एक्स्प्लोर

वर्क फ्रॉम होममुळे मुंबईकरांचा आजार बळावतोय; बैठ्या कामामुळे 40 वर्षीय व्यक्तीच्या मणक्यात गाठ

लॉकडाऊनमुळे अनेकजण घरुनचं काम करत आहेत. मात्र, सतत बसून काम करत असल्याने अनेकांना पाठीदुखीचे आजार होत आहेत. अशाच एका 40 वर्षीय रुग्णाच्या पाठीतून 3.5 सेंटिमीटरची गाठ काढली आहे.

मुंबई : लॉकडाऊनमुळे सध्या अनेक लोक एकीकडे वर्क फ्रॉम होम करण्यात यशस्वी होत असताना दुसरीकडे मात्र शारीरिक तंदुरुस्ती राखण्यात अपयशी ठरत आहेत. बराच वेळ एकाच ठिकाणी बसून सतत काम करावे लागत असल्याने पाठदुखीची समस्या बळावू लागलीय. याचा प्रत्यय नुकताच आलायं. लॉकडाऊनच्या या कालावधीत अधिक तास बसून काम करावे लागत असल्याने मुंबईतील एका व्यक्तीच्या मणक्यात गाठ तयार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील एका ४० वर्षीय व्यक्तीच्या पाठीच्या मणक्यातून 3.5 सेंटिमीटरचा ट्यूमर (गाठ) काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. हा रुग्ण कित्येक महिने पाठीच्या दुखण्याने त्रस्त होता. मीरारोड येथील वोक्हार्ड रूग्णालयात ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जास्त वेळ बसून काम केल्याने पाठीचं दुखणं भूपेश अंकोलेकर (वय 40) असे या रुग्णाचे नाव असून ते मुंबईत राहणारे आहेत. ही व्यक्ती व्यवसायाने अभियंता आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे अनेक महिन्यांपासून त्यांना पाठदुखीची समस्या जाणवत होती. मात्र, लॉकडाऊनमध्ये घरीच बसून काम करावे लागत असल्याने पाठीचे दुखणे अधिकच वाढू लागले. दुखणं असह्य झाल्याने कुटुंबियांनी त्यांना मे च्या पहिल्या आठवड्यात मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय; 28 जूनपासून राज्यात सलून उघडण्यास परवानगी या रुग्णालयातील तज्ज्ञ सल्लागार आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गिरीश भालेराव यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू झाले. पाठीच्या दुखण्याचे कारण जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा एक्स-रे आणि एमआरआय चाचणी करण्यात आली. या वैद्यकीय तपासणीत या व्यक्तीच्या पाठीच्या कण्यात गाठ असल्याचं निदान झालं. ही गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढणे गरजेचं होते. त्यानुसार कुटुंबियांच्या परवानगीनुसार डॉक्टरांनी दुर्बिणीद्वारे ही शस्त्रक्रिया करुन पाठीच्या मणक्यातून गाठ काढली. ही गाठ 3.5 सेंटिमीटर इतकी मोठी होती. यासंदर्भात बोलताना मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयातील तज्ज्ञ सल्लागार आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गिरीश भालेराव म्हणाले की, "पाठीच्या कण्यातील ही गाठ हाडाच्या आत चिटकून होती. मज्जातंतूला नुकसान होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे खूपच अवघड होतं. परंतु, डॉक्टरांनी हे आव्हान स्विकारुन मायक्रोस्क्रोपीद्वारे (दुर्बिणी) प्रक्रिया करून पाठीच्या मणक्यातील ही गाठ यशस्वीरित्या गाठली. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला पाठीच्या दुखण्यातून कायमस्वरुपी सुटका मिळाली आहे." रुग्णालयाबाहेर झालेले मुंबईतील 1000 मृत्यू का दडवले? देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र वोक्हार्ट रुग्णालयातील कन्सल्टंट न्यूरोसर्जन डॉ. अश्विन बोरकर म्हणाले की, "पाठीच्या कण्यातून गाठ काढणे ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते. साधारणतः चार तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. या शस्त्रक्रियेनुसार रूग्ण शुद्धीवर आल्यावर कुठल्याही प्रकारची वेदना जाणवत नाही. दोन तासांनंतर तो दैनंदिन आयुष्य जगू शकतो. या रूग्णाला शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसांनी घरी सोडण्यात आले आहे. आता या रुग्णाची प्रकृती ठणठणीत असून तो नियमित कामे करू लागला आहे." रूग्ण भूपेश अंकोलेकर म्हणाले की, "पाठीच्या मणक्यात ट्यूमर (गाठ) असल्याचे निदान झाल्याने कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण होते. शस्त्रक्रियेद्वारे गाठ काढणे हा एकच पर्याय होता. त्यानुसार डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे ही गाठ काढली. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आता मला या पाठीच्या दुखण्यातून सुटका मिळाली आहे. आता मी पूर्वीप्रमाणे आयुष्य जगू शकतोय." Salon Reopen | राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, 28 जूनपासून राज्यात सलून उघडण्यास परवानगी

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!
नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!
Devendra Fadnavis Nana Patekar Death: नाना मला भाऊ आणि मार्गदर्शक मित्रासारखा, मुख्यमंत्री गहिवरले, मल्हारला फोन करुन म्हणाले, नानांचं कार्य आपण कायम ठेवू!
नाना मला भाऊ आणि मार्गदर्शक मित्रासारखा, मुख्यमंत्री गहिवरले, मल्हारला फोन करुन म्हणाले, नानांचं कार्य आपण कायम ठेवू!
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं; नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO
नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं; नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Embed widget