Knee tumor : टॉयलेट सीटवर बसताच गुडघ्याचं हाड मोडलं; मेडिकल रिपोर्टमुळे धक्काच बसला!
Knee tumor : बेथानी इस्तन नावाच्या महिला पायऱ्या चढून बेडरूमकडे जात होती. या दरम्यान तिच्या उजव्या पायात त्रास सुरू झाला. यानंतर महिला टॉयलेट सीटवर बसताच तिच्या गुडघ्याचं हाड मोडल्याचे समोर आले आहे.
Knee tumor : आपल्या वाढत्या वयासोबत हाडे ठिसूळ व्हायला सुरूवात होते. हे एकदम नैसर्गिक आहे. पण सध्या तरूणाईमध्ये हाडांची समस्या दिसून येत आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही वर्षापूर्वी वयस्कर व्यक्तींमध्येच हाडांशी संबंधित आजार आढळून येत होते. तर काहीजणांना सांधेदुखीचा त्रास सुरू होत असतं. परंतु सध्या तरूणांनासुद्धा हाडांच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. आपण बऱ्याच वेळा अनुभवलं असेल की अचानक बसून उठता हाडांचा कट-कट आवाज येतो. याकडे आपल्यातील बरेचजण दुर्लक्ष करतात. यामुळे गंभीर समस्येला सामोरे जावं लागू शकतं. अशीच एक चिंता वाढवणारी घटना समोर आली आहे. बेथानी इस्तन नावाची एक महिला टॉयलसीटवर बसली आणि तिच्या गुडघ्याची हाडे मोडल्याचे समोर आले आहे. ही महिला इंग्लंडची (England) रहिवाशी असून तिला गुडघ्याचा ट्युमर (Knee tumor) झाला आहे.
टॉयलेट सीटवर बसली अन्...
'न्यूयॉर्क पोस्ट'च्या एका बातमीनुसार, फेब्रुवारी 2017 मध्ये बेथानी इस्तन नावाची महिला पायऱ्या चढून बेडरूमकडे जात होती. यादरम्यान तिच्या उजव्या पायात अचानक त्रास सुरू झाला. यामुळे महिला थोड्या वेळ थांबली आणि टॉयलेट सीटवर बसली. यावेळी टॉयलेट सीटवर बसताना तिला गुडघ्याची हाडे मोडल्याचा आवाज आला. यादरम्यान महिलेला प्रचंड वेदना जाणवल्या. यामुळे तिला जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तेथील डॉक्टरांनी सांगितले की, महिलेच्या गुडघ्यामध्ये एक मोठा ट्युमर झाला आहे. यामुळे तिच्या गुडघ्याची मऊशार गादी कमकुवत झाली आहे. यानंतर डॉटक्टरांनी सांगितले की, या ट्युमरमुळे त्यांना गुडघा आणि जांघेतील हाडांना बदलाव लागणार आहे.
बहुतांश सर्जरीमध्ये रूग्णांचे चालणे-फिरणे होते बंद
हाडाच्या ट्युमरचे ऑपरेशन केल्यानंतर महिलेने सांगितले की, 99 टक्के ऑपरेशनमध्ये रूग्णांच पूर्णत: चालू-फिरू शकत नाहीत. यासाठी त्यांना पुन्हा चालायला शिकावं लागेल. यासोबत त्यांना कधीच हाय हिल सँडल्स घालता येणार नाही. या महिलेच्या गुडघ्याचे ऑपरेशन पूर्ण करण्यात आले असून आता महिला हळूहळू चालत आहे. याचं बेथानी आता लोकांनाही जागरूक करत आहेत. जेव्हा अशा वेदना जाणवत असतील त्याकडे दुर्लक्ष करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
लाख लोकांपैकी एका व्यक्तीला होता हाडाचा ट्युमर
अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स मेडिसीनच्या म्हणण्यानुसार, हा एका मोठ्या पेशींचा ट्युमरच्या प्रकारातील दुर्मिळ आणि धोकादायक आजार आहे. हे ट्युमर साधारपणे हाडाच्या दोन सांध्यामध्ये वाढतो. हे फक्त गुडघ्यातच वाढत नाही, तर डोळ्यांत, हातात आणि पायाच्या हाडांमध्येही वाढताना दिसून येऊ शकतो. हा अत्यंत दुर्मिळ आजार असून लाखो लाकांपैकी एका व्यक्तीला आजार होतो.
इतर बातम्या वाचा :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )