वजन कमी करण्यासाठी आहारात दररोज किती फायबरयुक्त पदार्थ असायला हवेत? पोषणतज्ञ सांगतात..
फायबर हा घरातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. याने पचनक्रिया सुरळीत राहून रक्तातील साखर नियंत्रित राहते. याशिवाय याचे इतर अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
Health: सध्या वजन कमी करण्यासाठी अनेक जण सप्लीमेंट प्रोटीन पावडर फायबरयुक्त पदार्थ (Fiber Food ) अशा बाहेरच्या हेल्थ प्रोडक्टवर अवलंबून राहतात. परंतु अनेकांना वजन कमी करण्यासाठी हे शक्य होतेच असे नाही. घरातील जेवणामध्ये ही अनेक पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे वजन कमी (Weightloss) करण्यासाठी मोठा फायदा होतो. आपल्या शरीराला प्रोटीन, विटामिन्स, फायबर तसेच ऊर्जा टिकून राहण्यासाठी कॅलरीजची सुद्धा आवश्यकता असते. आपला डाएटमध्ये काही छोट्या छोट्या बदल केले तर वजन कमी करण्याचा रस्ता सोपा होतो. फायबर युक्त पदार्थांचा वजन कमी करण्यासाठी फायदा होत असल्याचं द स्मॉल चेंज डायटचे लेखक केली ग्यांस म्हणतात. आपल्यापैकी बहुतेकांना फायबर सेवनाबद्दल अधिक माहिती नसते.
फायबर हा घरातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. याने पचनक्रिया सुरळीत राहून रक्तातील साखर नियंत्रित राहते. याशिवाय याचे इतर अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
आहारातील फायबर म्हणजे काय?
फळे भाज्या धान्य तसेच वनस्पती आधारित पदार्थांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. दोन प्रकारचा फायबर असतं. पाण्यात विरघळणारे आणि न विरघळणार. ओट्स शेंगा आणि काही फळांमध्ये आढळणारे द्रव्य फायबर पाण्यात विरघळल्यानंतर तयार होतं जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. उच्च फायबर युक्त पदार्थ खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी किती फायबर खावे?
फायबर किती खावे याचं प्रमाण व यलिंग आणि कॅलरीच सेवन या घटकांवर अवलंबून असल्याचा तज्ञ सांगतात. प्रौढांसाठी दररोज 25 ते 30 ग्रॅम फायबर चे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. भारतातील पारंपरिक आहारात वनस्पती आधारित अन्नपदार्थात फायबर मुबलक प्रमाणात असते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ने दररोज 25 ते 30 ग्रॅम फायबर खाण्याचे शिफारस केली असून नाश्त्यापासून तुम्ह आहारात फायबर घेण्यास सुरुवात करू शकता.
भारतीय आहारात कोणत्या अन्नात फायबर अधिक?
भारतीय आहारात सर्व पोषण पदार्थांचा समावेश असल्याने हा वजन कमी करण्यासाठी उत्तम आहार असला तर सांगितलं जातं. धान्य शेंगा फळे आणि भाज्यांमध्ये नैसर्गिकरित्या फायबर असतं. गहू किंवा नाचणी सारख्या धान्यामध्ये तसेच बाजरी पासून बनवलेल्या पोळ्या किंवा भाकरीमध्येही फायबर असते. फळे आणि भाजीपाला यांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक जण ओट्स खाण्यासही पसंती देतात.
हेही वाचा:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )