(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Good Health Care Tips : सावधान! जेवणानंतर तुम्ही 'या' चुका तर करत नाहीत ना?
Health Care Tips : निरोगी राहण्यासाठी जेवणानंतर लगेच काय करावे आणि काय करू नये ते जाणून घ्या.
Health Care Tips : आपल्या रोजच्या सवयींचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. दरम्यान कामाच्या व्यापामुळे अनेकदा आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. जेवण न केल्याने शरीराची मोठी हानी होत असते. रीर निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आहार वेळेवर घेतला पाहिजे. त्याचबरोबर निरोगी राहण्यासाठी अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
फळं खाणे : फळांमध्ये अनेक पोषक तत्वांचा समावेश असतो. परंतु जेवणानंतर फळे खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते. यामुळे पचन आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी जेवणानंतर लगेच फळे खाऊ नयेत. जेवल्यानंतर एक तासानंतरच फळे खावीत.
व्यायाम करणे : जेवणानंतर लगेच जिम किंवा वर्कआउट करणे टाळावे. असे केल्याने तुम्हाला अस्वस्थता येऊ शकते. आपले शरीर एका विशिष्ट पद्धतीने बनलेले आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ आहे. जेवल्यानंतर वर्कआउट केल्याने आळस आणि पोटाचा त्रास होतो.
धूम्रपान आणि तंबाखू : जेवणानंतर धूम्रपान करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. तंबाखूमध्ये असलेल्या निकोटीनमुळे अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे कोलन कॅन्सरची शक्यतादेखील वाढते.
जेवण केल्यानंतर लगेच झोपणे : बहुतेक लोकांना जेवण झाल्यावर झोप येते, पण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Weight Loss Exercise: डाएट करूनही पोटाची चरबी कमी होत नाही? घरीच करा एक्सरसाइज; बेली फॅट लगेच होईल कमी
Weight Loss Diet : वजन कमी करायचंय? मग बदला तुमच्या जेवणाची वेळ, होतील फायदेच फायदे
Winter Weight Loss Tips: हिवाळ्यात तुमच्या आहारात करा 5 बदल, झटपट कमी होईल वजन
Skin Care Tips : त्वचेवरील काळपटपणा घालवण्यासाठी घरच्या घरी करा फेस पॅक; झटपट पडेल फरक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )