Ginger Benefits : आल्याचे आरोग्यदायी फायदे, अशाप्रकारे करा आहारात समावेश
Health tips : कच्चे आले खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Health Care Tips : आले केवळ चहाची चवच वाढवत नाही तर कच्च्या आल्याचे सेवन करणे आरोग्यासाठीदेखील फायदेशीर आहे. कच्च्या आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. यामुळे आरोग्याला फायदा होतो. कच्च्या आल्यामध्ये व्हिटॅमिन अ, व्हिटॅमिन डी, आयर्न, झिंक आणि कॅल्शियम सारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे अनेक आजार दूर होतात. कच्चे आले खाण्याचे अनेक फायदे आहेत.
कच्चे आले खाण्याचे फायदे :
पोटासाठी फायदेशीर : कच्चे आले पोटासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कच्च्या आल्याचा आहारात समावेश केल्याने पोटदुखी सारख्या समस्यादेखील उद्भवत नाहीत. तुम्ही जर पोटदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर कच्च्या आल्याचे सेवन करू शकता.
मायग्रेनच्या दुखण्यामध्ये फायदेशीर : मायग्रेनच्या दुखण्यामध्ये कच्चे आले खूप फायदेशीर मानले जाते. जर एखाद्याला मायग्रेनची तक्रार असेल तर त्याने रोज कच्च्या आल्याचे सेवन करावे. थकवा जाणवत असल्यास कच्चे आले खूप फायदेशीर आहे.
कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात : कच्चे आले हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आल्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येते. कोलेस्ट्रॉलच्या समस्येचा सामना करणाऱ्यांसाठी कच्चे आले फायदेशीर ठरते.
रक्तदाब नियंत्रित : कच्चे आले रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे जर एखाद्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर त्याने दररोज कच्चे आले खावे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Health Tips : गव्हाची चपाती की मल्टीग्रेन आटा रोटी, वजन कमी करण्यासाठी कोण ठरेल फायदेशीर?
Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? मग, आहारात नक्की सामील करा ‘ही’ फळं आणि भाज्या!
Health Tips : शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी दररोज 'हे' एनर्जी ड्रिंक्स प्या, मिळतील अनेक फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )