(Source: ECI | ABP NEWS)
वजन कमी करण्याच्या औषधांनी हार्टअटॅकचा धोका? तज्ज्ञ काय सांगतात?
अनेकदा लोकांमध्ये अशी भीती असते की, वजन कमी करणाऱ्या औषधांमुळे हार्ट अटॅक येतो का? चला यामागचं खरं जाणून घेऊया.

Health: आजच्या काळात जर कुणाला विचारलं की तुमच्यासाठी सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे, तर बहुतेक लोकांचं उत्तर असतं लठ्ठपणा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच यामुळे त्रस्त आहेत. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि चुकीचे खाणे-पिणे यामुळे ही समस्या झपाट्याने वाढते आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा वाचण्यासाठी बरेच लोक औषधांचा आधार घेत आहेत. पण अनेकदा लोकांमध्ये अशी भीती असते की, वजन कमी करणाऱ्या औषधांमुळे हार्ट अटॅक येतो का? चला यामागचं खरं जाणून घेऊया.
वजन कमी करणाऱ्या औषधांचा अभ्यास
अमेरिकेत काही दिवसांपूर्वी यावर एक संशोधन झालं. ओझेम्पिक (Ozempic) नावाच्या औषधावर संशोधन करण्यात आलं होतं. या रिसर्चमध्ये असे समोर आले की ही औषधं फक्त वजन कमी करत नाहीत तर हृदयाच्या आजारांमध्येही मदत करतात. 'मास जनरल ब्रिघम' ग्रुपच्या डॉक्टरांनी केलेल्या या अभ्यासाने जगभरात लक्ष वेधलं.
संशोधनात दिसलं की ज्यांना आधीपासून हृदयाचे आजार आहेत, त्यांच्यासाठी ही औषधं उपयोगी ठरली. औषध घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयात जाण्याची वेळ खूप कमी आली. अभ्यासात दोन औषधांवर जास्त लक्ष दिलं -सेमाग्लूटाइड (Semaglutide) आणि टिर्झेपेटाइड (Tirzepatide). यात 90,000 रुग्णांचा समावेश करण्यात आला होता, ज्यांना हार्ट फेल्युअर, लठ्ठपणा आणि टाईप-2 डायबेटीस होती.
औषधांमुळे खरंच हार्ट अटॅक येतो का?
डॉक्टरांच्या मते, ही धारणा आता चुकीची ठरली आहे की वजन कमी करणाऱ्या औषधांमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. संशोधनात दिसलं की सेमाग्लूटाइड घेणाऱ्यांमध्ये मृत्यू किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे चान्सेस 42 टक्क्यांनी कमी झाले. तर टिर्झेपेटाइड वापरणाऱ्यांमध्ये हा परिणाम आणखी जास्त म्हणजे 58 टक्क्यांपर्यंत पोहोचला.
काय लक्षात ठेवावं?
वजन कमी करण्यासाठी औषधं घ्यायची असतील तर फक्त खऱ्या आणि ब्रँडेड औषधांचा वापर करा.
बनावट औषधं धोकादायक ठरू शकतात.
काही जुन्या औषधांमुळे खरंच हार्ट अटॅकचा धोका होता, त्यामुळे त्या बाजारातून काढून टाकल्या गेल्या आहेत.
आणि सर्वात महत्वाचं – कोणतंही औषध सुरू करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
हेही वाचा
Health: झोप पूर्ण होत नाही? सतत टेन्शन घेताय? सावधान, हार्ट फेल्युअरचा मोठा धोका, तज्ज्ञ सांगतात...
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
























