रशिया आणि चीनचा कोरोनावर प्रभावी लस तयार केल्याचा दावा; भारतातील लसींची चाचणी कुठपर्यंत?
संयुक्त राष्ट्र महासभेत पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरून समजतं की, वॅक्सिनचं डेव्हलपमेंट सुरु आहे. याव्यतिरिक्त जगभरात आतापर्यंत दोन वॅक्सिन कोरोनाच्या उपचारात वापरसाठी रजिस्टर करण्यात आल्या आहेत.
मुंबई : कोरोना व्हायरस महामारीमुळे जगभरात 10 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 3 कोटींहून अधिक लोकांना या जीवघेण्या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. अशातच जगभरातील सर्व देशांचे वैज्ञानिक या व्हायरसवर प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक वॅक्सिनवर काम सुरु आहे आणि काही वॅक्सिन अंतिम टप्प्यातही पोहोचले आहेत. रिपोर्ट्सनुसार, कोरोनावरील प्रभावी वॅक्सिन साधारणतः 2021मधील सुरुवातीला येऊ शकते.
संयुक्त राष्ट्र महासभेत पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरून समजतं की, वॅक्सिनचं डेव्हलपमेंट सुरु आहे. याव्यतिरिक्त जगभरात आतापर्यंत दोन वॅक्सिन कोरोनाच्या उपचारात वापरसाठी रजिस्टर करण्यात आल्या आहेत. तसेच 9 वॅक्सिन अंतिम स्टेजमध्ये आहेत.
ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाची भारतात ट्रायल
ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या एस्ट्राजनेका लसीची जगभरातील विविध देशांसोबतच भारतातही तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. 'कोविशिल्ड' नावाच्या या वॅक्सिनचं मुंबईत तीन वॉलिंटियर्सवर केईएम रुग्णालयात ट्रायल सुरु आहे. याच आठवड्यात पुढिल बॅचमध्ये वॅक्सिनचं ट्रायल सुरु करण्यात येणार आहे.
कोवॅक्सिनचं कोणतेही साइड इफेक्ट्स नाही
भारत बायोटेक, आईसीएमआर आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे यांच्या सहयोगाने विकसित करण्यात येत असलेलं कोवॅक्सिन प्रोग्रेस करत आहे. वॅक्सिनच्या फेज-2 ट्रायलला मॉनिटर करणाऱ्या चीफ इंवेस्टीगेटरनुसार, हे कँडिडेट्स मजबूत इम्युनोजेनेसिटी रिस्पॉन्स देण्यासाठी सक्षम आहे. या वॅक्सिनचे कोणतेही साइड इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत. सर्व बाबी ठिक असल्यामुळे याची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी लवकरच सुरु करण्यात येणार आहेत.
याव्यतिरिक्त भारताची सीरम इंस्टीट्यूट, कोविशिल्डसोबत यूएस - बेस्ड नोवाक्समची वॅक्सिन टेस्टिंगशी निगडीत आहे. याचे सुरुवातीचे क्लिनिकल रिझल्ट फार चांगले आहेत. रिपोर्टनुसार, वॅक्सिन निर्माता अमेरिकन कंपनी येत्या वर्षात लाखो डोस तयार करणार आहे. ज्यामध्ये भारताला 50 टक्के भागीदारी देण्यात येणार आहे.
चीनमध्ये 1,00,000 लोकांना वॅक्सिनचा डोस
चीनने आपल्या देशात तयार करण्यात आलेलं वॅक्सिनचा कमीत कमी एक लाख लोकांना डोस दिला आहे. चीनमध्ये पाच वॅक्सिनवर काम सुरु आहे. दोन वॅक्सिन फेज-2 आणि 3 च्या ट्रायलमध्ये असतानाच त्यांना जून महिन्यात मंजूरी देण्यात आली होती. रशियातील 'स्पुतनिक V' वॅक्सिन मजबूत इम्युनिटीचा दावा
रशियातील 'स्पुतनिक V' वॅक्सिनच्या नव्या रिपोर्टनुसार, हे वॅक्सिन पहिल्या डोसातच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. मॉस्कोतील गामलेय रिसर्च इंस्टिट्यूटचे प्रमुख अलेक्झांडर गिंट्सबर्ग यांनी सांगितलं की, वॅक्सिन सेफ होण्यासाठी पर्याप्त सॅम्पल्स आहेत. ते हेदेखील म्हणाले की, शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी एक एक्स्ट्रा डोसची गरज भासत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
- किशोर वयातील मुलांना कोरोनाचा धोका कमी? WHO चं म्हणणं काय?
- Covid- 19 Prevention : कोरोनापासून बचाव करणार संगणकाद्वारे डिझाईन केलेलं 'हे' खास प्रोटीन!
- 'हॅप्पी हायपॉक्सीया' मुळे कोरोनाबाधितांचे सर्वाधिक मृत्यू
- फक्त संसर्ग रोखण्यासाठीच नाहीतर रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 'फेस मास्क' फायदेशीर; संशोधकांचा दावा
- 'हा' रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका; रिसर्चमधून खुलासा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )