Fitness: काय सांगता! रोज व्यायाम करणाऱ्यांपेक्षा, वीकेंडला वर्कआऊट करणारे लोक 'फिट'? अभ्यासातून माहिती समोर, तज्ज्ञ सांगतात..
Fitness: एका अभ्यासानुसार वीकेंड वर्कआउट्स दैनंदिन व्यायाम करणाऱ्या लोकांपेक्षा अधिक प्रभावी ठरत आहे. ज्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका 40% कमी होतो.
Fitness: आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कोणाकडे स्वत:साठी देखील वेळ नसतो. काही जण कामात तसेच इतर जबाबदाऱ्यांमध्ये इतके गुंतून जातात की त्यांना रोज व्यायाम करायला मिळत नाही. मग असे लोक आठवड्याच्या शेवटी म्हणजेच वीकेंडला व्यायाम करतात. एका अभ्यासानुसार आश्चर्यकारक तथ्य समोर आलंय, ज्यात म्हटलंय की, रोज व्यायाम करणाऱ्यांपेक्षा, वीकेंडला वर्कआऊट करणारे लोक 'फिट' ठरत आहेत. यावर अनेकांना हे कसं शक्य आहे? असा प्रश्न पडला असेल तर ही बातमी जरूर वाचा..
'रोजच्या ऐवजी वीकेंडला व्यायाम करतात ते जास्त 'फिट' असतात?
एका अभ्यासानुसार, जे लोक रोजच्या ऐवजी वीकेंडला जोमाने व्यायाम करतात ते जास्त 'फिट' असतात. दररोज व्यायाम करणाऱ्यांच्या तुलनेत, आठवड्याच्या शेवटी व्यायाम करणाऱ्यांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका 40% कमी होतो. शास्त्रज्ञांच्या मते, लोक आठवड्यातून किती वेळा व्यायाम करतात यापेक्षा ते कसे व्यायाम करतात हे महत्त्वाचे आहे. वास्तविक, 100,000 लोकांवर केलेल्या अभ्यासात हे धक्कादायक तथ्य समोर आले आहेत.
हा अभ्यास कसा आणि कोणावर करण्यात आला?
माहितीनुसार, राष्ट्रीय आरोग्य सेवा आठवड्यातून एकूण 150 मिनिटे मध्यम व्यायाम किंवा 75 मिनिटे जोरदार व्यायामाची शिफारस करते. एका अभ्यासात, जे लोक दररोज व्यायाम करतात ते या नियमांचे पालन करत नव्हते. खरं तर, यूकेमधील बायोबँक प्रकल्पांतर्गत, हा अभ्यास अनेक वर्षांपासून सुमारे एक लाख लोकांवर केला गेला आहे. या सर्व लोकांवर एक्साईजचे घड्याळ बांधण्यात आले होते.
Can’t make time for exercise during the week?
— Zib Atkins (@AyusWellness) September 27, 2024
Don’t worry.
Research suggests that getting in the time just over the weekend may still provide many of the health benefits:
- A study of nearly 90,000 UK participants looked at the effects of:
1. Low physical activity (less than… pic.twitter.com/nNLm9yb1Gg
मधुमेहाचा धोका 40% आणि उच्च रक्तदाब 20% ने कमी
अभ्यासानुसार, आठवड्याच्या शेवटी जोमदार व्यायाम करणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी झाला. याशिवाय, जे दररोज व्यायाम करतात त्यांच्या तुलनेत, आठवड्याच्या शेवटी व्यायाम करणाऱ्यांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका 40% कमी होतो. त्याच वेळी, प्रदीर्घ अभ्यासानंतर, डॉक्टरांना असे आढळून आले की, जे लोक वीकेंडला पुरेसा व्यायाम करतात, त्यांचा ताण कमी असतो, त्यांचा मूड चांगला राहतो आणि त्यांना किडनीच्या आजाराचा धोकाही कमी होतो.
तुमच्यासाठी फायदेशीर असा व्यायाम निवडा, डॉक्टर म्हणतात...
बोस्टनमधील मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शान खुर्शीद, यांनी या अभ्यास पथकाचे नेतृत्व केले, ते म्हणाले की, अभ्यासातून असे दिसून आले आहे की, फिट राहण्यासाठी कोणत्याही एका पॅटर्नपेक्षा शारीरिक हालचालींचे प्रमाण महत्त्वाचे आहे. मुख्य गोष्ट अशी आहे की, व्यायामातून व्हॉल्यूम प्राप्त करणे महत्त्वाचे आहे, ते म्हणाले की, जे लोक आठवड्यातून 150 मिनिटे जोमाने व्यायाम करतात आणि भरपूर घाम गाळतात, त्यांना 250 पेक्षा जास्त आजारांचा धोका कमी असतो.
हेही वाचा>>>
Fitness Tips: करिश्मा कपूरनेही एकेकाळी तब्बल 25 किलो वजन कमी केले होते, आता दिसते नवतरुणी काश्मिरी! फिटनेस सीक्रेट जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )