप महिला आघाडीच्या दिल्लीच्या सचिव वैशाली पोद्दार यांचा समावेश आहे. यांच्या पोस्ट इथं, इथं,इथ आणि इथं पाहू शकता.
दरम्यान, आमच्या पडताळणीत हे समोर आलं की खरंतर हा व्हिडीओ एडिटेड आहे. अवध ओझा यांच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कट करुन त्याचा वापर करण्यात आला आहे. ते उत्तर मनीष सिसोदिया आणि पटपडगंज विधानसभेशी जोडण्यात आला आहे. मुलाखतीत अवध ओझांनी सिसोदियांना एकदाही घाबरट म्हटलं नाही.
सत्य कसं समोर आलं?
याशिवाय आम्हाला व्हायरल व्हिडीओत एनडीटीव्हीचा माईक दिसून आला. ज्यावरुन आम्ही एनडीटीव्हीच्या यूट्यूबवर शोध घेतला. जिथं आम्हाला हा 8 जानेवारी 2025 चा प्रकाशित केलेला व्हिडीओ मिळाला (अकाईव्ह लिंक) आम्हाला आढळून आलं की पत्रकार राजीव रंजन यांनी आपच्या पटपडगंजचे उमेदवार अवध ओझा यांची मुलाखत घेतली होती. मूळ व्हिडीओ पाहिलायनंतर दिसून येतं की वेगळ्या प्रश्नाचं उत्तर कट करुन सिसोदिया आणि पटपडगंज जागेसंबंधीच्या प्रश्नाशी जोडण्यात आलं आहे.
व्हायरल व्हिडिओत हे पाहायला मिळणारं उत्तर मूळ व्हिडीओत 51 व्या सेकंदाला मिळतं. इथं राजीव रंजन अवध ओझा यांची ओळख करुन देतात. ते म्हणतात हे राजकारणात नवे आहेत आणि थेट निवडणुकीच्या मैदानात उतरवलं गेल आहे. याच्या उत्तरात अवध ओझा म्हणतात, युद्ध ज्यांच्या जीवनात नसते ते मोठे अभागी असतील, मग ते वचन तोडणारे असो किंवा रणांगणातून पळून जाणारे, यानंतर ते त्यांच्या शिक्षण विषयक योजनांबाबत भाष्य करतात.
मुलाखतीत कुठंही अवध ओझा यांनी मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध नकारात्मक टिप्पणी करत नाहीत. आम्हाला इतर मुलाखती किंवा सार्वजनिक वक्तव्यांमध्ये तश प्रकारचा संदर्भ आढळला नाही.
निर्णय
हा दावा चुकीचा आहे. व्हायरल व्हिडीओ एडीट करण्यात आला आहे. ज्यामध्ये अवध ओझा एका दुसऱ्याचं प्रश्नाचं उत्तर देतात ते सिसोदिया आणि पटपडगंच मतदारसंघाशी जोडून व्हायरल केलं जात आहे. अवध ओझांनी मनीष सिसोदियांना घाबरट किंवा पळपुटा म्हटलेलं नाही.
[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा लॉजिकली फॅक्टसवर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]
इतर बातम्या :