Coronavirus : कोरोना लसीकरणापूर्वी अन् लसीकरणानंतर आहाराची घ्या विशेष काळजी, 'या' पदार्थांचं सेवन टाळा
लसीकरण (Corona vaccination) करण्यापूर्वी आणि लसीकरणानंतर काय खावं? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. आरोग्य उत्तम राखण्यासाठी संतुलित आहार आणि मुबलक प्रमाणात पाण्याचं सेवन करणं अत्यंत आवश्यक असतं. तसेच लसीकरणापूर्वी आणि लसीकरणानंतरही आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं.
मुंबई : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. अशातच देशात कोरोना विरोधातील लढाईसाठी महत्त्वाची असणारी लसीकरण (Corona vaccination) मोहिम सुरु आहे. लसीकरणासंदर्भात अद्यापही नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. लसीकरण केल्यानंतर काही होणार तर नाही? लसीकरण करणं गरजेचंच आहे का? असे प्रश्न तर अद्यापही अनेकांच्या मनात आहेत. पण याचसोबत लसीकरण करण्यापूर्वी आणि लसीकरणानंतर काय खावं? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहेच. अशातच सर्वांच्या मनातील प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी हार्वर्ड न्यूट्रिशनल मानसशास्त्रज्ञ डॉक्टर उमा नायूडने इंस्टाग्रामची मदत घेतली आहे. डॉक्टर उमा नायूड यांनी सांगितलं की, "लसीकरण करताना आवश्यक आहे की, तुम्ही आपल्या डाएटवर लक्ष द्यावं. त्यामुळे लसीकरणानंतर होणारे साईड इफेक्ट्स कमी करण्यास मदत होते."
लसीकरणापूर्वी संतुलित आहार घ्या
लसीकरणापूर्वी किंवा लसीकरणानंतर आपल्या आहाराच्या बाबतीत कोणतीही तडजोड करु नका. लस घेतल्यानंतरच्या साईड-इफेक्ट्समध्ये अशक्तपणा, भोवळ येणं यांसारख्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. हे साईड-इफेक्ट्स तुम्ही योग्य आणि संतुलित आहारा घेऊ कमी करु शकता. डॉक्टर उमा यांनी आहाराबाबतीत काही सुचना दिल्या आहेत. या टिप्स तुम्ही लसीकरणापूर्वी किंवा लसीकरणानंतर फॉलो करु शकता.
आहारात फायबर्सचा समावेश करा
शरीराचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. लसीकरणानंतर आराम करणं अत्यंत आवश्यक आहेत. तसेच कडधान्यांचाही आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे सॅच्युरेटेड फॅट्स आणि शुगर कन्टेंट जास्त असणारे पदार्थ खाणं टाळा.
प्रोसेस्ड फूड ऐवजी कडधान्यांचा समावेश करा
ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशिक करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, संतुलित आहार या कोरोना महामारीत आरोग्य निरोगी आणि उत्तम राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही कोविड-19 लसीचा डोस घेण्याचा निर्णय घ्याल, त्यावेळी आहारात प्रोसेड फुड्सऐवजी फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. तसेच सॅच्युरेटेड पदार्थ आणि अधिक कॅलरीयुक्त पदार्थांचं सेवन करणं टाळा.
हायड्रेटेड फ्रुट्सचा समावेश करा आणि मुबलक पाणी प्या
शरीराला हायड्रेट ठेवा. उत्तम आरोग्यसाठी शरीर निरोगी राहणं अत्यंत गरजेचं असतं. शरीराचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी पाणी संतुलित आहार आणि मुबलक प्रमाणात पाण्याचं सेवन करणं आवश्यक असतं. त्यामुळे लसीकरणापूर्वी आणि लसीकरणानंतर मुबलक पाणी पिणं अत्यंत आवश्यक असतं.
(टीप : सदर माहिती ही तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीवरुन देण्यात आलेली आहे. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- तरूणांनो सावधान! अचानक येऊ शकतो हृदयाचा झटका; ही आहेत लक्षणं
- Health Tips: उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत करतात ही फळं, भाज्या; जरुर करा त्यांचं सेवन
- Morning walk benefits | इव्हिनिंग वॉकच्या तुलनेत मॉर्निंग वॉक अधिक फायद्याचा; पाहा कसे आहेत याचे परिणाम
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )