एक्स्प्लोर

नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख याचा हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये 18 जानेवारीला मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

नांदेड : राज्यातील फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी झाला असून आता पालकमंत्रीपदाचे वाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणामुळेही पालकमंत्रीपदाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मंत्री धनंजय मुंडेंना (Dhananjay munde) देऊ नये, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा मुख्यमंत्र्‍यांनी पालकमंत्रीपद स्वीकारावे अशी मागणी बीडमधील लोकप्रतिनिधी व सकल मराठा समाजाच्या समनव्यकांनी केली आहे. आता, बीडनंतर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही मुंडेंना नको, असा सूर उमटत असून नांदेडमधील सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी आज ती भूमिका मांडली. त्यामुळे, पालकमंत्रीपदावरुन मुंडे अडचणीत येत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापू्र्वीच पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली जातील. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसला जाण्यापूर्वीच ही नावे जाहीर होतील, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे, पुढील 2 ते 3 दिवसांत जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर होणार आहेत. 

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख याचा हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये 18 जानेवारीला मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आता हा मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाने आज पत्रकार परिषदेत दिली. बीडमधील घटनाप्रकरणी आत्तापर्यंतच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण होत आहेत. याप्रकरणाच्या तपासावर आम्ही समाधानी आहोत, त्यामुळे हा मोर्चा हा स्थगित केला आहे. मात्र, नांदेडचे पालकमंत्रीपद मुंडे बंधु-भगिनींपैकी कोणालाही नको, जर नांदेडला पालकमंत्री म्हणून मुंडेंना पदभार दिल्यास इथला गोर-गरीब समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच येथील मराठा समाजाच्या समन्वयकांनी दिला आहे. 

यदा कदाचित राज्यातील जनता म्हणत असेल बीडचा बिहार झालाय. पण आम्हाला नांदेडचा बीड होऊ द्यायचा नाही, नांदेड ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाते. या राजधानीत सारे गुण्या-गोविंदाने राहतात,  त्यामुळे, राज्य सरकारला विनंती आहे की,बीडची संस्कृती नांदेडमध्ये रूजू नये म्हणून पालकमंत्री मुंडे बंधुंना नको. नांदडेचे पालकमंत्री पद मुंडे बंधू किंवा भगिनी कोणालाही नको, असे नांदेडच्या सकल मराठा समाजाचे समन्वयक श्याम पाटील वडजे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, आता पुढील दोन दिवसांत राज्यातील पालकमंत्र्यांची घोषणा होणार असून नांदेडच्या पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा

High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
RBI : रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांचे निर्बंध, ठेवी स्वीकारणे, कर्ज देण्यास मनाई
रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध,
सुषमा अंधारेंकडून एकनाथ शिंदेंच्या भावावर 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
सुषमा अंधारेंकडून एकनाथ शिंदेंच्या भावावर 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
RBI : रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांचे निर्बंध, ठेवी स्वीकारणे, कर्ज देण्यास मनाई
रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध,
सुषमा अंधारेंकडून एकनाथ शिंदेंच्या भावावर 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
सुषमा अंधारेंकडून एकनाथ शिंदेंच्या भावावर 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
Dhananjay Munde: आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
Embed widget