(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Symptoms : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या लक्षणांमध्ये बदल, सर्दी आणि ताप नाही 'ही' आहेत नवीन लक्षणे
Coronavirus Symptoms : काळानुसार कोरोनाच्या विषाणूप्रमाणे कोरोनाच्या लक्षणांमध्येही बदल झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही महिन्यांमधील रुग्णांमध्ये सांधेदुखी हे लक्षणंही आढळलं आहे. वाचा सविस्तर...
Coronavirus XBB 1.5, BF.7 Variant Symptoms : कोरोना महामारीचा गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ कहर पाहायला मिळत आहे. काळानुसार कोरोनाच्या विषाणूचे अनेक प्रकार समोर आले आहेत. सध्या जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराच्या एक्सबीबी 1.5 (XBB 1.5 Variant) आणि बीएफ.7 (BF.7 Variant) या सबव्हेरियंटचा उद्रेक पाहायला मिळत आहे. जगभरात दिवसागणिक या सबव्हेरियंटच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग होताना पाहायला मिळत आहेत. या काळात कोरोना विषाणूमध्ये बदल झाला आहे. कोरोना विषाणूने काळानुरुप स्वत:मध्ये बदल केले आहेत. आतापर्यंत कोरोना डेल्टा, अल्फा, ओमायक्रॉन हे व्हेरियंट आढळले. त्यानंतर या व्हेरियंटचे सब-व्हेरियंट आढळले. विषाणूमध्ये बदल झाल्यामुळे त्याच्या लक्षणांमध्येही सातत्याने बदल होताना पाहायला मिळाला आहे.
काळानुसार बदलत आहेत कोरोनाची लक्षणे
कोरोनाचे नवीन व्हेरियंट आढळून आले, त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढल्याचे दिसत आहे. सध्या जगभरात XBB 1.5 आणि BF.7 व्हेरियंटचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरल्याचे दिसत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते गेल्या काही काळात कोरोनाच्या लक्षणांमध्ये बदल झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या लक्षणांमध्ये सर्दी, ताप, खोकला ही सुरुवातीलपासून सर्वात सामान्य लक्षणे आहेत. पण कोविड विषाणूप्रमाणे त्याची लक्षणे देखील काळानुसार बदलत आहेत. त्यानंतर थकवा येणे, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास, डोकेदुखी, गोंधळलेली अवस्था आणि बदललेली चव, गंध न येणे, ही लक्षणे रुग्णांमध्ये आढळून आली. मात्र, आता पुन्हा कोरोनाच्या लक्षणांमध्ये बदल झाला आहे.
एका रिपोर्टनुसार, गेल्या काही महिन्यामध्ये आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये खालील प्रमाणे लक्षणे दिसून आली. यामध्ये काही लक्षणे पूर्वीप्रमाणे सारखीच होती, तर काही लक्षणे नवीन असल्याचे दिसून येत आहे.
सर्दी आणि ताप नाही 'ही' आहेत नवीन लक्षणे
- घसा खवखवणे
- डोकेदुखी
- पाठ दुखी
- कंबर दुखी
- अंग दुखी
- नाक वाहणे
- थकवा
- शिंका येणे
- रात्री घाम येणे
कोरोनाच्या व्हेरियंटचा शरीरावर वेगवेगळा परिणाम
अनेक शास्त्रज्ञांना कोरोना विषाणूच्या मानवी शरीरावरील परिणामावर वेगवेगळं मत व्यक्त केलं आहे. खालच्या श्वसनमार्गावर हल्ला करणाऱ्या डेल्टा प्रकाराच्या तुलनेत, ओमायक्रॉन व्हेरियंट वरच्या श्वसनमार्गावर हल्ला करतो. म्हणूनच डेल्टाची लागण झालेल्या लोकांमध्ये न्यूमोनियासारखी गंभीर लक्षणे आढळतात, तर ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये अनेकदा सामान्य सर्दीसारखी लक्षणे दिसतात, असं शास्त्रज्ञांचं मत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )